Success Story : नोकरी नाकारल्याने मिळाला आत्मविश्‍वास! ‘फोर्ब्स’ या मासिकाने २०२० मध्ये जगभरातील १०० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली. यामधील एक होत्या किरण मुझुमदार-शॉ! किरण या देशातील सर्वांत मोठ्या बायो फार्मा क्षेत्रातील ‘बायोकॉन’ कंपनीच्या संस्थापिका आहेत. एकेकाळी त्यांनाही महिला असल्याने नोकरीसाठी नाकारण्यात आले होते. मात्र, खचून न जाता त्यांनी तिथूनच आत्मविश्‍वास मिळविला. किरण यांचा जन्म २३ मार्च १९५३ रोजी बंगळूरमधील गुजराती मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९७३ मध्ये त्यांनी जीवशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास केला व प्राणिशास्त्र विषयातील पदवी घेतली. त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती; परंतु त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्या वेळी त्यांचे वडील रासेंद्र मुझुमदार हे संयुक्त ब्रुअरीजचे प्रमुख ब्रूमास्टर होते. त्यांनी सुचविले की, तिने आंबवण शास्त्र शिकून ब्रूमास्टर व्हावे. कारण, या क्षेत्रात महिला काम करीत नाहीत. त्यानंतर किरण या माल्टिंग व ब्रुव्हिंगचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील फेडरेशन युनिव्हर्सिटी येथे गेल्या. १९७४ मध्ये त्या ब्रुव्हिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या एकमेव महिला होत्या. त्या वेळी त्या तिथे प्रथम आल्या. १९७५ मध्ये त्या मास्टर ब्रुव्हरची पदवी घेऊन भारतात परतल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा १९७५ ते १९७७ दरम्यान तांत्रिक सल्लागार म्हणून काम केल्यानंतर, त्यांनी बंगळूर किंवा दिल्लीत आणखी काम करण्याची शक्यता तपासली. तेव्हा त्यांना सांगितले गेले, की भारतात असे काम एका महिलेला मिळणार नाही; कारण हे पुरुषांचे काम आहे. अशी प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही त्या खचून न जाता त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी पुढे स्कॉटलंड येथे काम केल्यानंतर त्यांनी १९७८ मध्ये ‘बायोकॉन’ची सुरुवात केली. बँकांना त्यांच्या व्यवसायाच्या कल्पनेवर विश्वास नसल्याने उद्योग सुरू करण्यासाठी कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नव्हती. शेवटी, १० हजार रुपयांच्या प्रारंभिक भांडवलावर भाड्याच्या घराच्या बाहेरील गॅरेजमध्ये ‘बायोकॉन’ची सुरुवात केली. भांडवलाचा अभाव, भारतातील एंझाइम्सच्या या व्यवसायासाठी आवश्यक संसाधनांचा अभाव, अगदी वीज आणि शुद्ध पाणीपुरवठा करणे आव्हानात्मक होते. ‘बायोकॉन’च्या व्यवसायासाठी या बाबी फार महत्त्वाच्या होत्या. परंतु, या सर्व अडचणींवर यशस्वीरीत्या मात करताना किरण यांनी हे सिद्ध केले, की स्त्री केवळ घरातीलच नव्हे, तर बाहेरील परिस्थितीचेही चांगले व्यवस्थापन करू शकते. ITR भरण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया एका वर्षातच ‘बायोकॉन’ अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्ये एंझाइम्स निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी बनली. २००४ मध्ये भांडवलाच्या बाजारात पदार्पणानंतर पहिल्या दिवशीच ‘बायोकॉन’ ही एक अब्ज डॉलरचा आकडा पार करणारी दुसरी मोठी कंपनी ठरली. आज कंपनीचे भांडवल ५४ हजार कोटी रुपये आहे, तर किरण यांचा भारताच्या अब्जाधीशांमध्ये समावेश झाला आहे. २०१४ मध्ये विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या प्रगतीसाठी आणि उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना ‘ओथर गोल्ड मेडल’ मिळाले. तसेच, सरकारने त्यांना १९८९ मध्ये ‘पद्मश्री’, तर २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ देऊन गौरविले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 10, 2021

