आई-वडीलच शिक्षकाच्या भूमिकेत पुणे - ‘माझा मुलगा ज्युनिअर केजीमध्ये शिकत आहे, पण यावर्षी त्याची शाळाच सुरू झाली नाही. घरात बसून कंटाळलेल्या मुलाला कसे शिक्षण द्यायचे, आपण कसे शिकवायचे हा प्रश्‍न आमच्यापुढे होताच. पण आकांक्षा फाउंडेशनच्या शाळांनी आम्हाला मुलांना कसे शिकवायचे, त्यांच्याकडून विविध कृती कशा करून घ्यायच्या याचे प्रशिक्षण दिले. आता दीड महिना होऊन गेला, आम्ही आई-वडीलच शिक्षकाच्या भूमिकेत असून, मुलांमध्येही मोठा बदल झाला आहे, कासारवाडी येथील पालक कानिफनाथ डोंगरे सांगत होते. अशाच पद्धतीने आता वस्ती व झोपडपट्टी भागातील सुमारे ५०० लहान मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आकांश फाउंडेशनतर्फे पुणे व मुंबईतील महापालिकेच्या शाळा चालविल्या जातात. झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फाउंडेशनने कडक लॉकडाऊनच्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह त्यांची मानसिक स्थितीची काळजी घेतली होती, आॅनलाइऩ शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टॅब देखील उपलब्ध करून दिले आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांचे आॅनलाइन शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. पण झोपडपट्टीतील ४ ते ७ वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मुलांना शाळेत बोलाविणे शक्य नसल्याने त्यांच्याच पालकांना प्रशिक्षण देऊन शिक्षकांची भूमिका स्वीकारायला लावली. यामध्ये रॉकेट लर्निंग संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. सिंहगड रोडवर रुग्ण वाढले; जाणून घ्या पुण्यात कोणत्या भागात किती रुग्ण? शाळा संचालक जयश्री ओबेरॉय म्हणाल्या, ‘‘लहान गटातील मुलांच्या शाळा पुढील सहा महिने सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालकांनाच सहशिक्षक म्हणून भूमिका निभावण्यासाठी तयार केले गेले. दर आठवड्यातला शिक्षक व पालकांची बैठक होत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून कसे उपक्रम राबविण्यासाठी सूचना दिल्या जातात. सध्या पुण्यातील ९ आणि मुंबईतील ८ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.’ तोंडओळखीवर शिक्षिकेला जेजुरीला नेऊन फसवणूक करणाऱ्या भामटयास अटक ‘‘विद्यार्थ्यांना काय शिकवायचे आहे हे पालकांना सोप्या भाषेत शिकवले जात आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून चित्र काढून घेणे, वस्तू ओळखणे, बडबड गीत म्हणून घेणे व त्याचे व्हिडिओ तयार केले जात आहेत. वर्गशिक्षकांकडून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती कशी सुरू आहे यावर लक्ष आहे. या उपक्रमामुळे आपली मुले शाळाबाह्य होतील अशी पालकांना भीती होती ती आता दूर झाली आहे,’’ असे रॉकेट लर्निंगच सिद्धांत सचदेवा यांनी सांगितले. - शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेतले - वस्ती व झोपडपट्टीतील लहान मुलांचा समावेश - संवाद कौशल्यासह विविध कृती करून घेण्यावर भर - आई-वडिलांना प्रशिक्षण आणि प्रत्येक आठवड्याला बैठक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

आई-वडीलच शिक्षकाच्या भूमिकेत पुणे - ‘माझा मुलगा ज्युनिअर केजीमध्ये शिकत आहे, पण यावर्षी त्याची शाळाच सुरू झाली नाही. घरात बसून कंटाळलेल्या मुलाला कसे शिक्षण द्यायचे, आपण कसे शिकवायचे हा प्रश्‍न आमच्यापुढे होताच. पण आकांक्षा फाउंडेशनच्या शाळांनी आम्हाला मुलांना कसे शिकवायचे, त्यांच्याकडून विविध कृती कशा करून घ्यायच्या याचे प्रशिक्षण दिले. आता दीड महिना होऊन गेला, आम्ही आई-वडीलच शिक्षकाच्या भूमिकेत असून, मुलांमध्येही मोठा बदल झाला आहे, कासारवाडी येथील पालक कानिफनाथ डोंगरे सांगत होते. अशाच पद्धतीने आता वस्ती व झोपडपट्टी भागातील सुमारे ५०० लहान मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आकांश फाउंडेशनतर्फे पुणे व मुंबईतील महापालिकेच्या शाळा चालविल्या जातात. झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फाउंडेशनने कडक लॉकडाऊनच्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह त्यांची मानसिक स्थितीची काळजी घेतली होती, आॅनलाइऩ शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टॅब देखील उपलब्ध करून दिले आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांचे आॅनलाइन शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. पण झोपडपट्टीतील ४ ते ७ वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मुलांना शाळेत बोलाविणे शक्य नसल्याने त्यांच्याच पालकांना प्रशिक्षण देऊन शिक्षकांची भूमिका स्वीकारायला लावली. यामध्ये रॉकेट लर्निंग संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. सिंहगड रोडवर रुग्ण वाढले; जाणून घ्या पुण्यात कोणत्या भागात किती रुग्ण? शाळा संचालक जयश्री ओबेरॉय म्हणाल्या, ‘‘लहान गटातील मुलांच्या शाळा पुढील सहा महिने सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालकांनाच सहशिक्षक म्हणून भूमिका निभावण्यासाठी तयार केले गेले. दर आठवड्यातला शिक्षक व पालकांची बैठक होत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून कसे उपक्रम राबविण्यासाठी सूचना दिल्या जातात. सध्या पुण्यातील ९ आणि मुंबईतील ८ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.’ तोंडओळखीवर शिक्षिकेला जेजुरीला नेऊन फसवणूक करणाऱ्या भामटयास अटक ‘‘विद्यार्थ्यांना काय शिकवायचे आहे हे पालकांना सोप्या भाषेत शिकवले जात आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून चित्र काढून घेणे, वस्तू ओळखणे, बडबड गीत म्हणून घेणे व त्याचे व्हिडिओ तयार केले जात आहेत. वर्गशिक्षकांकडून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती कशी सुरू आहे यावर लक्ष आहे. या उपक्रमामुळे आपली मुले शाळाबाह्य होतील अशी पालकांना भीती होती ती आता दूर झाली आहे,’’ असे रॉकेट लर्निंगच सिद्धांत सचदेवा यांनी सांगितले. - शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेतले - वस्ती व झोपडपट्टीतील लहान मुलांचा समावेश - संवाद कौशल्यासह विविध कृती करून घेण्यावर भर - आई-वडिलांना प्रशिक्षण आणि प्रत्येक आठवड्याला बैठक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3auT617

No comments:

Post a Comment