लोहगावला आजपासून भामा आसखेडचे पाणी; चार टप्प्यांमध्ये पूर्व भागाला होणार पुरवठा  येरवडा - भामा आसखेड योजनेतून शनिवार (ता. 9) पासून पूर्व भागाला पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात धानोरी आणि लोहगाव परिसराला पाणी मिळणार आहे. त्यामुळे आता लोहगावकरांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.  नववर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन झाले. या योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वितरणाबाबत टिंगरे यांनी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी टिंगरे बोलत होते. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप, मनीषा शेकटकर, सुदेश कडू, विनोद क्षीरसागर उपस्थित होते.  पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; पाहा कोठे कोठे झाला पाऊस या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे पाणी प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यांत या पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शनिवारपासून संपूर्ण धानोरी आणि लोहगाव भागाला पाणी मिळणार आहे. सद्यःस्थितीला लोहगाव भागात सर्वाधिक पाणी टंचाई असून, आता आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. मात्र, भामा आसखेडमधून पाणी मिळणार असल्याने हा कालावधी तीन ते चार दिवसांवर येईल, असे टिंगरे यांनी सांगितले.  हे वाचा - एका पावसात हवेचं प्रदूषण आलं निम्म्यावर; मुंबईच्या तुलनेत पुणे ठरलं वरचढ दुसऱ्या टप्प्यात वडगाव शेरीला पाणी  या योजनेतून दुसऱ्या टप्प्यात म्हणजे साधारणत: महिनाभराने वडगाव शेरी आणि विमाननगर परिसराला पाणी मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात फुलेनगर, प्रतीकनगर, नागपूर चाळ, हाउसिंग बोर्ड या भागाला पाणी पोहचेल आणि शेवटच्या टप्प्यात येरवडा, टिंगरेनगर, कळस यांसह उर्वरित भागाला पाणी मिळणार आहे.  देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा; पुण्यात कोट्यवधींचा गुटखा जप्त​ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 8, 2021

लोहगावला आजपासून भामा आसखेडचे पाणी; चार टप्प्यांमध्ये पूर्व भागाला होणार पुरवठा  येरवडा - भामा आसखेड योजनेतून शनिवार (ता. 9) पासून पूर्व भागाला पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात धानोरी आणि लोहगाव परिसराला पाणी मिळणार आहे. त्यामुळे आता लोहगावकरांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.  नववर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन झाले. या योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वितरणाबाबत टिंगरे यांनी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी टिंगरे बोलत होते. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप, मनीषा शेकटकर, सुदेश कडू, विनोद क्षीरसागर उपस्थित होते.  पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; पाहा कोठे कोठे झाला पाऊस या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे पाणी प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यांत या पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शनिवारपासून संपूर्ण धानोरी आणि लोहगाव भागाला पाणी मिळणार आहे. सद्यःस्थितीला लोहगाव भागात सर्वाधिक पाणी टंचाई असून, आता आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. मात्र, भामा आसखेडमधून पाणी मिळणार असल्याने हा कालावधी तीन ते चार दिवसांवर येईल, असे टिंगरे यांनी सांगितले.  हे वाचा - एका पावसात हवेचं प्रदूषण आलं निम्म्यावर; मुंबईच्या तुलनेत पुणे ठरलं वरचढ दुसऱ्या टप्प्यात वडगाव शेरीला पाणी  या योजनेतून दुसऱ्या टप्प्यात म्हणजे साधारणत: महिनाभराने वडगाव शेरी आणि विमाननगर परिसराला पाणी मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात फुलेनगर, प्रतीकनगर, नागपूर चाळ, हाउसिंग बोर्ड या भागाला पाणी पोहचेल आणि शेवटच्या टप्प्यात येरवडा, टिंगरेनगर, कळस यांसह उर्वरित भागाला पाणी मिळणार आहे.  देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा; पुण्यात कोट्यवधींचा गुटखा जप्त​ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XpUdIg

No comments:

Post a Comment