Mumbai Pune Expressway मार्गावर सर्रास नियमांना हरताळ; अवजड वाहनांचे जागोजागी थांबे मुंबई  ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहन चालकांकडून मार्गिका (लेन) बदलताना नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर गंभीर अपघात घडत आहेत. या मार्गावरील मार्गिकांची शिस्त पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. याशिवाय बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी राज्य महामार्ग पोलिसांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तरीही वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला जात आहे.  द्रुतगती महामार्गावर मार्गिका- 1 आणि मार्गिका-2 मधून हलकी वाहने चालविण्यास परवानगी आहे, तर तिसऱ्या मार्गिकेतून अवजड वाहनांना मुभा दिलेली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने द्रुतगती मार्गावर जागोजागी फलकही लावले आहेत. याशिवाय वेगमर्यादाही आखून देण्यात आली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी 1 आणि 2 या मार्गिकांमधून अवजड वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे छोट्या वाहनचालकांना या मार्गावर कसरत करावी लागत आहे.  अनेकदा ट्रेलर, ट्रकसह मालवाहतूक करणारी अवजड वाहने आणि शेतीमालाची ने-आण करणारी वाहन चालकांकडून नियमभंग केला जात आहे. या वेळी वेगमर्यादा पाळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत द्रुतगती मार्गावर एकूण 281 अपघात झाले. याशिवाय गेल्यावर्षी याच काळात 136 अपघातांत 63 जणांना प्राणाला मुकावे लागल्याचे राज्य महामार्ग पोलिसांनी सांगितले.  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा जागोजागी थांबे  महामार्गावर कोणत्याही ठिकाणी अवजड वाहनांसह कोणत्याही वाहनांना थांबण्याची परवानगी नसल्याचे फलक लावले आहे. मात्र, जागोजागी अवजड वाहन थांबविण्यात येत असल्याचेही आढळून येत आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक घडत असल्याने, अशा वाहनांवर कारवाईही केली जात नसल्याने मार्गावरील धोका वाढला आहे ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) marathi news update mumbai pune Expressway Heavy vehicles stop everywhere live update Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

Mumbai Pune Expressway मार्गावर सर्रास नियमांना हरताळ; अवजड वाहनांचे जागोजागी थांबे मुंबई  ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहन चालकांकडून मार्गिका (लेन) बदलताना नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर गंभीर अपघात घडत आहेत. या मार्गावरील मार्गिकांची शिस्त पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. याशिवाय बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी राज्य महामार्ग पोलिसांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तरीही वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला जात आहे.  द्रुतगती महामार्गावर मार्गिका- 1 आणि मार्गिका-2 मधून हलकी वाहने चालविण्यास परवानगी आहे, तर तिसऱ्या मार्गिकेतून अवजड वाहनांना मुभा दिलेली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने द्रुतगती मार्गावर जागोजागी फलकही लावले आहेत. याशिवाय वेगमर्यादाही आखून देण्यात आली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी 1 आणि 2 या मार्गिकांमधून अवजड वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे छोट्या वाहनचालकांना या मार्गावर कसरत करावी लागत आहे.  अनेकदा ट्रेलर, ट्रकसह मालवाहतूक करणारी अवजड वाहने आणि शेतीमालाची ने-आण करणारी वाहन चालकांकडून नियमभंग केला जात आहे. या वेळी वेगमर्यादा पाळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत द्रुतगती मार्गावर एकूण 281 अपघात झाले. याशिवाय गेल्यावर्षी याच काळात 136 अपघातांत 63 जणांना प्राणाला मुकावे लागल्याचे राज्य महामार्ग पोलिसांनी सांगितले.  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा जागोजागी थांबे  महामार्गावर कोणत्याही ठिकाणी अवजड वाहनांसह कोणत्याही वाहनांना थांबण्याची परवानगी नसल्याचे फलक लावले आहे. मात्र, जागोजागी अवजड वाहन थांबविण्यात येत असल्याचेही आढळून येत आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक घडत असल्याने, अशा वाहनांवर कारवाईही केली जात नसल्याने मार्गावरील धोका वाढला आहे ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) marathi news update mumbai pune Expressway Heavy vehicles stop everywhere live update Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jqJZ4H

No comments:

Post a Comment