आमदार निधीवरून कुडाळात खडाजंगी  कुडाळ (सिंधुदुर्ग) - नगरपंचायतचा निधी असताना त्याच कामासाठी आमदारांचा निधी कशासाठी? या मुद्‌द्‌यावरून माजी नगराध्यक्ष विनायक राणे व शिवसेना नगरसेवक सचिन काळप यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अतिक्रमण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले.  येथील नगरपंचायतची सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष तेली यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, मुख्याधिकारी नितीन गाढवे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. कचऱ्याच्या प्रश्‍नावरून नगरसेवक एजाज नाईक यांनी येथील सिद्धीविनायक हॉलपासून पुढे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुर्घंधीकडे लक्ष वेधले. यावेळी संध्या तेरसे यांनी भंगारवालेही अतिक्रमण करत आहेत, याकडे लक्ष वेधले. यावेळी नगराध्यक्ष तेली यांनी आता रस्ता कुणाचा आहे? याकडे लक्ष न देता संबंधितांवर कारवाई करा, असे आदेश दिले. येथील नगरपंचायत हद्दीत स्ट्रीट लाईट व विहीरीसाठी आमदार वैभव नाईक यांनी निधी दिला. त्या निधीला भाजप नगरसेवक विनायक राणे व राकेश कांदे यांनी आक्षेप घेत मंजूर कामांना आमदारांनी निधी कसा काय दिला? तो निधी अन्य ठिकाणी खर्च घालण्यात यावा. स्ट्रीट लाईट व विहीरीचे काम नगरपंचायतच्या निधीमधूनच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. यावेळी सचिन काळप यांनी आक्रमक भुमिका घेत शिवसेना आमदार नाईक यांच्या विकास निधीला प्रत्येक वेळी तुम्ही विरोध का करता? असा सवाल उपस्थित केला. यावेळी काळप व राणे यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. यावेळी सौ. प्रज्ञा राणे यांनी नेत्यांवर टिका टिपणी करू नका, अशी सुचना केली. यावेळी सभागृहातील वातावरण काही वेळ तंग झाले होते.  येथील उद्यमनगरमधील अर्धवट रस्त्याचे काम झाल्यामुळे शहराच्या विकास कामाला अडथळा होतो, याकडे राकेश कांदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या रस्त्याच्या संबंधित विभागाला स्मरणपत्र पाठवा व यापुढे अशी अर्धवट कामे ठेवू नका, अशी सुचना केली. नगरपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम राबवावी. त्याकरिता आता येणाऱ्या आचार संहितेचा प्रशासनाने बाऊ करू नये, अशी सुचना केली.  कुडाळ-कुंभारवाडी येथील मंजूर विहीरीचे बांधकाम करणे, अशी सुचना सायली मांजरेकर यांनी करुन नगरपंचायत निधीतूनच विहीर व्हावी, अशी मागणी केली. यावेळी बाळा वेंगुर्लेकर यांनी त्या कामासाठी आमदार नाईक यांचा निधी आहे, तसे पत्र आले आहे, याकडे लक्ष वेधत आमदार नाईक यांच्या निधीतून विहीर व्हावी, अशी मागणी केली. शासनाचे हे पत्र आहे. प्रशासनाने हे लक्षात घ्यावे, अशी सुचना मेघा सुकी यांनी केली.  इतर काही निर्णय  दिव्यांगांना निधी वाटपाबाबत चर्चा होवून 29 बांधवांना 10 हजार रुपये, नवीन दिव्यांग 5 जणांना 25 हजार रुपये आणि 10 दिव्यांग बांधवांना 5 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत 25 मार्चपर्यंत जे दिव्यांग लाभार्थी अपंग सर्टिफिकेट नगरपंचायतीकडे सादर करतील त्यांनाच लाभ दिला जाईल, असा ठराव यावेळी घेण्यात आला. नगरपंचायत इमारतीच्या दर्शनी भागावर पहिल्या टर्ममधील नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांच्या नावाची पाटी लावण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.  अभिनंदनाचे ठराव  नगरपंचायत इमारत बांधकाम विकासकाची अनामत रक्कम देण्याबाबतही चर्चा होवून याप्रश्‍नी पुढील बैठकीत सौ. तेरसे यांनी विषय घेण्याबाबत सूचित केले. पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार व लाईफ टाईम हॉस्पिटलचे झालेले उद्‌घाटन, याबद्दल अभिनंदन ठराव घेण्यात आला. नगरपंचायत कर्मचारी नेवाळकर व त्यांची पत्नी नेवाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

