कणकवलीत दोन ग्रामपंचायतींसाठी 78.31 टक्के मतदान कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली तालुक्‍यात आज दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 78.31 टक्‍के असे चुरशीचे मतदान झाले. यात तोंडवली-बावशीमध्ये 80.82 टक्‍के तर भिरवंडे ग्रामपंचायतीमध्ये 74.86 टक्‍के मतदान नोंदवले गेले. मतदान प्रक्रिया शांततेत झाली. सोमवारी (ता.18) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.  तालुक्‍यात दोन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असली तरी शिवसेना आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ होती. तालुक्‍यात तीन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. यात गांधीनगरच्या सर्व 7 जागा बिनविरोध ठरल्या. तर भिरवंडे ग्रामपंचायतीमध्ये 4 जागा बिनविरोध आल्या आहेत. येथे 3 जागांसाठी तर तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सर्व 7 जागांसाठी मतदान झाले.  भिरवंडे आणि तोंडवली ग्रामपंचायतींमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 50 टक्‍के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात दोन्ही गावांमध्ये मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तोंडवली-बावशी आणि भिरवंडे येथे एकूण 7 मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात इव्हीएम मशिनमध्ये बिघाड तसेच इतर कुठलेही अनुचित प्रकार झाले नाहीत. दोन्ही गावांमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर आपापले बूथ उभे केले होते. तसेच दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तोंडवली-बावशी आणि भिरवंडे गावात पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली होती. याखेरीज दंगल नियंत्रण पथक देखिल सज्ज ठेवण्यात आले होते.    गावनिहाय मतदान  तोंडवली-बावशी ः 2107 मतदारांपैकी 1650 मतदान  भिरवंडे ः 887 मतदारांपैकी 664 मतदान  प्रभागनिहाय मतदान  तोंडवली-बावशी ग्रामपंचायत  प्रभाग 1 ः 324 पैकी 260 मतदान (बावशी, गावठाण, बौद्धवाडी)  प्रभाग 2 ः 586 पैकी 462 मतदान (बोभाटेवाडी, सरवणकरवाडी, इस्वलकरवाडी, गावठण)  प्रभाग 3 ः 310 पैकी 251 मतदान (तोंडवली शेळीचीवाडी, धनगरवाडी, कुडतरकरवाडी)  भिरवंडे ग्रामपंचायत  प्रभाग 1 ः 588 पैकी 429 मतदान  प्रभाग 2 ः 299 पैकी 233 मतदान  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 15, 2021

कणकवलीत दोन ग्रामपंचायतींसाठी 78.31 टक्के मतदान कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली तालुक्‍यात आज दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 78.31 टक्‍के असे चुरशीचे मतदान झाले. यात तोंडवली-बावशीमध्ये 80.82 टक्‍के तर भिरवंडे ग्रामपंचायतीमध्ये 74.86 टक्‍के मतदान नोंदवले गेले. मतदान प्रक्रिया शांततेत झाली. सोमवारी (ता.18) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.  तालुक्‍यात दोन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असली तरी शिवसेना आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ होती. तालुक्‍यात तीन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. यात गांधीनगरच्या सर्व 7 जागा बिनविरोध ठरल्या. तर भिरवंडे ग्रामपंचायतीमध्ये 4 जागा बिनविरोध आल्या आहेत. येथे 3 जागांसाठी तर तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सर्व 7 जागांसाठी मतदान झाले.  भिरवंडे आणि तोंडवली ग्रामपंचायतींमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 50 टक्‍के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात दोन्ही गावांमध्ये मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तोंडवली-बावशी आणि भिरवंडे येथे एकूण 7 मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात इव्हीएम मशिनमध्ये बिघाड तसेच इतर कुठलेही अनुचित प्रकार झाले नाहीत. दोन्ही गावांमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर आपापले बूथ उभे केले होते. तसेच दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तोंडवली-बावशी आणि भिरवंडे गावात पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली होती. याखेरीज दंगल नियंत्रण पथक देखिल सज्ज ठेवण्यात आले होते.    गावनिहाय मतदान  तोंडवली-बावशी ः 2107 मतदारांपैकी 1650 मतदान  भिरवंडे ः 887 मतदारांपैकी 664 मतदान  प्रभागनिहाय मतदान  तोंडवली-बावशी ग्रामपंचायत  प्रभाग 1 ः 324 पैकी 260 मतदान (बावशी, गावठाण, बौद्धवाडी)  प्रभाग 2 ः 586 पैकी 462 मतदान (बोभाटेवाडी, सरवणकरवाडी, इस्वलकरवाडी, गावठण)  प्रभाग 3 ः 310 पैकी 251 मतदान (तोंडवली शेळीचीवाडी, धनगरवाडी, कुडतरकरवाडी)  भिरवंडे ग्रामपंचायत  प्रभाग 1 ः 588 पैकी 429 मतदान  प्रभाग 2 ः 299 पैकी 233 मतदान  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qn71vq

No comments:

Post a Comment