तिळगूळ आणि ‘गोडा’चे बोलणे... ‘तिळगूळ घ्या अन्‌ गोड बोला’ टाइपचे बरेचसे मेसेज काव्यपंक्तीसह जनुभाऊंच्या व्हाटस्‌अपवर आज सकाळपासून येऊ लागले. ते वाचून चरफडण्यातच त्यांचा तास गेला. त्यातच बायकोने नाश्‍ता व चहा देण्यास उशीर लावला. ‘अगं आज माझा निर्जळी उपवास नाही बरं का? सकाळपासून पाण्याचा थेंबही मिळाला नाही. रिटायर्ड माणूस आहे म्हणून एवढं दुर्लक्ष नको.’ जनुभाऊंनी खवचटपणे म्हटले. ‘अहो, आज मकरसंक्रांत आहे. किमान आजतरी गोड बोला.’ त्यांच्या बायकोने कुत्सितपणे म्हटले. ‘आम्ही बोलतो ‘तेच’ गोड मानून घ्या. आमच्याकडून नाही त्या अपेक्षा ठेवू नका.’ अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​ जनुभाऊंनी ठामपणे सांगितले. ‘दुपारी एक ते चार या वेळेत तिळगूळ द्यायला घरी येऊ नये. आल्यास आम्ही गोड बोलावे, अशी अपेक्षा ठेवू नका’ ही गेल्यावर्षी पोटमाळ्यावर ठेवलेली पाटी त्यांनी शोधून दारावर लावली. त्यानंतर मात्र ते निश्‍चिंत झाले. दोन-तीन जणांनी त्यांना मोबाईलवरच काव्यमय शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मात्र ते उखडले. ‘काही कामधंदे आहेत की नाही. ऊठसूट फोन करून शुभेच्छा देताय. शुभेच्छा देण्यासाठी व्हाटसअप व फेसबुकचा वापर करायला काय होते? फोन करून परत शुभेच्छा दिल्यास मी पोलिसांत जाईन.’ अशी धमकीच त्यांनी दिली.’ ‘अहो, आज तरी लोकांशी गोड बोला,’ बायकोने जनुभाऊंना समजावले. त्यानंतर ते थोडे नरमले. ‘बरं ठीक आहे. तू म्हणतेस म्हणून आजच्या दिवस गोड बोलेन. पण रोज माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका. माझ्या तत्वाविरोधात ही गोष्ट आहे.’ त्यानंतर जनुभाऊ सगळ्यांशीच गोड बोलू लागले. फोन करून शुभेच्छा देणाऱ्यांशी प्रेमाने व आत्मीयतेने संवाद साधू लागले. घरी येऊन तिळगूळ देणाऱ्यांच्या तब्येतीची, मुला-बाळांची चौकशी करू लागले. इतकंच काय पण मघाशी लावलेली दारावरील पाटीही त्यांनी काढून टाकली. दुपारी तीन वाजता एकजण त्यांना तिळगूळ द्यायला आला. मात्र, दुपारची झोपमोड झाली म्हणून जनुभाऊ त्याच्यावर अजिबात चिडले नाहीत. त्याचे प्रेमाने स्वागत केले. कधी नव्हे ते त्यांच्या घरात तीनच्या सुमारास बाहेरच्या व्यक्तीसाठी चहाचे आधण ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री नऊपर्यंत जनुभाऊ प्रत्येकाचे स्वागत प्रेमाने करू लागले. प्रत्येकाला तिळगूळ देत, गोड बोलू लागले. मात्र रात्री नऊच्या सुमारास जनुभाऊंना गरगरल्यासारखे वाटू लागले. थोड्याच वेळात त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. त्यांच्या बायकोने व मुलाने धावपळ केली. डॉक्‍टरांना बोलविण्यात आले. त्यांनी जनुभाऊंची तपासणी केली. त्यात त्यांची शुगर कमालीची वाढलेली दिसली. दिवसभरात त्यांच्या दिनक्रमाबाबतची माहिती डॉक्‍टरांनी जाणून घेतली. दिवसभर गोड बोलल्यानेच पेशंटला हा त्रास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेशंटला औषध-गोळ्यांची गरज नाही. कमीत कमी शब्दात दुसऱ्यांचा अपमान करण्याचा गुणधर्म त्यांनी पाळल्यास त्यांना लवकर ‘गुण’ येईल, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. तसेच दुसऱ्यांवर खेकसणे, तिरकस बोलणे व समोरच्याला कमी लेखणे आदी उपचार लवकर सुरू केल्यास पेशंट दोन तासात पूर्ववत होईल, असेही डॉक्‍टरांनी सांगितले. हे ऐकताच जनुभाऊ ताडकन उठले. ‘तुम्ही डॉक्‍टर असाल तुमच्या घरी. मला अजिबात शहाणपणा शिकवायचा नाही आणि फी म्हणून दमडीही मिळणार नाही. चला चालते व्हा.’ असे म्हणून जनुभाऊ डॉक्‍टरांवरच खेकसले. त्यानंतर पुढच्या दहा मिनिटांतच जनुभाऊंची शुगर नॉर्मल झाल्याचे निदर्शनास आले. पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

