तुम्हालाही उत्तम बॉस बनायचे आहे? मग 'हे' सात गुण आहेत महत्वाचे नागपूर : कुठलीही कंपनी असेल तर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक नेमला जातो. कंपनीला समोर नेण्यासाठी आवश्यक असणारे गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल त्याच्यावर ही जबाबदारी सोपविली जाते. मात्र, व्यवस्थापकाची नेतृत्व क्षमता चांगली असेल तर कंपनीची कमी वेळात प्रगती होते. तुम्ही जर कुठल्या कंपनीचे व्यवस्थापक असाल किंवा बॉस असाल तर बॉसगिरी न करता एक चांगले नेतृत्व करणे गरजेचे आहे. नेतृत्व करणारा हा फक्त बॉस नसतो, तर आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तींचा आवडता सहकारी आणि कंपनीचा विशेष कर्मचारी असतो. संपूर्ण टीमला बांधून ठेवायचे असेल तर तुमच्यामध्ये काही गुण असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गुणांबद्दल सांगणार आहोत. चांगला श्रोता एक चांगला बॉस असतो - जेव्हा तुम्ही बॉस असता, तेव्हा तुम्हाला इतर कर्मचाऱ्यांच्या भावना समजणे फार गरजेचे असते. मात्र, हे अंमलात आणण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना आधी शांतपणे ऐकून घ्यावे लागेल. अनेकवेळा आपण दुसऱ्यांचे म्हणणे ऐकतो. मात्र, त्याला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतो. कारण आपण त्या गोष्टी फक्त स्वतःच्या दृष्टीकोणातून बघत असतो. एक उत्तम श्रोता म्हणजे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर विचार करणे. त्यांना समजून घेणे. त्यानंतर त्यावर निर्णय घेणे. हा गुण तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कंपनी आणि कर्मचारी दोन्ही अगदी उत्तमपणे सांभाळू शकता. हेही वाचा - भावी शिक्षकांनो, सीटीईटी परीक्षा दिली असेल तर "ऍन्सर की' आलीय; अशी करा डाउनलोड  काम करण्यासाठी प्रत्येकवेळी हजर असणे - नेतृत्व करण्यासाठी हा गुण असणे सर्वात महत्वाचे आहे. कधीही कुठेही तुमची गरज असेल तर तुम्ही नकार न देता सहज हजर राहणे गरजेचे असते. ते देखील शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही रितीने तुम्ही उपस्थित राहू शकत असाल तर तुम्ही चांगले बॉस बनू शकता. एखाद्या वेळी तुम्हाला शक्य नसेल तर त्या कामासाठी योग्य असलेल्या व्यक्तीची निवड करून त्याला पाठवा. तुम्ही योग्य व्यक्तीवर जबाबदारी सोपवू शकत नसेल किंवा प्रत्येक काम स्वतः करण्याला प्राधान्य देत असाल तर तुमची चिडचिड होऊन कामात दुर्लक्ष होते. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तींना योग्य जबाबदारी सोपवून काम काढून घेतले, तर तुम्ही एक उत्तम बॉस बनू शकता.  सहनशक्ती असणे - तुम्ही बॉस असाल तर तुम्हाला विरोधही होतो. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, हे सर्व सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असणे गरजेचे आहे. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमधील हा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. बॉसला एकाचवेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे सहनशक्ती असेल त्याला या कामाचे ओझे वाटणार नाही. तसेच सहनशक्ती नसेल तर तुमचे कर्मचारी तुम्हाला तितके महत्व देत नाहीत. त्यामुळे एका चांगला बॉस बनयाचे असेल तर सहनशक्ती असणे गरजेचे आहे.  दुसऱ्यांसोबत जुळवून घेण्याची क्षमता - काम करताना अनेक अडचणी येत असतात. तसेच तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या अडचणी देखील समजून घ्यायच्या असतात. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना समजणे फार गरजेचे असते. त्या सर्वांच्या समस्यांचा विचार करून तुम्हाला तुमचे काम काढून घेणे गरजेचे असते. तुम्ही कर्मचाऱ्यांशी जितके जुळवून घ्याल तितके तुमचे सर्व कामे झटापट होतील. त्याचा तुमच्यावर ताण पडणार नाही. तसेच तुम्हाला काम करताना कधी, कुठे आणि कोणासमोर किती नम्रपणे वागावे हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.  