जालना, औरंगाबादचे डमी विद्यार्थी नगरला पकडले, आरोग्य विभागाची परीक्षा नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.  क वर्ग पदासाठी होती परीक्षा आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी ही परीक्षा झाली. नगर जिल्ह्यात 29 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी 17 हजार 110 परीक्षार्थी होते. कंपनीचे जिल्हा समन्वयक म्हणून रितेश रमेश गायकवाड (वय 31, रा. पुणे) यांनी काम पाहिले.  सारडा कॉलेजमधील केंद्रावर प्रकार पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिकेचे २५ फोटो  याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले. त्यानंतर संपूर्ण परीक्षा केंद्रातील सर्वांच्या हॉल तिकिटाची पुन्हा तपासणी करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

जालना, औरंगाबादचे डमी विद्यार्थी नगरला पकडले, आरोग्य विभागाची परीक्षा नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.  क वर्ग पदासाठी होती परीक्षा आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी ही परीक्षा झाली. नगर जिल्ह्यात 29 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी 17 हजार 110 परीक्षार्थी होते. कंपनीचे जिल्हा समन्वयक म्हणून रितेश रमेश गायकवाड (वय 31, रा. पुणे) यांनी काम पाहिले.  सारडा कॉलेजमधील केंद्रावर प्रकार पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिकेचे २५ फोटो  याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले. त्यानंतर संपूर्ण परीक्षा केंद्रातील सर्वांच्या हॉल तिकिटाची पुन्हा तपासणी करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Mxg26M

No comments:

Post a Comment