बुलेटच्या कर्रर्रर्रर्कर्कर्कश आवाजाला पोलिसांचा चाप! तब्बल एवढ्या जणांकडून लाखोंचा दंड वसूल   कल्याण  : बुलेट दुचाकीच्या सायलन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून फटाक्‍यासारखा आवाज करणाऱ्या चालकांविरोधात कल्याणमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बुलेट शहरात जोराने चालवून आवाज करण्याची फॅशन सुरू आहे. बुलेटच्या कणकर्कश आवाजाचा नागरिकांना मोठा त्रास होतो. याच पार्श्‍वभूमीवर कल्याण आरटीओने 29 बुलेट चालकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.  कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी शहरांचा समावेश होतो. सध्या अनेक शहरात लाखो रुपयांची बुलेट दुचाकी खरेदी करून रस्त्यावर टवाळक्‍या करत फिरण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यात बुलेटच्या सायलन्सरमध्ये हमखास बदल करून आवाज वाढवला जातो. त्यातून फटाक्‍यासारखा निघणारा आवाज नागरिकांना त्रासदायक ठरतो. वाहन खरेदी केल्यानंतर त्यांच्या रचनेत, आवाजात बदल करणे थोडक्‍यात त्या "मॉडिफाईड' करणे कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करून हल्ली तरुण आवाजात बदल केलेल्या बुलेट घेऊन रस्त्यावर फिरताना दिसतात.  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी एका पथकांची नेमणूक करून अशा बुलेट चालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. आरटीओच्या विशेष पथकामधील वाहन निरीक्षक दीपक शिंदे, जयवंत पोंदकुले, संजय फुंदे आणि प्रशांत सूर्यवंशी आणि उल्हासनगरमधील वाहतूक पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या उल्हासनगर, शहाड आदी परिसरात धडक कारवाई केली. यात 29 बुलेटची तपासणी करण्यात आली. तर 14 बुलेटचालकांकडून ई-चलान अंतर्गत सुमारे 2 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.    बुलेट खरेदी करून त्यात बदल करणे, बेदारकपणे चालवणे आणि कणकर्कश हॉर्न वाजविणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू असून आहे. काल केलेल्या कारवाईत लाखोंचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम आगामी काळात सुरू राहणार आहे.  - तानाजी चव्हाण,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) Mumbai kalyan latest marathi news Action taken by Kalyan Regional Transport Department on irritated noice of bullet Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

बुलेटच्या कर्रर्रर्रर्कर्कर्कश आवाजाला पोलिसांचा चाप! तब्बल एवढ्या जणांकडून लाखोंचा दंड वसूल   कल्याण  : बुलेट दुचाकीच्या सायलन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून फटाक्‍यासारखा आवाज करणाऱ्या चालकांविरोधात कल्याणमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बुलेट शहरात जोराने चालवून आवाज करण्याची फॅशन सुरू आहे. बुलेटच्या कणकर्कश आवाजाचा नागरिकांना मोठा त्रास होतो. याच पार्श्‍वभूमीवर कल्याण आरटीओने 29 बुलेट चालकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.  कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी शहरांचा समावेश होतो. सध्या अनेक शहरात लाखो रुपयांची बुलेट दुचाकी खरेदी करून रस्त्यावर टवाळक्‍या करत फिरण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यात बुलेटच्या सायलन्सरमध्ये हमखास बदल करून आवाज वाढवला जातो. त्यातून फटाक्‍यासारखा निघणारा आवाज नागरिकांना त्रासदायक ठरतो. वाहन खरेदी केल्यानंतर त्यांच्या रचनेत, आवाजात बदल करणे थोडक्‍यात त्या "मॉडिफाईड' करणे कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करून हल्ली तरुण आवाजात बदल केलेल्या बुलेट घेऊन रस्त्यावर फिरताना दिसतात.  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी एका पथकांची नेमणूक करून अशा बुलेट चालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. आरटीओच्या विशेष पथकामधील वाहन निरीक्षक दीपक शिंदे, जयवंत पोंदकुले, संजय फुंदे आणि प्रशांत सूर्यवंशी आणि उल्हासनगरमधील वाहतूक पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या उल्हासनगर, शहाड आदी परिसरात धडक कारवाई केली. यात 29 बुलेटची तपासणी करण्यात आली. तर 14 बुलेटचालकांकडून ई-चलान अंतर्गत सुमारे 2 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.    बुलेट खरेदी करून त्यात बदल करणे, बेदारकपणे चालवणे आणि कणकर्कश हॉर्न वाजविणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू असून आहे. काल केलेल्या कारवाईत लाखोंचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम आगामी काळात सुरू राहणार आहे.  - तानाजी चव्हाण,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) Mumbai kalyan latest marathi news Action taken by Kalyan Regional Transport Department on irritated noice of bullet Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rqG1vH

No comments:

Post a Comment