कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घसरले; पुणे जिल्ह्यात मृत्यूदर दोन टक्क्यांवर  पुणे - पुणे जिल्ह्यात कोरोनाचे निदान झालेल्या प्रत्येक शंभरपैकी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११ वरून २ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सलग दहा महिने कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर नियंत्रित करण्यात यश आल्याचे चित्र सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. मात्र, पुणेकरांनो, धोका पूर्ण टळला नाही, हे प्रकर्षाने लक्षात घ्या. त्यामुळे मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंगचा काटेकोर वापर करून कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवा, असा सल्लाही खात्याने दिला आहे.  महाराष्ट्रात ९ मार्चपासून आतापर्यंत २० लाख ४१ हजार ३९८ रुग्णांना कोरोना झाला. आता हे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण ५६०.९दिवसांपर्यंत वाढले आहे. तसेच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५. ७२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. असे चित्र राज्याच्या पातळीवर दिसत आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक ‘रिकव्हरी रेट’ असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्... बरे होणाऱ्यांचा पुण्यात उच्चांक  पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनावर उपचार करण्याचा आलेला अनुभव, उपचारासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधीत रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६. ०५ टक्के आहे, असेही सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले.  'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे मृत्यूचे प्रमाण नीचांकी  पुण्यात कोरोनाचा पहिला मृत्यू ३० मार्चला झाला. त्यानंतर अवघ्या १२ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११. ४ टक्क्यांपर्यंत वाढले. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुण्यातील हा मृत्यूदर २ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.  राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती  कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या : 20 लाख 41 हजार 398  रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी : 561 दिवस  उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या : 34 हजार 934 (1.71 टक्के)  मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : 51 हजार 280 (2.51 टक्के)  कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर! कोरोनाचा साथरोग उद्रेक म्हणून संपत आहे. त्यामुळे नेहमी आढळणाऱ्या एखाद्या आजाराप्रमाणे तो राहील. मात्र, ब्राझील, इंग्लंडमध्ये या विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल होऊन, त्याने पुन्हा डोकं वर काढल्याचे दिसते. त्यासाठी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे अद्यापही गरजेचे आहे.  - डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घसरले; पुणे जिल्ह्यात मृत्यूदर दोन टक्क्यांवर  पुणे - पुणे जिल्ह्यात कोरोनाचे निदान झालेल्या प्रत्येक शंभरपैकी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११ वरून २ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सलग दहा महिने कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर नियंत्रित करण्यात यश आल्याचे चित्र सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. मात्र, पुणेकरांनो, धोका पूर्ण टळला नाही, हे प्रकर्षाने लक्षात घ्या. त्यामुळे मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंगचा काटेकोर वापर करून कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवा, असा सल्लाही खात्याने दिला आहे.  महाराष्ट्रात ९ मार्चपासून आतापर्यंत २० लाख ४१ हजार ३९८ रुग्णांना कोरोना झाला. आता हे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण ५६०.९दिवसांपर्यंत वाढले आहे. तसेच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५. ७२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. असे चित्र राज्याच्या पातळीवर दिसत आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक ‘रिकव्हरी रेट’ असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्... बरे होणाऱ्यांचा पुण्यात उच्चांक  पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनावर उपचार करण्याचा आलेला अनुभव, उपचारासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधीत रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६. ०५ टक्के आहे, असेही सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले.  'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे मृत्यूचे प्रमाण नीचांकी  पुण्यात कोरोनाचा पहिला मृत्यू ३० मार्चला झाला. त्यानंतर अवघ्या १२ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११. ४ टक्क्यांपर्यंत वाढले. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुण्यातील हा मृत्यूदर २ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.  राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती  कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या : 20 लाख 41 हजार 398  रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी : 561 दिवस  उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या : 34 हजार 934 (1.71 टक्के)  मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : 51 हजार 280 (2.51 टक्के)  कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर! कोरोनाचा साथरोग उद्रेक म्हणून संपत आहे. त्यामुळे नेहमी आढळणाऱ्या एखाद्या आजाराप्रमाणे तो राहील. मात्र, ब्राझील, इंग्लंडमध्ये या विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल होऊन, त्याने पुन्हा डोकं वर काढल्याचे दिसते. त्यासाठी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे अद्यापही गरजेचे आहे.  - डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aHWgO6

No comments:

Post a Comment