होऊ द्या चर्चा; आम्ही कधी मागे हटलो? शेतकऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यानंतर ‘आम्ही चर्चेपासून कधी मागे हटलो होतो?’ असा प्रतिप्रश्‍न शेतकरी नेत्यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, पुन्हा चर्चा सुरू करण्यास पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन स्थळांवरील इंटरनेट सेवा सरकारने बंद केल्याबद्दल टिकैत यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे शहीदी पार्कमध्ये दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज धरणे आंदोलन केले. २६ जानेवारीच्या हिंसाचारात ३०० हून जास्त पोलिस जखमी झाले होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लोकसभेतील सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मोदी यांनी, शेतकरी कधीही सरकारशी चर्चा करू शकतात असे सांगून चर्चेची दारे अद्याप खुली असल्याचे संकेत दिले होते. त्यावर टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शिवकुमार कक्काजी यांनी सांगितले की, ‘‘ शेतकरी नेत्यांनी चर्चेला कधीही नाही म्हटलेले नाही. मात्र तिन्ही कायदे मागे घ्या, या आमच्या पहिल्या मागणीपासून चर्चा सुरू व्हावी, असे आम्हाला वाटते. जर सरकारला शेतकरी एका कॉलच्या अंतरावर आहेत असे वाटत असेल तर आम्हीही सरकार केवळ एका रिंगटोनच्या अंतरावर असल्याचे मानतो. ज्या दिवशी सरकारकडून आम्हाला कॉलची घंटी वाजेल त्याच दिवशी पुन्हा चर्चेला जाऊ.’’ बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले... इंटरनेट बंद  हरियानाबरोबरच आता राजधानी दिल्लीतील आंदोलन स्थळांच्या आसपासच्या परिसरातही इंटरनेट उद्या (ता. ३१) सायंकाळपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे सीमाभागातील लोकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेट बंद केल्याचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. गाझीपूर, सिंघू, टिकरी सीमांवर इंटरनेट सेवा बंद करून, आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होत असतील तर या दडपशाहीने आंदोलन संपणार नाही असाही इशारा टिकैत यांनी दिला. भारतीय किसान युनियनचे (राजेवाल गट )अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी दिल्लीच्या सीमांवर २ फेब्रुवारीपर्यंत विक्रमी संख्येने शेतकरी दाखल होतील असा इशारा दिला आहे. फोन पे चर्चा! सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी शेतकऱ्यांसदर्भात केली 'मन की बात'  ‘आप’चा गंभीर आरोप  प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराला भाजपच जबाबदार आहे. भाजपने शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या मदतीनेच हे कारस्थान रचले होते, असा गंभीर आरोप सत्तारूढ आम आदमी पक्षाने केला आहे. या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून (एनआयए) करावी अशीही मागणी आपने केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपने या हिंसाचाराची रचना केली. भाजप नेते हेच सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी लोक आहेत व त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे  दाखल करावेत अशी मागणी ‘आप’ने या वेळी केली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

होऊ द्या चर्चा; आम्ही कधी मागे हटलो? शेतकऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यानंतर ‘आम्ही चर्चेपासून कधी मागे हटलो होतो?’ असा प्रतिप्रश्‍न शेतकरी नेत्यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, पुन्हा चर्चा सुरू करण्यास पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन स्थळांवरील इंटरनेट सेवा सरकारने बंद केल्याबद्दल टिकैत यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे शहीदी पार्कमध्ये दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज धरणे आंदोलन केले. २६ जानेवारीच्या हिंसाचारात ३०० हून जास्त पोलिस जखमी झाले होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लोकसभेतील सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मोदी यांनी, शेतकरी कधीही सरकारशी चर्चा करू शकतात असे सांगून चर्चेची दारे अद्याप खुली असल्याचे संकेत दिले होते. त्यावर टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शिवकुमार कक्काजी यांनी सांगितले की, ‘‘ शेतकरी नेत्यांनी चर्चेला कधीही नाही म्हटलेले नाही. मात्र तिन्ही कायदे मागे घ्या, या आमच्या पहिल्या मागणीपासून चर्चा सुरू व्हावी, असे आम्हाला वाटते. जर सरकारला शेतकरी एका कॉलच्या अंतरावर आहेत असे वाटत असेल तर आम्हीही सरकार केवळ एका रिंगटोनच्या अंतरावर असल्याचे मानतो. ज्या दिवशी सरकारकडून आम्हाला कॉलची घंटी वाजेल त्याच दिवशी पुन्हा चर्चेला जाऊ.’’ बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले... इंटरनेट बंद  हरियानाबरोबरच आता राजधानी दिल्लीतील आंदोलन स्थळांच्या आसपासच्या परिसरातही इंटरनेट उद्या (ता. ३१) सायंकाळपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे सीमाभागातील लोकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेट बंद केल्याचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. गाझीपूर, सिंघू, टिकरी सीमांवर इंटरनेट सेवा बंद करून, आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होत असतील तर या दडपशाहीने आंदोलन संपणार नाही असाही इशारा टिकैत यांनी दिला. भारतीय किसान युनियनचे (राजेवाल गट )अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी दिल्लीच्या सीमांवर २ फेब्रुवारीपर्यंत विक्रमी संख्येने शेतकरी दाखल होतील असा इशारा दिला आहे. फोन पे चर्चा! सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी शेतकऱ्यांसदर्भात केली 'मन की बात'  ‘आप’चा गंभीर आरोप  प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराला भाजपच जबाबदार आहे. भाजपने शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या मदतीनेच हे कारस्थान रचले होते, असा गंभीर आरोप सत्तारूढ आम आदमी पक्षाने केला आहे. या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून (एनआयए) करावी अशीही मागणी आपने केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपने या हिंसाचाराची रचना केली. भाजप नेते हेच सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी लोक आहेत व त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे  दाखल करावेत अशी मागणी ‘आप’ने या वेळी केली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2YwbMac

No comments:

Post a Comment