सिंधुदुर्गात 68 टक्के कोरोना लसीकरण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 55.08 टक्के आहे.  जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते; मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.  जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मित कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले होते. लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्‍शनसाठी 12 हजार 600 सिरीज मिळाल्या होत्या. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मिलीलीटरची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मिलीलीटर एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्यामध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे.  ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची लर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्‍शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत; परंतु यापैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही.  सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्‍सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.  जिल्ह्यात 6 केंद्रावर लसीकरण  ओरोस जिल्हा रुग्णालयात 356 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 729 जणांना, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 720 जणांना, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 234 जणांनी लस घेतली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात 258 कर्मचाऱ्यांना, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 226 जणांना लस दिली आहे.  दुसऱ्या टप्यातील लस जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉकटर व कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यशस्वीपणे लसीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारे या लसीचे दुष्परिणाम नाही.  - डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

सिंधुदुर्गात 68 टक्के कोरोना लसीकरण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 55.08 टक्के आहे.  जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते; मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.  जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मित कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले होते. लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्‍शनसाठी 12 हजार 600 सिरीज मिळाल्या होत्या. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मिलीलीटरची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मिलीलीटर एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्यामध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे.  ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची लर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्‍शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत; परंतु यापैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही.  सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्‍सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.  जिल्ह्यात 6 केंद्रावर लसीकरण  ओरोस जिल्हा रुग्णालयात 356 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 729 जणांना, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 720 जणांना, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 234 जणांनी लस घेतली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात 258 कर्मचाऱ्यांना, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 226 जणांना लस दिली आहे.  दुसऱ्या टप्यातील लस जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉकटर व कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यशस्वीपणे लसीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारे या लसीचे दुष्परिणाम नाही.  - डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MkN4He

No comments:

Post a Comment