लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रसार थांबेल? पुणे- कोरोनाची वैश्‍विक साथ थोपविण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरवात झाली आहे. भारतातही स्वदेशी भारत बायोटेक उत्पादित ‘कोव्हॅक्‍सिन’ आणि सिरम उत्पादित ‘कोव्हीशिल्ड’ लसींच्या लसीकरणाला शनिवार (ता. १६) पासून सुरवात होत आहे. लस घेतल्यावर रोगप्रतिकारशक्ती तयार होईल; पण कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल का? त्याबाबत घेतलेला आढावा... लस टोचल्याने काय होते? विशिष्ट रोगाविरूद्ध लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लसी करतात. यामध्ये रोगाच्या विषाणूविरूद्ध लढणाऱ्या प्रतिपिंडांना तो शरीरात येण्याआधीच सज्ज ठेवण्याचे काम लसीकरणाच्या माध्यमातून होते. सामान्यतः लसीद्वारे शरीरात त्या रोगाला कारणीभूत अर्धमेले विषाणू किंवा त्याच्याशी निगडित प्रथिने सोडली जातात. अर्धमेल्या विषाणूंवर तुटून पडण्याची सवय प्रतिपिंडांना (अँटीबॉडी) होते. एकदा ही रंगीत तालीम झाली की, असे विषाणू आल्यावर रोगप्रतिकारशक्ती सज्ज होते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लसीसंदर्भात नवं काय? सध्या वापरातील कोरोनाच्या सर्व लसी या प्रतिपिंडांच्या (अँटीबॉडी) ‘इम्यूनोग्लोबीन-जी’ या प्रकाराशी निगडित आहे. प्रतिपिंडांचा हा प्रकार सर्वच परजीवी घटकांशी लढत असतो. अवयवाच्या आतल्या भागात असणारे हे प्रतिपींड आपली संख्या वाढवितात आणि दरोडा टाकल्यासारखे विषाणूंवर तुटून पडतात. परंतु, कोरोनाच्या बाबतीत थोडे वेगळं प्रकरण आहे. प्रतिपिंडांचा अजून एक प्रकार यात सहभागी आहे. नाक, घसा, फुफ्फुसे आदी श्‍वसनाशी निगडित अवयवांच्या बाहेरच्या भागाचे परजीवींपासून रक्षण करण्यासाठी ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ नावाचे प्रतिपिंडे कार्य करतात. त्यामुळे ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ हे प्रतिपिंडेही श्‍वसनाशी निगडित असलेल्या कोरोनाच्या विषाणूविरुद्ध सज्ज व्हायला हवेत, जेणेकरून कोरोनाचा प्रसारही रोखला जाईल. कारण, शिंकणे आणि खोकण्यातून विषाणू बाहेर पडतात. पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​ कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीमधून प्रसार कमी? कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ नावाचे प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. ते श्‍वसनमार्गावर ‘सार्स कोविड-२’ विषाणू राहत असलेल्या ठिकाणची जागा व्यापतात. पर्यायाने तेथून या विषाणूंचा प्रसार मोठ्या प्रमाणावर रोखला जातो. त्या तुलनेत लस घेतल्यानंतर ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ ही प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणावर तयार होतीलच असे नाही.  पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा लसींमुळे व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार थांबेल? लसींमुळे शरीरात वाढणारी ‘इम्यूनोग्लोबीन-जी’ हे प्रतिपिंडे श्‍वसनमार्गातून कोरोना विषाणूंच्या प्रसाराला किती थांबवतात, याबद्दल ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाही. जरी एखाद्या लसीमुळे श्‍वसनमार्गाच्या वरच्या भागात कोरोना विषाणूंची वाढ किंवा प्रजनन थांबवले, तरी तिथून विषाणूंच्या प्रसाराला ती व्यक्ती किती रोखते, हे आत्ताच सांगता येत नाही. पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  भारताचे वेगळेपण काय? देशातील कोरोनाचा मृत्यूदर लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे. ढोबळमानाने भारतीयांची कोरोनाविरूद्ध लढणारी रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. याचा अर्थ हर्ड इम्युनिटी विकसित झाली असा नाही. कारण, देशातील ७० टक्के लोकांपर्यंत कोरोना पोचलाच नाही. भारतात आजवर झालेले लसीकरण, विषाणू आणि जिवाणूंशी येणारा संपर्क आदी घटकांमुळे शरीरात विकसित झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्तीचा उपयोग होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे भारताच्या बाबतीत लस घेतल्यानंतर व्यक्तिगत पातळीवर कोरोनाचा प्रसार कमी असेल.  (स्रोत ः नेचर शोधपत्रिका, तज्ज्ञ) ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 15, 2021

लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रसार थांबेल? पुणे- कोरोनाची वैश्‍विक साथ थोपविण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरवात झाली आहे. भारतातही स्वदेशी भारत बायोटेक उत्पादित ‘कोव्हॅक्‍सिन’ आणि सिरम उत्पादित ‘कोव्हीशिल्ड’ लसींच्या लसीकरणाला शनिवार (ता. १६) पासून सुरवात होत आहे. लस घेतल्यावर रोगप्रतिकारशक्ती तयार होईल; पण कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल का? त्याबाबत घेतलेला आढावा... लस टोचल्याने काय होते? विशिष्ट रोगाविरूद्ध लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लसी करतात. यामध्ये रोगाच्या विषाणूविरूद्ध लढणाऱ्या प्रतिपिंडांना तो शरीरात येण्याआधीच सज्ज ठेवण्याचे काम लसीकरणाच्या माध्यमातून होते. सामान्यतः लसीद्वारे शरीरात त्या रोगाला कारणीभूत अर्धमेले विषाणू किंवा त्याच्याशी निगडित प्रथिने सोडली जातात. अर्धमेल्या विषाणूंवर तुटून पडण्याची सवय प्रतिपिंडांना (अँटीबॉडी) होते. एकदा ही रंगीत तालीम झाली की, असे विषाणू आल्यावर रोगप्रतिकारशक्ती सज्ज होते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लसीसंदर्भात नवं काय? सध्या वापरातील कोरोनाच्या सर्व लसी या प्रतिपिंडांच्या (अँटीबॉडी) ‘इम्यूनोग्लोबीन-जी’ या प्रकाराशी निगडित आहे. प्रतिपिंडांचा हा प्रकार सर्वच परजीवी घटकांशी लढत असतो. अवयवाच्या आतल्या भागात असणारे हे प्रतिपींड आपली संख्या वाढवितात आणि दरोडा टाकल्यासारखे विषाणूंवर तुटून पडतात. परंतु, कोरोनाच्या बाबतीत थोडे वेगळं प्रकरण आहे. प्रतिपिंडांचा अजून एक प्रकार यात सहभागी आहे. नाक, घसा, फुफ्फुसे आदी श्‍वसनाशी निगडित अवयवांच्या बाहेरच्या भागाचे परजीवींपासून रक्षण करण्यासाठी ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ नावाचे प्रतिपिंडे कार्य करतात. त्यामुळे ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ हे प्रतिपिंडेही श्‍वसनाशी निगडित असलेल्या कोरोनाच्या विषाणूविरुद्ध सज्ज व्हायला हवेत, जेणेकरून कोरोनाचा प्रसारही रोखला जाईल. कारण, शिंकणे आणि खोकण्यातून विषाणू बाहेर पडतात. पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​ कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीमधून प्रसार कमी? कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ नावाचे प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. ते श्‍वसनमार्गावर ‘सार्स कोविड-२’ विषाणू राहत असलेल्या ठिकाणची जागा व्यापतात. पर्यायाने तेथून या विषाणूंचा प्रसार मोठ्या प्रमाणावर रोखला जातो. त्या तुलनेत लस घेतल्यानंतर ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ ही प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणावर तयार होतीलच असे नाही.  पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा लसींमुळे व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार थांबेल? लसींमुळे शरीरात वाढणारी ‘इम्यूनोग्लोबीन-जी’ हे प्रतिपिंडे श्‍वसनमार्गातून कोरोना विषाणूंच्या प्रसाराला किती थांबवतात, याबद्दल ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाही. जरी एखाद्या लसीमुळे श्‍वसनमार्गाच्या वरच्या भागात कोरोना विषाणूंची वाढ किंवा प्रजनन थांबवले, तरी तिथून विषाणूंच्या प्रसाराला ती व्यक्ती किती रोखते, हे आत्ताच सांगता येत नाही. पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  भारताचे वेगळेपण काय? देशातील कोरोनाचा मृत्यूदर लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे. ढोबळमानाने भारतीयांची कोरोनाविरूद्ध लढणारी रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. याचा अर्थ हर्ड इम्युनिटी विकसित झाली असा नाही. कारण, देशातील ७० टक्के लोकांपर्यंत कोरोना पोचलाच नाही. भारतात आजवर झालेले लसीकरण, विषाणू आणि जिवाणूंशी येणारा संपर्क आदी घटकांमुळे शरीरात विकसित झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्तीचा उपयोग होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे भारताच्या बाबतीत लस घेतल्यानंतर व्यक्तिगत पातळीवर कोरोनाचा प्रसार कमी असेल.  (स्रोत ः नेचर शोधपत्रिका, तज्ज्ञ) ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3srX9SR

No comments:

Post a Comment