तिळगूळ आणि ‘गोडा’चे बोलणे... ‘तिळगूळ घ्या अन्‌ गोड बोला’ टाइपचे बरेचसे मेसेज काव्यपंक्तीसह जनुभाऊंच्या व्हाटस्‌अपवर आज सकाळपासून येऊ लागले. ते वाचून चरफडण्यातच त्यांचा तास गेला. त्यातच बायकोने नाश्‍ता व चहा देण्यास उशीर लावला. ‘अगं आज माझा निर्जळी उपवास नाही बरं का? सकाळपासून पाण्याचा थेंबही मिळाला नाही. रिटायर्ड माणूस आहे म्हणून एवढं दुर्लक्ष नको.’ जनुभाऊंनी खवचटपणे म्हटले. ‘अहो, आज मकरसंक्रांत आहे. किमान आजतरी गोड बोला.’ त्यांच्या बायकोने कुत्सितपणे म्हटले. ‘आम्ही बोलतो ‘तेच’ गोड मानून घ्या. आमच्याकडून नाही त्या अपेक्षा ठेवू नका.’ अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​ जनुभाऊंनी ठामपणे सांगितले. ‘दुपारी एक ते चार या वेळेत तिळगूळ द्यायला घरी येऊ नये. आल्यास आम्ही गोड बोलावे, अशी अपेक्षा ठेवू नका’ ही गेल्यावर्षी पोटमाळ्यावर ठेवलेली पाटी त्यांनी शोधून दारावर लावली. त्यानंतर मात्र ते निश्‍चिंत झाले. दोन-तीन जणांनी त्यांना मोबाईलवरच काव्यमय शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मात्र ते उखडले. ‘काही कामधंदे आहेत की नाही. ऊठसूट फोन करून शुभेच्छा देताय. शुभेच्छा देण्यासाठी व्हाटसअप व फेसबुकचा वापर करायला काय होते? फोन करून परत शुभेच्छा दिल्यास मी पोलिसांत जाईन.’ अशी धमकीच त्यांनी दिली.’ ‘अहो, आज तरी लोकांशी गोड बोला,’ बायकोने जनुभाऊंना समजावले. त्यानंतर ते थोडे नरमले. ‘बरं ठीक आहे. तू म्हणतेस म्हणून आजच्या दिवस गोड बोलेन. पण रोज माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका. माझ्या तत्वाविरोधात ही गोष्ट आहे.’ त्यानंतर जनुभाऊ सगळ्यांशीच गोड बोलू लागले. फोन करून शुभेच्छा देणाऱ्यांशी प्रेमाने व आत्मीयतेने संवाद साधू लागले. घरी येऊन तिळगूळ देणाऱ्यांच्या तब्येतीची, मुला-बाळांची चौकशी करू लागले. इतकंच काय पण मघाशी लावलेली दारावरील पाटीही त्यांनी काढून टाकली. दुपारी तीन वाजता एकजण त्यांना तिळगूळ द्यायला आला. मात्र, दुपारची झोपमोड झाली म्हणून जनुभाऊ त्याच्यावर अजिबात चिडले नाहीत. त्याचे प्रेमाने स्वागत केले. कधी नव्हे ते त्यांच्या घरात तीनच्या सुमारास बाहेरच्या व्यक्तीसाठी चहाचे आधण ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री नऊपर्यंत जनुभाऊ प्रत्येकाचे स्वागत प्रेमाने करू लागले. प्रत्येकाला तिळगूळ देत, गोड बोलू लागले. मात्र रात्री नऊच्या सुमारास जनुभाऊंना गरगरल्यासारखे वाटू लागले. थोड्याच वेळात त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. त्यांच्या बायकोने व मुलाने धावपळ केली. डॉक्‍टरांना बोलविण्यात आले. त्यांनी जनुभाऊंची तपासणी केली. त्यात त्यांची शुगर कमालीची वाढलेली दिसली. दिवसभरात त्यांच्या दिनक्रमाबाबतची माहिती डॉक्‍टरांनी जाणून घेतली. दिवसभर गोड बोलल्यानेच पेशंटला हा त्रास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेशंटला औषध-गोळ्यांची गरज नाही. कमीत कमी शब्दात दुसऱ्यांचा अपमान करण्याचा गुणधर्म त्यांनी पाळल्यास त्यांना लवकर ‘गुण’ येईल, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. तसेच दुसऱ्यांवर खेकसणे, तिरकस बोलणे व समोरच्याला कमी लेखणे आदी उपचार लवकर सुरू केल्यास पेशंट दोन तासात पूर्ववत होईल, असेही डॉक्‍टरांनी सांगितले. हे ऐकताच जनुभाऊ ताडकन उठले. ‘तुम्ही डॉक्‍टर असाल तुमच्या घरी. मला अजिबात शहाणपणा शिकवायचा नाही आणि फी म्हणून दमडीही मिळणार नाही. चला चालते व्हा.’ असे म्हणून जनुभाऊ डॉक्‍टरांवरच खेकसले. त्यानंतर पुढच्या दहा मिनिटांतच जनुभाऊंची शुगर नॉर्मल झाल्याचे निदर्शनास आले. पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ifm4Ex

No comments:

Post a Comment