तोंडाचा घाण वास येतोय? हे पाच घरगुती उपाय ठरतील फायद्याचे नाशिक : व्यक्तीच्या सामाजिक जीवनात त्याच्या दैनंदिन सवयी चांगल्या असणे अत्यंत महत्वाचे ठरते.  त्यातल्या त्यात शरीर स्वच्छतेच्या बाबतीत तर निष्काळजीपणा एखाद्याला व्यावहारिक जीवनात महागात पडू शकतो. अशा वाईट इंम्प्रेशन पाडणाऱ्या सवयी टाळणे गरजेचे असते. तुम्ही महागडे, फॅशनेबल कपडे घातले, चांगलं मेकअप केलंय पण तुमच्या तोंडाचा घाण वास येत असेल, तर त्या सगळ्या थाटाला काहीच अर्थ उरत नाही. लोक सहाजिकच तुमच्यापासून दूर पळायला लागतील.  दुर्गंध येण्याची कारणे काय आहेत? बरेच लोक या समस्येने ग्रासलेले आहेत. तोंडाला वास येण्याची अनेक कारणे आहेत. वेळेवर ब्रश न करणे, जास्त मसालेदार आहार असणे, कांदा, लसूनचा जेवणात अति वापर, दारु पिणे तसेच तंबाखू आणि गुटखा असे पदार्थ चघळणे अशा अनेक कारणांमुळे तोंडातून घाण वास येऊ शकतो. तोंडाला वास येण्याचं आणखी एक महत्वाचं कारण अपचन हे देखील असू शकतं. या समस्येपासून सुटका करण शक्य आहे. या समस्येवर काही घरगुती उपया करता येतील.  तोंडाचा येणारा घाण वास घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय 1. डाळिंबाची साल डाळिंब फळाप्रमाणेच त्याची सालदेखील आरोग्यासाठी गुणकारी असते, त्याचे अनेक फायदे आहेत. या फळाची साल पाण्यात  उकळून त्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंध येणे बंद होते.  2. तुळशीची पाने घरोघरी दारात असणाऱ्या तुळशीचे औषधी गुणधर्म घरा-घरांत माहिती आहेत. तुळशीची पाने तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीची पाने चघळून खाल्याने तोंडाला येणारा घाण वास येणे बंद होते. त्यासोबतच तुळशी तोंडात आलेल्या अल्सरसारख्या समस्याही दूर करते. 3. लवंग लवंग तोंडात ठेवल्याने देखील तोंडातली दुर्गंधी घालवता येते. इतकेच नाही तर लवंग ही दात दुखत असेल तर त्यावर उपाय म्हणून वापरता येते. दात दुखी आणि तोंडाला घाण वास येणे या दोन्ही समस्यांवर लवंग हा रामबाण उपाय सांगितला जातो.  4. बडीशोप साधरणतः बडीशोप आपण जेवण झाल्यानंतर खातो. बडीशोपला माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ले जाते. बडिशोप देखील तोंडाचा वास घालवण्यासाठी परिणामकारक आहे.  5. पेरुची पाने पेरु हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी असतो, एवढेच नाही तर पेरुची पाने देखील शरिरासाठी फायदेशीर असतात, त्यांचा वापर अनेक रोगांच्या उपचारासाठी देखील वापर केला जातो. पेरुची कोवळी पाने चघळणे तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी उपयोगी ठरु शकते.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

तोंडाचा घाण वास येतोय? हे पाच घरगुती उपाय ठरतील फायद्याचे नाशिक : व्यक्तीच्या सामाजिक जीवनात त्याच्या दैनंदिन सवयी चांगल्या असणे अत्यंत महत्वाचे ठरते.  त्यातल्या त्यात शरीर स्वच्छतेच्या बाबतीत तर निष्काळजीपणा एखाद्याला व्यावहारिक जीवनात महागात पडू शकतो. अशा वाईट इंम्प्रेशन पाडणाऱ्या सवयी टाळणे गरजेचे असते. तुम्ही महागडे, फॅशनेबल कपडे घातले, चांगलं मेकअप केलंय पण तुमच्या तोंडाचा घाण वास येत असेल, तर त्या सगळ्या थाटाला काहीच अर्थ उरत नाही. लोक सहाजिकच तुमच्यापासून दूर पळायला लागतील.  दुर्गंध येण्याची कारणे काय आहेत? बरेच लोक या समस्येने ग्रासलेले आहेत. तोंडाला वास येण्याची अनेक कारणे आहेत. वेळेवर ब्रश न करणे, जास्त मसालेदार आहार असणे, कांदा, लसूनचा जेवणात अति वापर, दारु पिणे तसेच तंबाखू आणि गुटखा असे पदार्थ चघळणे अशा अनेक कारणांमुळे तोंडातून घाण वास येऊ शकतो. तोंडाला वास येण्याचं आणखी एक महत्वाचं कारण अपचन हे देखील असू शकतं. या समस्येपासून सुटका करण शक्य आहे. या समस्येवर काही घरगुती उपया करता येतील.  तोंडाचा येणारा घाण वास घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय 1. डाळिंबाची साल डाळिंब फळाप्रमाणेच त्याची सालदेखील आरोग्यासाठी गुणकारी असते, त्याचे अनेक फायदे आहेत. या फळाची साल पाण्यात  उकळून त्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंध येणे बंद होते.  2. तुळशीची पाने घरोघरी दारात असणाऱ्या तुळशीचे औषधी गुणधर्म घरा-घरांत माहिती आहेत. तुळशीची पाने तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीची पाने चघळून खाल्याने तोंडाला येणारा घाण वास येणे बंद होते. त्यासोबतच तुळशी तोंडात आलेल्या अल्सरसारख्या समस्याही दूर करते. 3. लवंग लवंग तोंडात ठेवल्याने देखील तोंडातली दुर्गंधी घालवता येते. इतकेच नाही तर लवंग ही दात दुखत असेल तर त्यावर उपाय म्हणून वापरता येते. दात दुखी आणि तोंडाला घाण वास येणे या दोन्ही समस्यांवर लवंग हा रामबाण उपाय सांगितला जातो.  4. बडीशोप साधरणतः बडीशोप आपण जेवण झाल्यानंतर खातो. बडीशोपला माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ले जाते. बडिशोप देखील तोंडाचा वास घालवण्यासाठी परिणामकारक आहे.  5. पेरुची पाने पेरु हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी असतो, एवढेच नाही तर पेरुची पाने देखील शरिरासाठी फायदेशीर असतात, त्यांचा वापर अनेक रोगांच्या उपचारासाठी देखील वापर केला जातो. पेरुची कोवळी पाने चघळणे तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी उपयोगी ठरु शकते.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3a1Ukkf

No comments:

Post a Comment