शहरात वाढताहेत चोरी व फसवणुकीच्या घटना ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त  सोलापूर : जानकीनगर बागेसमोरून चालत जात असताना चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. समर्थ नगर येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर येऊन रजनी राजन गायकवाड (वय 58, रा. प्लाट नंबर 271, अष्टविनायक नगर, पटेल हॉस्पिटलजवळ) यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (ता. 16) रोजी घडली. या घटनेची फिर्याद गायकवाड यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तोळणुरे करीत आहेत.  मोबाईलद्वारे तरुणाची फसवणूक  तुम्हाला एसबीआयचे क्रेडिट कार्ड मिळाले आहे, असे सांगून 64 हजार रुपयांची मोबाईलद्वारे फसवणूक केल्याची घटना 20 जानेवारी रोजी घडली. क्रेडिट कार्ड मिळाले का, असे विचारत आरोपीने "तुमचे कार्ड मिळालेला बॅंक मेसेज आलेला आहे' अशा रीतीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून "तुमचे कार्ड ऍक्‍टिव्ह करायचे आहे, नाही तर तुम्हाला महिना 1 हजार 200 रुपये दंड आकारण्यात येईल', असे म्हणत क्रेडिट कार्डचे नंबर सांगण्यास सांगितले व यावरून 64 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेची फिर्याद आनंद परमेश्वर कंचे (वय 36 रा. प्लॉट नंबर 27, ओम गुरुदेव दत्त नगर भाग 3 व ओमगर्जना चौक) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.  सत्तर हजार रुपयांची पर्स पळविली  सत्तर हजार रुपये असलेली पर्स चोरट्यांनी चोरली असल्याची घटना मंगळवारी (ता. 16) घोंगडे वस्ती, भवानी पेठ येथे घडली आहे. सासरी आलेल्या सविता दत्तात्रय कोळी (वय 30, रा. करजगी, ता. अफजलपूर, जिल्हा गुलबर्गा) यांच्या हातातील पर्स किचन कट्ट्यावर ठेवून गेले असताना 70 हजार रुपये व इतर कागदपत्रे असलेली पर्स चोरीस गेली. पर्समध्ये 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, एक सोन्याची अंगठी, रोख रक्कम तीन हजार रुपये, बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक एटीएम कार्ड, पॅन कार्ड असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेची फिर्याद सविता दत्तात्रय कोळी यांनी रेणुका दत्तात्रेय कोळी व दत्तात्रेय सुरेश कोळी (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गायकवाड करीत आहेत.  आठ हजार रुपयांची चोरी  रविवार पेठ, जोशी गल्ली ते मार्केट यार्ड यादरम्यान राम शिवा दोरकर (वय 65, रा. मु. पोस्ट मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) हे मंगळवार बाजारात शेळी विकून घरी जात असताना जोशी गल्ली ते मार्केट यार्ड दरम्यान रिक्षात बसून प्रवास करीत असताना बाजूला बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी पायजमाच्या उजव्या खिशातून 8 हजार 500 रुपयांची चोरी केल्याची घटना घडली. या घटनेची फिर्याद राम शिवा दोरकर यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शेख करीत आहेत.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

शहरात वाढताहेत चोरी व फसवणुकीच्या घटना ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त  सोलापूर : जानकीनगर बागेसमोरून चालत जात असताना चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. समर्थ नगर येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर येऊन रजनी राजन गायकवाड (वय 58, रा. प्लाट नंबर 271, अष्टविनायक नगर, पटेल हॉस्पिटलजवळ) यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (ता. 16) रोजी घडली. या घटनेची फिर्याद गायकवाड यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तोळणुरे करीत आहेत.  मोबाईलद्वारे तरुणाची फसवणूक  तुम्हाला एसबीआयचे क्रेडिट कार्ड मिळाले आहे, असे सांगून 64 हजार रुपयांची मोबाईलद्वारे फसवणूक केल्याची घटना 20 जानेवारी रोजी घडली. क्रेडिट कार्ड मिळाले का, असे विचारत आरोपीने "तुमचे कार्ड मिळालेला बॅंक मेसेज आलेला आहे' अशा रीतीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून "तुमचे कार्ड ऍक्‍टिव्ह करायचे आहे, नाही तर तुम्हाला महिना 1 हजार 200 रुपये दंड आकारण्यात येईल', असे म्हणत क्रेडिट कार्डचे नंबर सांगण्यास सांगितले व यावरून 64 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेची फिर्याद आनंद परमेश्वर कंचे (वय 36 रा. प्लॉट नंबर 27, ओम गुरुदेव दत्त नगर भाग 3 व ओमगर्जना चौक) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.  सत्तर हजार रुपयांची पर्स पळविली  सत्तर हजार रुपये असलेली पर्स चोरट्यांनी चोरली असल्याची घटना मंगळवारी (ता. 16) घोंगडे वस्ती, भवानी पेठ येथे घडली आहे. सासरी आलेल्या सविता दत्तात्रय कोळी (वय 30, रा. करजगी, ता. अफजलपूर, जिल्हा गुलबर्गा) यांच्या हातातील पर्स किचन कट्ट्यावर ठेवून गेले असताना 70 हजार रुपये व इतर कागदपत्रे असलेली पर्स चोरीस गेली. पर्समध्ये 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, एक सोन्याची अंगठी, रोख रक्कम तीन हजार रुपये, बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक एटीएम कार्ड, पॅन कार्ड असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेची फिर्याद सविता दत्तात्रय कोळी यांनी रेणुका दत्तात्रेय कोळी व दत्तात्रेय सुरेश कोळी (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गायकवाड करीत आहेत.  आठ हजार रुपयांची चोरी  रविवार पेठ, जोशी गल्ली ते मार्केट यार्ड यादरम्यान राम शिवा दोरकर (वय 65, रा. मु. पोस्ट मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) हे मंगळवार बाजारात शेळी विकून घरी जात असताना जोशी गल्ली ते मार्केट यार्ड दरम्यान रिक्षात बसून प्रवास करीत असताना बाजूला बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी पायजमाच्या उजव्या खिशातून 8 हजार 500 रुपयांची चोरी केल्याची घटना घडली. या घटनेची फिर्याद राम शिवा दोरकर यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शेख करीत आहेत.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3at7tTz

No comments:

Post a Comment