हेही वाचा - Good News : TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती ओळखण्याची क्षमता - चूक -बरोबर, सत्य-असत्य, नफा-तोटा या सर्व बाबींची योग्य ओळख असलेला व्यक्ती उत्तम बॉस बनू शकतो. कारण तुम्हाला अनेक निर्णय घ्यायचे असतात. तुम्ही घेतलेला निर्णय हा कर्मचारी आणि कंपनी दोन्हीला पटणे गरजेचे आहे. तुम्हाला जर सत्य परिस्थितीची ओळख नसेल आणि एखादा निर्णय चुकला तर त्याचे तुमच्या करीअरवर वाईट परिणाम देखील होतात. त्यामुळे सर्वांच्या सूचना मिळवा. योग्य सूचनांची निवड करून त्यावर विचार मंथन करा. त्यानंतर निर्णय घ्या. हा निर्णय सर्वांनाच मान्य असेल. निर्णयक्षमता - बॉसला अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. नेहमी कंपनीच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे असते. निर्णय क्षमता म्हणजे फक्त चृक-बरोबर ओळखणे नाही, तर उत्तम पर्याय निवडून कंपनीला त्याचा फायदा कसा होईल याचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे असते. अनेकदा सर्वांमधून फक्त एकाला निवडावे लागते आणि बॉससाठी हे सर्वात कठीण काम असते. कारण एकासाठी सर्वांना सोडावे लागते. त्यामुळे योग्य विचारमंथन करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. निर्णय घेण्यासाठी तुमचे विचार स्पष्ट असणे गरजेचे आहे.  टीम वर्क - कितीही मोठे आणि कठीण काम असले तरी टीम वर्कमध्ये अगदी सहजरित्या पूर्ण करता येते. एक चांगला बॉस होण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांमध्ये टीमची भावना निर्माण करून त्यांना मदत करणे गरजेचे असते. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना मदत करत असता तेव्हाच इतरांना मदत करण्यास तुम्ही सूचवू शकता. तुमच्यासमोर एखादे धेय्य असेल तेव्हाच मदतीची भावना तुमच्यामध्ये जागृत होत असते. सहकाऱ्यांमध्ये टीमची भावना निर्माण करणे म्हणजे कुठलेही काम टीम मिळून सहजरित्या पूर्ण करणे. बॉस टीमला सोबत घेऊन चालत असाल तर नक्कीच तुम्ही एक उत्तम बॉस बनू शकता.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

तुम्हालाही उत्तम बॉस बनायचे आहे? मग 'हे' सात गुण आहेत महत्वाचे नागपूर : कुठलीही कंपनी असेल तर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक नेमला जातो. कंपनीला समोर नेण्यासाठी आवश्यक असणारे गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल त्याच्यावर ही जबाबदारी सोपविली जाते. मात्र, व्यवस्थापकाची नेतृत्व क्षमता चांगली असेल तर कंपनीची कमी वेळात प्रगती होते. तुम्ही जर कुठल्या कंपनीचे व्यवस्थापक असाल किंवा बॉस असाल तर बॉसगिरी न करता एक चांगले नेतृत्व करणे गरजेचे आहे. नेतृत्व करणारा हा फक्त बॉस नसतो, तर आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तींचा आवडता सहकारी आणि कंपनीचा विशेष कर्मचारी असतो. संपूर्ण टीमला बांधून ठेवायचे असेल तर तुमच्यामध्ये काही गुण असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गुणांबद्दल सांगणार आहोत. चांगला श्रोता एक चांगला बॉस असतो - जेव्हा तुम्ही बॉस असता, तेव्हा तुम्हाला इतर कर्मचाऱ्यांच्या भावना समजणे फार गरजेचे असते. मात्र, हे अंमलात आणण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना आधी शांतपणे ऐकून घ्यावे लागेल. अनेकवेळा आपण दुसऱ्यांचे म्हणणे ऐकतो. मात्र, त्याला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतो. कारण आपण त्या गोष्टी फक्त स्वतःच्या दृष्टीकोणातून बघत असतो. एक उत्तम श्रोता म्हणजे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर विचार करणे. त्यांना समजून घेणे. त्यानंतर त्यावर निर्णय घेणे. हा गुण तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कंपनी आणि कर्मचारी दोन्ही अगदी उत्तमपणे सांभाळू शकता. हेही वाचा - भावी शिक्षकांनो, सीटीईटी परीक्षा दिली असेल तर "ऍन्सर की' आलीय; अशी करा डाउनलोड  काम करण्यासाठी प्रत्येकवेळी हजर असणे - नेतृत्व करण्यासाठी हा गुण असणे सर्वात महत्वाचे आहे. कधीही कुठेही तुमची गरज असेल तर तुम्ही नकार न देता सहज हजर राहणे गरजेचे असते. ते देखील शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही रितीने तुम्ही उपस्थित राहू शकत असाल तर तुम्ही चांगले बॉस बनू शकता. एखाद्या वेळी तुम्हाला शक्य नसेल तर त्या कामासाठी योग्य असलेल्या व्यक्तीची निवड करून त्याला पाठवा. तुम्ही योग्य व्यक्तीवर जबाबदारी सोपवू शकत नसेल किंवा प्रत्येक काम स्वतः करण्याला प्राधान्य देत असाल तर तुमची चिडचिड होऊन कामात दुर्लक्ष होते. