कांदळगावजवळ अपघातात तरुण जागीच ठार  मालवण (सिंधुदुर्ग) - मालवण-हडी मार्गावरील कांदळगाव राणेवाडी फाट्याजवळच्या उतारावर दुचाकी व मोटार यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजेश नारायण बांदेकर (वय 30, रा. तारकर्ली मधलीवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघात आज सकाळी आठच्या सुमारास घडला.  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः तारकर्ली येथील राजेश बांदेकर दुचाकी (एमएच 07 आर- 5607) वरून आचरा येथून मालवणच्या दिशेने येत होता, तर मोटार (एमएच 07 एजे- 1371) मालवणहून आचऱ्याच्या दिशेने जात होती. कांदळगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात बांदेकर जागीच ठार झाले. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले होते. पोलिस पाटील शीतल परब यांनी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, हेमंत पेडणेकर घटनास्थळी दाखल झाले होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

कांदळगावजवळ अपघातात तरुण जागीच ठार  मालवण (सिंधुदुर्ग) - मालवण-हडी मार्गावरील कांदळगाव राणेवाडी फाट्याजवळच्या उतारावर दुचाकी व मोटार यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजेश नारायण बांदेकर (वय 30, रा. तारकर्ली मधलीवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघात आज सकाळी आठच्या सुमारास घडला.  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः तारकर्ली येथील राजेश बांदेकर दुचाकी (एमएच 07 आर- 5607) वरून आचरा येथून मालवणच्या दिशेने येत होता, तर मोटार (एमएच 07 एजे- 1371) मालवणहून आचऱ्याच्या दिशेने जात होती. कांदळगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात बांदेकर जागीच ठार झाले. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले होते. पोलिस पाटील शीतल परब यांनी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, हेमंत पेडणेकर घटनास्थळी दाखल झाले होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d10P8S

No comments:

Post a Comment