Success Story : नोकरी नाकारल्याने मिळाला आत्मविश्‍वास! ‘फोर्ब्स’ या मासिकाने २०२० मध्ये जगभरातील १०० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली. यामधील एक होत्या किरण मुझुमदार-शॉ! किरण या देशातील सर्वांत मोठ्या बायो फार्मा क्षेत्रातील ‘बायोकॉन’ कंपनीच्या संस्थापिका आहेत. एकेकाळी त्यांनाही महिला असल्याने नोकरीसाठी नाकारण्यात आले होते. मात्र, खचून न जाता त्यांनी तिथूनच आत्मविश्‍वास मिळविला. किरण यांचा जन्म २३ मार्च १९५३ रोजी बंगळूरमधील गुजराती मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९७३ मध्ये त्यांनी जीवशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास केला व प्राणिशास्त्र विषयातील पदवी घेतली. त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती; परंतु त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्या वेळी त्यांचे वडील रासेंद्र मुझुमदार हे संयुक्त ब्रुअरीजचे प्रमुख ब्रूमास्टर होते. त्यांनी सुचविले की, तिने आंबवण शास्त्र शिकून ब्रूमास्टर व्हावे. कारण, या क्षेत्रात महिला काम करीत नाहीत. त्यानंतर किरण या माल्टिंग व ब्रुव्हिंगचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील फेडरेशन युनिव्हर्सिटी येथे गेल्या. १९७४ मध्ये त्या ब्रुव्हिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या एकमेव महिला होत्या. त्या वेळी त्या तिथे प्रथम आल्या. १९७५ मध्ये त्या मास्टर ब्रुव्हरची पदवी घेऊन भारतात परतल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा १९७५ ते १९७७ दरम्यान तांत्रिक सल्लागार म्हणून काम केल्यानंतर, त्यांनी बंगळूर किंवा दिल्लीत आणखी काम करण्याची शक्यता तपासली. तेव्हा त्यांना सांगितले गेले, की भारतात असे काम एका महिलेला मिळणार नाही; कारण हे पुरुषांचे काम आहे. अशी प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही त्या खचून न जाता त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी पुढे स्कॉटलंड येथे काम केल्यानंतर त्यांनी १९७८ मध्ये ‘बायोकॉन’ची सुरुवात केली. बँकांना त्यांच्या व्यवसायाच्या कल्पनेवर विश्वास नसल्याने उद्योग सुरू करण्यासाठी कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नव्हती. शेवटी, १० हजार रुपयांच्या प्रारंभिक भांडवलावर भाड्याच्या घराच्या बाहेरील गॅरेजमध्ये ‘बायोकॉन’ची सुरुवात केली. भांडवलाचा अभाव, भारतातील एंझाइम्सच्या या व्यवसायासाठी आवश्यक संसाधनांचा अभाव, अगदी वीज आणि शुद्ध पाणीपुरवठा करणे आव्हानात्मक होते. ‘बायोकॉन’च्या व्यवसायासाठी या बाबी फार महत्त्वाच्या होत्या. परंतु, या सर्व अडचणींवर यशस्वीरीत्या मात करताना किरण यांनी हे सिद्ध केले, की स्त्री केवळ घरातीलच नव्हे, तर बाहेरील परिस्थितीचेही चांगले व्यवस्थापन करू शकते. ITR भरण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया एका वर्षातच ‘बायोकॉन’ अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्ये एंझाइम्स निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी बनली. २००४ मध्ये भांडवलाच्या बाजारात पदार्पणानंतर पहिल्या दिवशीच ‘बायोकॉन’ ही एक अब्ज डॉलरचा आकडा पार करणारी दुसरी मोठी कंपनी ठरली. आज कंपनीचे भांडवल ५४ हजार कोटी रुपये आहे, तर किरण यांचा भारताच्या अब्जाधीशांमध्ये समावेश झाला आहे. २०१४ मध्ये विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या प्रगतीसाठी आणि उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना ‘ओथर गोल्ड मेडल’ मिळाले. तसेच, सरकारने त्यांना १९८९ मध्ये ‘पद्मश्री’, तर २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ देऊन गौरविले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3sgd3Qq

No comments:

Post a Comment