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तींना योग्य जबाबदारी सोपवून काम काढून घेतले, तर तुम्ही एक उत्तम बॉस बनू शकता.  सहनशक्ती असणे - तुम्ही बॉस असाल तर तुम्हाला विरोधही होतो. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, हे सर्व सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असणे गरजेचे आहे. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमधील हा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. बॉसला एकाचवेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे सहनशक्ती असेल त्याला या कामाचे ओझे वाटणार नाही. तसेच सहनशक्ती नसेल तर तुमचे कर्मचारी तुम्हाला तितके महत्व देत नाहीत. त्यामुळे एका चांगला बॉस बनयाचे असेल तर सहनशक्ती असणे गरजेचे आहे.  दुसऱ्यांसोबत जुळवून घेण्याची क्षमता - काम करताना अनेक अडचणी येत असतात. तसेच तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या अडचणी देखील समजून घ्यायच्या असतात. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना समजणे फार गरजेचे असते. त्या सर्वांच्या समस्यांचा विचार करून तुम्हाला तुमचे काम काढून घेणे गरजेचे असते. तुम्ही कर्मचाऱ्यांशी जितके जुळवून घ्याल तितके तुमचे सर्व कामे झटापट होतील. त्याचा तुमच्यावर ताण पडणार नाही. तसेच तुम्हाला काम करताना कधी, कुठे आणि कोणासमोर किती नम्रपणे वागावे हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.  हेही वाचा - Good News : TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती ओळखण्याची क्षमता - चूक -बरोबर, सत्य-असत्य, नफा-तोटा या सर्व बाबींची योग्य ओळख असलेला व्यक्ती उत्तम बॉस बनू शकतो. कारण तुम्हाला अनेक निर्णय घ्यायचे असतात. तुम्ही घेतलेला निर्णय हा कर्मचारी आणि कंपनी दोन्हीला पटणे गरजेचे आहे. तुम्हाला जर सत्य परिस्थितीची ओळख नसेल आणि एखादा निर्णय चुकला तर त्याचे तुमच्या करीअरवर वाईट परिणाम देखील होतात. त्यामुळे सर्वांच्या सूचना मिळवा. योग्य सूचनांची निवड करून त्यावर विचार मंथन करा. त्यानंतर निर्णय घ्या. हा निर्णय सर्वांनाच मान्य असेल. निर्णयक्षमता - बॉसला अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. नेहमी कंपनीच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे असते. निर्णय क्षमता म्हणजे फक्त चृक-बरोबर ओळखणे नाही, तर उत्तम पर्याय निवडून कंपनीला त्याचा फायदा कसा होईल याचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे असते. अनेकदा सर्वांमधून फक्त एकाला निवडावे लागते आणि बॉससाठी हे सर्वात कठीण काम असते. कारण एकासाठी सर्वांना सोडावे लागते. त्यामुळे योग्य विचारमंथन करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. निर्णय घेण्यासाठी तुमचे विचार स्पष्ट असणे गरजेचे आहे.  टीम वर्क - कितीही मोठे आणि कठीण काम असले तरी टीम वर्कमध्ये अगदी सहजरित्या पूर्ण करता येते. एक चांगला बॉस होण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांमध्ये टीमची भावना निर्माण करून त्यांना मदत करणे गरजेचे असते. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना मदत करत असता तेव्हाच इतरांना मदत करण्यास तुम्ही सूचवू शकता. तुमच्यासमोर एखादे धेय्य असेल तेव्हाच मदतीची भावना तुमच्यामध्ये जागृत होत असते. सहकाऱ्यांमध्ये टीमची भावना निर्माण करणे म्हणजे कुठलेही काम टीम मिळून सहजरित्या पूर्ण करणे. बॉस टीमला सोबत घेऊन चालत असाल तर नक्कीच तुम्ही एक उत्तम बॉस बनू शकता.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NaRl0c

No comments:

Post a Comment