सरकार-वैज्ञानिकांमधील पक्का दुवा बनू; फेलोंनी व्यक्त केला विश्‍वास पुणे - देशभरातील वैज्ञानिकांची मान्यता असलेली भारतीय विज्ञान अकादमी (आयएसए) सरकारसह समाजालाही मार्गदर्शन करत असते. विज्ञानप्रसाराबरोबरच युवकांचा ओढा विज्ञानाकडे वाढला पाहिजे, यासाठी या अकादमीचे सदस्य अर्थात फेलो कार्यरत असतात. नुकतेच फेलो म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी समाज, सरकार आणि शास्त्रज्ञांमधील पक्का दुवा बनू, असा विश्‍वास ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.    - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयसरचे प्रा. अंजन बॅनर्जी, डॉ. थॉमस पुकाडील आणि डॉ. सीमा शर्मा यांची फेलो म्हणून निवड झाली आहे. अशी निवड झाल्यावर मिळणाऱ्या संधी, जबाबदारीबरोबरच पुण्याच्या विज्ञान समूहातील भविष्यकालीन योगदानाबद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. डॉ. थॉमस म्हणाले, ‘‘विज्ञानाच्या वर्तुळाबाहेर असलेल्या घटकांना सामावून घेणे, युवकांची सक्रियता वाढविण्याची जबाबदारी फेलोंची असते. वैज्ञानिक समूहाची भूमिका सरकारकडे मांडणे, त्या संबंधी सल्ला देणे, कार्यपद्धती निश्‍चित करणे आदींची जबाबदारी फेलोंची असते. विज्ञानाला समाजाभिमुख करण्याची जबाबदारी फेलोंची आहे.’ संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समूह म्हणून पुण्याची वेगाने वाढ होत आहे. यामुळे विज्ञानातील विविध शाखांबरोबरच संशोधन संस्था, शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी सहभागीता वाढत असल्याचे डॉ. शर्मा म्हणाल्या. प्रा. बॅनर्जी यांनी वैज्ञानिक म्हणून आम्ही जे काय करतो, ते लोकांपर्यंत पोचायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर विज्ञानपूरक वातावरणाचा अभाव... देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक वातावरणाचा आजही अभाव आहे. आर्थिक अनुदान, पूरक सुविधा आणि संधींची कमतरता देशात आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्यांचा टक्का तुलनेने कमी असून, पदवी नंतर विज्ञानात शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे संशोधनाकडे करियरची संधी म्हणून पाहणारे कमीच! असे मत अकादमीच्या फेलोंनी व्यक्त केले. दुसरीकडे संशोधकाला नोकरी म्हणून मिळणाऱ्या संधींचाही देशात अभाव आहे. ‘ब्रेन ड्रेन’ नक्की का होतंय, त्यामागची काय कारणे आहेत, यांचा तपास आपण घ्यायला हवा आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पोस्ट डॉकनंतर विदेशातून परतलेल्या विद्यार्थ्याला आजही देशात नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करावी लागत असल्याची खंत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. 'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर विज्ञानाच्या प्रगतीसाठी फेलोंनी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांसह सामान्य माणसांना विज्ञान क्षेत्राची दरवाजे खुली व्हावीत, यासाठी प्रयत्न करायला हवे. जनमानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहे. - डॉ. सीमा शर्मा, भौतिकशास्त्र विभाग, आयसर Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 9, 2021

सरकार-वैज्ञानिकांमधील पक्का दुवा बनू; फेलोंनी व्यक्त केला विश्‍वास पुणे - देशभरातील वैज्ञानिकांची मान्यता असलेली भारतीय विज्ञान अकादमी (आयएसए) सरकारसह समाजालाही मार्गदर्शन करत असते. विज्ञानप्रसाराबरोबरच युवकांचा ओढा विज्ञानाकडे वाढला पाहिजे, यासाठी या अकादमीचे सदस्य अर्थात फेलो कार्यरत असतात. नुकतेच फेलो म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी समाज, सरकार आणि शास्त्रज्ञांमधील पक्का दुवा बनू, असा विश्‍वास ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.    - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयसरचे प्रा. अंजन बॅनर्जी, डॉ. थॉमस पुकाडील आणि डॉ. सीमा शर्मा यांची फेलो म्हणून निवड झाली आहे. अशी निवड झाल्यावर मिळणाऱ्या संधी, जबाबदारीबरोबरच पुण्याच्या विज्ञान समूहातील भविष्यकालीन योगदानाबद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. डॉ. थॉमस म्हणाले, ‘‘विज्ञानाच्या वर्तुळाबाहेर असलेल्या घटकांना सामावून घेणे, युवकांची सक्रियता वाढविण्याची जबाबदारी फेलोंची असते. वैज्ञानिक समूहाची भूमिका सरकारकडे मांडणे, त्या संबंधी सल्ला देणे, कार्यपद्धती निश्‍चित करणे आदींची जबाबदारी फेलोंची असते. विज्ञानाला समाजाभिमुख करण्याची जबाबदारी फेलोंची आहे.’ संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समूह म्हणून पुण्याची वेगाने वाढ होत आहे. यामुळे विज्ञानातील विविध शाखांबरोबरच संशोधन संस्था, शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी सहभागीता वाढत असल्याचे डॉ. शर्मा म्हणाल्या. प्रा. बॅनर्जी यांनी वैज्ञानिक म्हणून आम्ही जे काय करतो, ते लोकांपर्यंत पोचायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर विज्ञानपूरक वातावरणाचा अभाव... देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक वातावरणाचा आजही अभाव आहे. आर्थिक अनुदान, पूरक सुविधा आणि संधींची कमतरता देशात आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्यांचा टक्का तुलनेने कमी असून, पदवी नंतर विज्ञानात शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे संशोधनाकडे करियरची संधी म्हणून पाहणारे कमीच! असे मत अकादमीच्या फेलोंनी व्यक्त केले. दुसरीकडे संशोधकाला नोकरी म्हणून मिळणाऱ्या संधींचाही देशात अभाव आहे. ‘ब्रेन ड्रेन’ नक्की का होतंय, त्यामागची काय कारणे आहेत, यांचा तपास आपण घ्यायला हवा आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पोस्ट डॉकनंतर विदेशातून परतलेल्या विद्यार्थ्याला आजही देशात नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करावी लागत असल्याची खंत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. 'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर विज्ञानाच्या प्रगतीसाठी फेलोंनी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांसह सामान्य माणसांना विज्ञान क्षेत्राची दरवाजे खुली व्हावीत, यासाठी प्रयत्न करायला हवे. जनमानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहे. - डॉ. सीमा शर्मा, भौतिकशास्त्र विभाग, आयसर Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3s9P98S

No comments:

Post a Comment