पुण्यात कला शाखेच्या तब्‍बल ५१ टक्के जागा रिक्त पुणे - कोरोना, आरक्षणामुळे लांबलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेर मंगळवारी (ता. १६) संपली. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ७१ हजार ५५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत, तर तब्बल ३५ हजार ५५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून, तब्बल ५१ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तर वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अनुक्रमे २९.९८ टक्के, २८.५६ टक्के जागा रिकाम्या आहेत. कोरोना काळात शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन सुरू केली. यासाठी पुणे विभागात ३०४ महाविद्यालयांनी नोंदणी करून, प्रवेशासाठी १ लाख ७ हजार ११३ जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. या प्रवेशासाठी १ लाख ७ हजार ९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे प्रवेशाची पहिली फेरी राबविल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही प्रक्रिया स्थगित झाली होती. त्यामुळे अखेर राज्य सरकारने जवळपास अडीच महिन्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश या प्रक्रियेत कॅप अंतर्गत प्रवेशासाठी ९० हजार ९६८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ६१ हजार ४४४ जागांवर प्रवेश आहेत. २९ हजार ५२४ जागा रिक्त राहिल्या आहेत. विविध कोट्यातील प्रवेशासाठी १६ हजार १४५ जागा उपलब्ध केल्या होत्या. त्यातील ११ हजार ११० जागांवर प्रवेश निश्‍चित झाले असून, ६ हजार ३५ जागा रिक्त राहिल्या आहेत. इन हाउस कोट्यात ६ हजार १८८ प्रवेशांपैकी ४ हजार ४३२ जागांवर प्रवेश निश्‍चित झाले असून, १ हजार ७५६ प्रवेश रिक्त आहेत. अल्पसंख्याक कोट्यातील ५ हजार ८०० जागांपैकी २ हजार ६११ जागा रिक्त असून, ३ हजार १८९ जागांवर प्रवेश झाले आहेत. व्यवस्थापन कोट्याच्या ४ हजार १५७ जागांपैकी २ हजार ४८९ जागांवर प्रत्यक्षात प्रवेश झाले असून, १ हजार ६६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/2N7QH3T - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

पुण्यात कला शाखेच्या तब्‍बल ५१ टक्के जागा रिक्त पुणे - कोरोना, आरक्षणामुळे लांबलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेर मंगळवारी (ता. १६) संपली. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ७१ हजार ५५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत, तर तब्बल ३५ हजार ५५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून, तब्बल ५१ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तर वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अनुक्रमे २९.९८ टक्के, २८.५६ टक्के जागा रिकाम्या आहेत. कोरोना काळात शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन सुरू केली. यासाठी पुणे विभागात ३०४ महाविद्यालयांनी नोंदणी करून, प्रवेशासाठी १ लाख ७ हजार ११३ जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. या प्रवेशासाठी १ लाख ७ हजार ९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे प्रवेशाची पहिली फेरी राबविल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही प्रक्रिया स्थगित झाली होती. त्यामुळे अखेर राज्य सरकारने जवळपास अडीच महिन्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश या प्रक्रियेत कॅप अंतर्गत प्रवेशासाठी ९० हजार ९६८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ६१ हजार ४४४ जागांवर प्रवेश आहेत. २९ हजार ५२४ जागा रिक्त राहिल्या आहेत. विविध कोट्यातील प्रवेशासाठी १६ हजार १४५ जागा उपलब्ध केल्या होत्या. त्यातील ११ हजार ११० जागांवर प्रवेश निश्‍चित झाले असून, ६ हजार ३५ जागा रिक्त राहिल्या आहेत. इन हाउस कोट्यात ६ हजार १८८ प्रवेशांपैकी ४ हजार ४३२ जागांवर प्रवेश निश्‍चित झाले असून, १ हजार ७५६ प्रवेश रिक्त आहेत. अल्पसंख्याक कोट्यातील ५ हजार ८०० जागांपैकी २ हजार ६११ जागा रिक्त असून, ३ हजार १८९ जागांवर प्रवेश झाले आहेत. व्यवस्थापन कोट्याच्या ४ हजार १५७ जागांपैकी २ हजार ४८९ जागांवर प्रत्यक्षात प्रवेश झाले असून, १ हजार ६६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/2N7QH3T


via Tajya news Feeds https://ift.tt/3avt2mQ

No comments:

Post a Comment