हरविले सुंदर, रंगीत शुभेच्छापत्रांचे दिवस; समाजमाध्यमांच्या लाटेत लोकप्रियतेला ओहोटी गडचिरोली : काही वर्षांपूर्वी नवे वर्ष, दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे असे कोणतेही सण किंवा वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असल्या की, शुभेच्छापत्र पाठविले जायचे. त्यातील सुंदर, रंगीत चमचमणाऱ्या कागदावर वळणदार अक्षरात आशयघन संदेश लिहिले जात होते. मात्र, कधीकाळी दुकानांतून रूबाबात मिरवणाऱ्या या शुभेच्छापत्रांवर आता फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांनी कुरघोडी केली असून हल्ली ही सुबक शुभेच्छापत्रे दुकानांतून दिसेनाशीच झाली आहेत. हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला... पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादीत असताना विविध प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे वापरली जायची. त्यातही छान छान कवितेच्या ओळी, सुभाषितांचा वापर असायचा. कालांतराने स्वत: लिहिण्याची, सुरेख हस्ताक्षरे काढण्याची कटकट संपवण्यासाठी तयार शुभेच्छापत्रे बाजारात आली. जाड रंगीत कागद किंवा कार्डबोर्डवर फुले, पाखरे, नाजुक वेली, नक्षीदार डिझाईनची फोल्डींगची शुभेच्छापत्रे अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. सुरुवातीला इंग्रजी भाषेतच असलेली ही शुभेच्छापत्रे मग मराठी भाषेतही उपलब्ध होऊ लागली. त्यात कविवर्य कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, सुरेश भटांपासून अनेक कवींच्या कविता प्रसंगानुरूप छापलेल्या असायच्या. कधी व. पु. काळेसारखे साहित्यिक, थोर तत्त्वज्ञ आदींची सुभाषिते असायची. मनातल्या भावना मोजक्‍या शब्दात सांगणारी ही शुभेच्छापत्रे तेव्हा एक आनंदठेवाच होती. हेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला आपल्याला हवं असलेलं शुभेच्छापत्र शोधताना त्या रंगीबेरंगी शुभेच्छापत्रांच्या सहवासात अनेक तास भुर्रकन उडून जायचे. एकीकडे ती नाजूक, रंगीत शुभेच्छापत्रे बघताना, त्यातील मजकूर वाचताना हरवलेले आपण बराच वेळ झाल्यामुळे वैगातलेल्या दुकानदाराचे भलेमोठे डोळे बघून भानावर यायचो. अखेर मनासारखे शुभेच्छापत्र मिळाल्यावर 'आनंद पोटात माझ्या माईना' अशी स्थिती व्हायची. पण, पुढे मोबाईल आला आणि त्यातून चार ओळीचे संदेश पाठवता येऊ लागले. आता व्हाट्‌सऍप व इतर अनेक आधुनिक ऍपच्या मदतीने स्वत:च हवे ते डिझाईन करून किंवा रेडीमेड मजकूर मिळवून आणि नाहीच काही सुचलं तर आवडता संदेश फॉरवर्ड करून शुभेच्छासंदेशांची देवाण-घेवाण होऊ लागले. कधीकाळी ताज्या टवटवीत असलेल्या शुभेच्छापत्रांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती सुगंधाचं दान - पूर्वी कागदी असलेल्या या शुभेच्छापत्रांना नंतर दरवळणाऱ्या मोहक सुगंधाचं दानही मिळालं होतं. अशी शुभेच्छापत्रे साधारणत: गुलाबी, मोठमोठ्या लालजर्द हृदयाकृती बदामांची रेलचेल असलेली खास व्हॅलेंटाईन डे साठी तयार केलेली असायची. कोणतं शुभेच्छापत्र कुणाला द्यायचं, याचेही काही संकेत रूढ होते. म्हणजे मित्र किंवा मैत्रीण असेल तर पिवळ्या रंगाचे शुभेच्छा पत्र, फक्त हाय, हॅलोवाले असतील, तर हिरवे किंवा नारंगी, वरीष्ठ, शिक्षक वगैरे असतील तर शुभ्र पांढरे आणि प्रियकर, प्रेयसी असेल तर गुलाबीच आणि त्यावर अत्तराचा फवारा मारलेला किंवा दुकानांत सुगंधित कागदांचीही शुभेच्छापत्रे मिळायची.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 11, 2021

