कणकवलीत अपघातानंतर रास्ता रोको  कणकवली (सिंधुदुर्ग) - चालत्या दुचाकीवर लोखंडी पत्रा कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. दुपारी दीडच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली पटवर्धन चौकालगत ही घटना घडली. अपघातानंतर कणकवलीकरांनी एकत्र येत रास्ता रोकोही केला. पोलिस अधिकाऱ्यांनी महामार्ग ठेकेदारावर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. तर यापूर्वी अपघाताच्या घटना घडून देखील ठेकेदार जनतेच्या जीवाशी खेळत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांतून व्यक्‍त झाल्या.  कणकवली शहरातून नंदादीप सावंत (वय 45, रा.जानवली) हे जानवली येथील आपल्या घरी जात होते. दुपारी दीडच्या सुमारास पटवर्धन चौकापासून सुमारे शंभर मिटर अंतरावर महामार्गालगत उभे केलेले तीन पत्रे अचानक रस्त्यावर कोसळले. यातील एक पत्रा पायावर पडल्याने श्री. सावंत दुचाकीसह महामार्गावर फेकले गेले. अपघातानंतर स्थानिकांची तातडीने पत्रा उचलून सावंत यांना बाजूला केले. याअपघातात श्री.सावंत यांच्या पायाला दुखापती झाल्या आहेत.  अपघाताची घटना घडल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, संदीप मेस्त्री, बाळू मेस्त्री, पंचायत समिती मिलिंद मेस्त्री यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक ऍड. विराज भोसले, कन्हैया पारकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदींसह शेकडो नागरिकांनी महामार्गावर एकत्र येऊन रास्ता रोको केला. जोपर्यंत हायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोवर रास्ता रोको सुरू ठेवण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्‍त केला होता. यादरम्यान पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्री. धुमाळ यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून हायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या दरम्यान सुमारे पाऊण तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताच्या घटनेनंतर पटवर्धन चौक परिसरातील हायवे ठेकेदाराच्या कामगारांनी पळ काढला. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी महामार्गावर कोसळलेले पत्रे बाजूला केले.  तीनदा अपघात; तरीही निष्काळजी  महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वर्षभरात तीनवेळा अपघाताच्या घटना घडल्या. यात दोन वेळा उड्डाणपुलाच्या बॉक्‍सवेलची भिंत कोसळली होती. तर त्यानंतर उड्डाणपुलाचे स्लॅब देखील कोसळले होते. सुदैवाने त्यावेळी जीवित हानी झाली नव्हती. या अपघातानंतर महामार्ग ठेकेदार आणि महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या अन्य कंपनीच्या कामाबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते; मात्र अपघाताच्या घटना घडूनही ठेकेदाराकडून निष्काळजीपणा होत असल्याबाबत कणकवलीकरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

कणकवलीत अपघातानंतर रास्ता रोको  कणकवली (सिंधुदुर्ग) - चालत्या दुचाकीवर लोखंडी पत्रा कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. दुपारी दीडच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली पटवर्धन चौकालगत ही घटना घडली. अपघातानंतर कणकवलीकरांनी एकत्र येत रास्ता रोकोही केला. पोलिस अधिकाऱ्यांनी महामार्ग ठेकेदारावर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. तर यापूर्वी अपघाताच्या घटना घडून देखील ठेकेदार जनतेच्या जीवाशी खेळत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांतून व्यक्‍त झाल्या.  कणकवली शहरातून नंदादीप सावंत (वय 45, रा.जानवली) हे जानवली येथील आपल्या घरी जात होते. दुपारी दीडच्या सुमारास पटवर्धन चौकापासून सुमारे शंभर मिटर अंतरावर महामार्गालगत उभे केलेले तीन पत्रे अचानक रस्त्यावर कोसळले. यातील एक पत्रा पायावर पडल्याने श्री. सावंत दुचाकीसह महामार्गावर फेकले गेले. अपघातानंतर स्थानिकांची तातडीने पत्रा उचलून सावंत यांना बाजूला केले. याअपघातात श्री.सावंत यांच्या पायाला दुखापती झाल्या आहेत.  अपघाताची घटना घडल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, संदीप मेस्त्री, बाळू मेस्त्री, पंचायत समिती मिलिंद मेस्त्री यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक ऍड. विराज भोसले, कन्हैया पारकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदींसह शेकडो नागरिकांनी महामार्गावर एकत्र येऊन रास्ता रोको केला. जोपर्यंत हायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोवर रास्ता रोको सुरू ठेवण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्‍त केला होता. यादरम्यान पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्री. धुमाळ यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून हायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या दरम्यान सुमारे पाऊण तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताच्या घटनेनंतर पटवर्धन चौक परिसरातील हायवे ठेकेदाराच्या कामगारांनी पळ काढला. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी महामार्गावर कोसळलेले पत्रे बाजूला केले.  तीनदा अपघात; तरीही निष्काळजी  महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वर्षभरात तीनवेळा अपघाताच्या घटना घडल्या. यात दोन वेळा उड्डाणपुलाच्या बॉक्‍सवेलची भिंत कोसळली होती. तर त्यानंतर उड्डाणपुलाचे स्लॅब देखील कोसळले होते. सुदैवाने त्यावेळी जीवित हानी झाली नव्हती. या अपघातानंतर महामार्ग ठेकेदार आणि महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या अन्य कंपनीच्या कामाबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते; मात्र अपघाताच्या घटना घडूनही ठेकेदाराकडून निष्काळजीपणा होत असल्याबाबत कणकवलीकरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ok2Tf2

No comments:

Post a Comment