आमदार निधीवरून कुडाळात खडाजंगी  कुडाळ (सिंधुदुर्ग) - नगरपंचायतचा निधी असताना त्याच कामासाठी आमदारांचा निधी कशासाठी? या मुद्‌द्‌यावरून माजी नगराध्यक्ष विनायक राणे व शिवसेना नगरसेवक सचिन काळप यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अतिक्रमण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले.  येथील नगरपंचायतची सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष तेली यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, मुख्याधिकारी नितीन गाढवे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. कचऱ्याच्या प्रश्‍नावरून नगरसेवक एजाज नाईक यांनी येथील सिद्धीविनायक हॉलपासून पुढे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुर्घंधीकडे लक्ष वेधले. यावेळी संध्या तेरसे यांनी भंगारवालेही अतिक्रमण करत आहेत, याकडे लक्ष वेधले. यावेळी नगराध्यक्ष तेली यांनी आता रस्ता कुणाचा आहे? याकडे लक्ष न देता संबंधितांवर कारवाई करा, असे आदेश दिले. येथील नगरपंचायत हद्दीत स्ट्रीट लाईट व विहीरीसाठी आमदार वैभव नाईक यांनी निधी दिला. त्या निधीला भाजप नगरसेवक विनायक राणे व राकेश कांदे यांनी आक्षेप घेत मंजूर कामांना आमदारांनी निधी कसा काय दिला? तो निधी अन्य ठिकाणी खर्च घालण्यात यावा. स्ट्रीट लाईट व विहीरीचे काम नगरपंचायतच्या निधीमधूनच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. यावेळी सचिन काळप यांनी आक्रमक भुमिका घेत शिवसेना आमदार नाईक यांच्या विकास निधीला प्रत्येक वेळी तुम्ही विरोध का करता? असा सवाल उपस्थित केला. यावेळी काळप व राणे यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. यावेळी सौ. प्रज्ञा राणे यांनी नेत्यांवर टिका टिपणी करू नका, अशी सुचना केली. यावेळी सभागृहातील वातावरण काही वेळ तंग झाले होते.  येथील उद्यमनगरमधील अर्धवट रस्त्याचे काम झाल्यामुळे शहराच्या विकास कामाला अडथळा होतो, याकडे राकेश कांदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या रस्त्याच्या संबंधित विभागाला स्मरणपत्र पाठवा व यापुढे अशी अर्धवट कामे ठेवू नका, अशी सुचना केली. नगरपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम राबवावी. त्याकरिता आता येणाऱ्या आचार संहितेचा प्रशासनाने बाऊ करू नये, अशी सुचना केली.  कुडाळ-कुंभारवाडी येथील मंजूर विहीरीचे बांधकाम करणे, अशी सुचना सायली मांजरेकर यांनी करुन नगरपंचायत निधीतूनच विहीर व्हावी, अशी मागणी केली. यावेळी बाळा वेंगुर्लेकर यांनी त्या कामासाठी आमदार नाईक यांचा निधी आहे, तसे पत्र आले आहे, याकडे लक्ष वेधत आमदार नाईक यांच्या निधीतून विहीर व्हावी, अशी मागणी केली. शासनाचे हे पत्र आहे. प्रशासनाने हे लक्षात घ्यावे, अशी सुचना मेघा सुकी यांनी केली.  इतर काही निर्णय  दिव्यांगांना निधी वाटपाबाबत चर्चा होवून 29 बांधवांना 10 हजार रुपये, नवीन दिव्यांग 5 जणांना 25 हजार रुपये आणि 10 दिव्यांग बांधवांना 5 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत 25 मार्चपर्यंत जे दिव्यांग लाभार्थी अपंग सर्टिफिकेट नगरपंचायतीकडे सादर करतील त्यांनाच लाभ दिला जाईल, असा ठराव यावेळी घेण्यात आला. नगरपंचायत इमारतीच्या दर्शनी भागावर पहिल्या टर्ममधील नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांच्या नावाची पाटी लावण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.  अभिनंदनाचे ठराव  नगरपंचायत इमारत बांधकाम विकासकाची अनामत रक्कम देण्याबाबतही चर्चा होवून याप्रश्‍नी पुढील बैठकीत सौ. तेरसे यांनी विषय घेण्याबाबत सूचित केले. पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार व लाईफ टाईम हॉस्पिटलचे झालेले उद्‌घाटन, याबद्दल अभिनंदन ठराव घेण्यात आला. नगरपंचायत कर्मचारी नेवाळकर व त्यांची पत्नी नेवाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Z3ZbuU

No comments:

Post a Comment