हरविले सुंदर, रंगीत शुभेच्छापत्रांचे दिवस; समाजमाध्यमांच्या लाटेत लोकप्रियतेला ओहोटी गडचिरोली : काही वर्षांपूर्वी नवे वर्ष, दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे असे कोणतेही सण किंवा वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असल्या की, शुभेच्छापत्र पाठविले जायचे. त्यातील सुंदर, रंगीत चमचमणाऱ्या कागदावर वळणदार अक्षरात आशयघन संदेश लिहिले जात होते. मात्र, कधीकाळी दुकानांतून रूबाबात मिरवणाऱ्या या शुभेच्छापत्रांवर आता फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांनी कुरघोडी केली असून हल्ली ही सुबक शुभेच्छापत्रे दुकानांतून दिसेनाशीच झाली आहेत. हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला... पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादीत असताना विविध प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे वापरली जायची. त्यातही छान छान कवितेच्या ओळी, सुभाषितांचा वापर असायचा. कालांतराने स्वत: लिहिण्याची, सुरेख हस्ताक्षरे काढण्याची कटकट संपवण्यासाठी तयार शुभेच्छापत्रे बाजारात आली. जाड रंगीत कागद किंवा कार्डबोर्डवर फुले, पाखरे, नाजुक वेली, नक्षीदार डिझाईनची फोल्डींगची शुभेच्छापत्रे अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. सुरुवातीला इंग्रजी भाषेतच असलेली ही शुभेच्छापत्रे मग मराठी भाषेतही उपलब्ध होऊ लागली. त्यात कविवर्य कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, सुरेश भटांपासून अनेक कवींच्या कविता प्रसंगानुरूप छापलेल्या असायच्या. कधी व. पु. काळेसारखे साहित्यिक, थोर तत्त्वज्ञ आदींची सुभाषिते असायची. मनातल्या भावना मोजक्‍या शब्दात सांगणारी ही शुभेच्छापत्रे तेव्हा एक आनंदठेवाच होती. हेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला आपल्याला हवं असलेलं शुभेच्छापत्र शोधताना त्या रंगीबेरंगी शुभेच्छापत्रांच्या सहवासात अनेक तास भुर्रकन उडून जायचे. एकीकडे ती नाजूक, रंगीत शुभेच्छापत्रे बघताना, त्यातील मजकूर वाचताना हरवलेले आपण बराच वेळ झाल्यामुळे वैगातलेल्या दुकानदाराचे भलेमोठे डोळे बघून भानावर यायचो. अखेर मनासारखे शुभेच्छापत्र मिळाल्यावर 'आनंद पोटात माझ्या माईना' अशी स्थिती व्हायची. पण, पुढे मोबाईल आला आणि त्यातून चार ओळीचे संदेश पाठवता येऊ लागले. आता व्हाट्‌सऍप व इतर अनेक आधुनिक ऍपच्या मदतीने स्वत:च हवे ते डिझाईन करून किंवा रेडीमेड मजकूर मिळवून आणि नाहीच काही सुचलं तर आवडता संदेश फॉरवर्ड करून शुभेच्छासंदेशांची देवाण-घेवाण होऊ लागले. कधीकाळी ताज्या टवटवीत असलेल्या शुभेच्छापत्रांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती सुगंधाचं दान - पूर्वी कागदी असलेल्या या शुभेच्छापत्रांना नंतर दरवळणाऱ्या मोहक सुगंधाचं दानही मिळालं होतं. अशी शुभेच्छापत्रे साधारणत: गुलाबी, मोठमोठ्या लालजर्द हृदयाकृती बदामांची रेलचेल असलेली खास व्हॅलेंटाईन डे साठी तयार केलेली असायची. कोणतं शुभेच्छापत्र कुणाला द्यायचं, याचेही काही संकेत रूढ होते. म्हणजे मित्र किंवा मैत्रीण असेल तर पिवळ्या रंगाचे शुभेच्छा पत्र, फक्त हाय, हॅलोवाले असतील, तर हिरवे किंवा नारंगी, वरीष्ठ, शिक्षक वगैरे असतील तर शुभ्र पांढरे आणि प्रियकर, प्रेयसी असेल तर गुलाबीच आणि त्यावर अत्तराचा फवारा मारलेला किंवा दुकानांत सुगंधित कागदांचीही शुभेच्छापत्रे मिळायची.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39ngOL8

No comments:

Post a Comment