Exclusive : मान्यता ३ कोटींची, बिल मात्र १६ कोटींचे  पुणे - स्थायी समितीने सर्व करांसहीत ३ कोटी ७८ लाखांच्या कामाला मंजुरी दिली. घनकचरा खात्याने मात्र स्थायी समितीने मान्यता दिलेल्या रकमेपेक्षा अधिकचे १६ कोटी ८० लाख रुपयांचे बिल ठेकेदारास देण्यात यावे, असा प्रस्ताव सादर केला आहे. ठेकेदाराने दाखविलेली ‘कार्यक्षमता’ आणि कोणतीही मान्यता न घेता खात्याने ‘परस्पर’ सादर केलेले वाढीव बिल बघून, अधिकारी चक्रावून गेले आहेत.  महापालिकेतील घनकचरा विभागाने हा प्रताप करून दाखविला आहे. मुख्य इमारत आणि कोरोनाच्या काळात महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या ५२ कोविड केअर सेंटरची साफसफाईची ३ कोटी ७६ लाखाची निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आली होती. प्रशासनाच्या या प्रस्तावास (ठराव क्रमांक १३३) १९ मे २०२० मध्ये मान्यता दिली. त्यानंतर या कामाचे बिल मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव घनकचरा विभागाने तयार करून अतिरिक्त आयुक्तांकडे ठेवला आहे. त्यामध्ये कंत्राटदार कंपनीला अधिकचे १६ कोटी ८० लाख रुपयांचे बिल देण्यास मान्यता द्यावी, असे म्हटले आहे.  Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य मान्य निविदेपेक्षा वाढीव खर्चाचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यास खात्याने प्रशासकीय अथवा स्थायी समितीची मान्यता घेतली होती का? घेतली असेल तर ती कधी? संबंधित ठेकेदाराकडे किती कर्मचारी होते? त्यांची नावे, त्यांना दिलेला पगार, प्रत्यक्षात किती काम केले, या काळात ठेकेदाराकडील दगावलेल्या पाच कर्मचाऱ्यांना किती भरपाई दिली? यांचे कोणतेही पुरावे खात्याने प्रस्तावासोबत जोडले नाहीत. असे असतानाही कनिष्ठ अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी ठेकेदाराकडून वाढीव बिलाचा प्रस्ताव सादर करून घेतलाच कसा, तसेच मंजुरीसाठी तो सादर केला कसा, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.  बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात! तसेच कोरोनाच्या काळात महापालिकेकडून जी केअर सेंटर उभारण्यात आली होती. त्यापैकी अनेक केअर सेंटरची साफसफाईचे काम हे तेथील क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले. त्या कामांचे बिलसुद्धा क्षेत्रीय कार्यालयांकडून खर्ची टाकण्यात आले आहे. असे असताना ठेकेदाराने ही कामे केली, असे दाखवून वाढीव रक्कमेचा प्रस्ताव खात्याकडून सादर करण्यात आल्यामुळे प्रशासनही चक्रावून गेले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर आयुक्त कारवार्इ करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली आहे. काही क्षेत्रीय कार्यालयांकडून ती आली आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात हे काम झाले आहे की नाही, यांची तपासणी करून मगच पुढील कार्यवाही करण्यात येईल.  - अजित देशमुख, घनकचरा विभाग प्रमुख, पुणे महापालिका  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 4, 2021

Exclusive : मान्यता ३ कोटींची, बिल मात्र १६ कोटींचे  पुणे - स्थायी समितीने सर्व करांसहीत ३ कोटी ७८ लाखांच्या कामाला मंजुरी दिली. घनकचरा खात्याने मात्र स्थायी समितीने मान्यता दिलेल्या रकमेपेक्षा अधिकचे १६ कोटी ८० लाख रुपयांचे बिल ठेकेदारास देण्यात यावे, असा प्रस्ताव सादर केला आहे. ठेकेदाराने दाखविलेली ‘कार्यक्षमता’ आणि कोणतीही मान्यता न घेता खात्याने ‘परस्पर’ सादर केलेले वाढीव बिल बघून, अधिकारी चक्रावून गेले आहेत.  महापालिकेतील घनकचरा विभागाने हा प्रताप करून दाखविला आहे. मुख्य इमारत आणि कोरोनाच्या काळात महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या ५२ कोविड केअर सेंटरची साफसफाईची ३ कोटी ७६ लाखाची निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आली होती. प्रशासनाच्या या प्रस्तावास (ठराव क्रमांक १३३) १९ मे २०२० मध्ये मान्यता दिली. त्यानंतर या कामाचे बिल मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव घनकचरा विभागाने तयार करून अतिरिक्त आयुक्तांकडे ठेवला आहे. त्यामध्ये कंत्राटदार कंपनीला अधिकचे १६ कोटी ८० लाख रुपयांचे बिल देण्यास मान्यता द्यावी, असे म्हटले आहे.  Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य मान्य निविदेपेक्षा वाढीव खर्चाचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यास खात्याने प्रशासकीय अथवा स्थायी समितीची मान्यता घेतली होती का? घेतली असेल तर ती कधी? संबंधित ठेकेदाराकडे किती कर्मचारी होते? त्यांची नावे, त्यांना दिलेला पगार, प्रत्यक्षात किती काम केले, या काळात ठेकेदाराकडील दगावलेल्या पाच कर्मचाऱ्यांना किती भरपाई दिली? यांचे कोणतेही पुरावे खात्याने प्रस्तावासोबत जोडले नाहीत. असे असतानाही कनिष्ठ अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी ठेकेदाराकडून वाढीव बिलाचा प्रस्ताव सादर करून घेतलाच कसा, तसेच मंजुरीसाठी तो सादर केला कसा, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.  बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात! तसेच कोरोनाच्या काळात महापालिकेकडून जी केअर सेंटर उभारण्यात आली होती. त्यापैकी अनेक केअर सेंटरची साफसफाईचे काम हे तेथील क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले. त्या कामांचे बिलसुद्धा क्षेत्रीय कार्यालयांकडून खर्ची टाकण्यात आले आहे. असे असताना ठेकेदाराने ही कामे केली, असे दाखवून वाढीव रक्कमेचा प्रस्ताव खात्याकडून सादर करण्यात आल्यामुळे प्रशासनही चक्रावून गेले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर आयुक्त कारवार्इ करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली आहे. काही क्षेत्रीय कार्यालयांकडून ती आली आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात हे काम झाले आहे की नाही, यांची तपासणी करून मगच पुढील कार्यवाही करण्यात येईल.  - अजित देशमुख, घनकचरा विभाग प्रमुख, पुणे महापालिका  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2YOSk8s

No comments:

Post a Comment