कोणत्या लशीत किती दम? नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सध्या परिणामकारकतेच्या कसोटीवर ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड आघाडीवर असली तरीसुद्धा भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलाही सरकारचे पाठबळ मिळालेले दिसते. या दोन्ही लशींचा हा तुलनात्मक आढावा  निर्मिती कशी  कोव्हिशिल्ड - ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेका या कंपनीने कोव्हिशिल्ड ही लस जनुकीयदृष्ट्या विकसित करण्यात आलेल्या ॲडोनोव्हायरसपासून तयार केली आहे. सर्वसाधारणपणे हा विषाणू चिम्पांझींमध्ये आढळून येतो, यात सर्पिलाकृती डीएनएचा वापर करण्यात आला आहे.  कोव्हॅक्सिन - भारत बायोटेकने या लशीच्या निर्मितीसाठी कोरोना विषाणूंच्या निष्क्रिय स्वरूपाचा वापर केला.  लशींचा प्रभाव  कोव्हिशिल्ड - ही लस सत्तर ते नव्वद टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.  कोव्हॅक्सिन - या लशीची परिणामकारकता अद्याप माहिती नाही. माकडे आणि उंदरांवर घेण्यात आलेल्या तिच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांदरम्यान मानवी शरीरामध्ये अँडिबॉडीजची निर्मिती होताना या लशीचे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले नाहीत. याचा डेटा भारत बायोटेक लवकरच सादर करणार आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उत्पादन  कोव्हिशिल्ड - या लशीचे उत्पादन भारतातील सिरम इन्स्टिट्यूट घेत आहे. जानेवारीमध्ये या लशींचे एक कोटी डोस भारत सरकारला पुरविण्याची तयारी या संस्थेने दर्शविली असून नंतर मागणीनुसार पुरवठा करण्याची कंपनीची तयारी आहे.  कोव्हॅक्सिन - भारत बायोटेकने अद्याप मोठ्या प्रमाणावर या लशीचे उत्पादन सुरू केलेले नाही.  किंमत  कोव्हिशिल्ड - सिरमने या लशीचा भारत सरकारला प्रति एक डोस दोनशे रुपयांना तर खासगी वापरासाठी एक हजार रुपयांना विकण्याची तयारी दर्शविली आहे.  कोव्हॅक्सिन - भारत बायोटेकने अद्याप या लशीची किंमत जाहीर केलेली नाही.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा यावरून संभ्रम  कोव्हिशिल्ड - या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. दोन लशींमधील अंतरांबाबत अद्याप संभ्रम आहे. ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेकाने डोस बाबत दिलेल्या माहितीमुळे संभ्रम वाढला आहे. दोन महिन्यांच्या अंतरांनी या लशीचे दोन डोस दिले जावेत की तीन याबाबत संभ्रम आहे. या लशीचे प्रमाण देखील अद्याप निश्‍चित नाही.  कोव्हॅक्सिन - डोसचे प्रमाण अद्याप अनिश्‍चित  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोव्हिशिल्ड - मात्रा - २, साठवणूक तापमान - २-८ अं. से, चाचणी टप्पे - तिन्ही पूर्ण  कोव्हॅक्सिन - मात्रा - २, साठवणूक तापमान - २-८ अं. से, चाचणी टप्पे - पहिला, दुसरा पूर्ण, तिसरा सुरू  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

कोणत्या लशीत किती दम? नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सध्या परिणामकारकतेच्या कसोटीवर ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड आघाडीवर असली तरीसुद्धा भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलाही सरकारचे पाठबळ मिळालेले दिसते. या दोन्ही लशींचा हा तुलनात्मक आढावा  निर्मिती कशी  कोव्हिशिल्ड - ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेका या कंपनीने कोव्हिशिल्ड ही लस जनुकीयदृष्ट्या विकसित करण्यात आलेल्या ॲडोनोव्हायरसपासून तयार केली आहे. सर्वसाधारणपणे हा विषाणू चिम्पांझींमध्ये आढळून येतो, यात सर्पिलाकृती डीएनएचा वापर करण्यात आला आहे.  कोव्हॅक्सिन - भारत बायोटेकने या लशीच्या निर्मितीसाठी कोरोना विषाणूंच्या निष्क्रिय स्वरूपाचा वापर केला.  लशींचा प्रभाव  कोव्हिशिल्ड - ही लस सत्तर ते नव्वद टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.  कोव्हॅक्सिन - या लशीची परिणामकारकता अद्याप माहिती नाही. माकडे आणि उंदरांवर घेण्यात आलेल्या तिच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांदरम्यान मानवी शरीरामध्ये अँडिबॉडीजची निर्मिती होताना या लशीचे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले नाहीत. याचा डेटा भारत बायोटेक लवकरच सादर करणार आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उत्पादन  कोव्हिशिल्ड - या लशीचे उत्पादन भारतातील सिरम इन्स्टिट्यूट घेत आहे. जानेवारीमध्ये या लशींचे एक कोटी डोस भारत सरकारला पुरविण्याची तयारी या संस्थेने दर्शविली असून नंतर मागणीनुसार पुरवठा करण्याची कंपनीची तयारी आहे.  कोव्हॅक्सिन - भारत बायोटेकने अद्याप मोठ्या प्रमाणावर या लशीचे उत्पादन सुरू केलेले नाही.  किंमत  कोव्हिशिल्ड - सिरमने या लशीचा भारत सरकारला प्रति एक डोस दोनशे रुपयांना तर खासगी वापरासाठी एक हजार रुपयांना विकण्याची तयारी दर्शविली आहे.  कोव्हॅक्सिन - भारत बायोटेकने अद्याप या लशीची किंमत जाहीर केलेली नाही.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा यावरून संभ्रम  कोव्हिशिल्ड - या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. दोन लशींमधील अंतरांबाबत अद्याप संभ्रम आहे. ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेकाने डोस बाबत दिलेल्या माहितीमुळे संभ्रम वाढला आहे. दोन महिन्यांच्या अंतरांनी या लशीचे दोन डोस दिले जावेत की तीन याबाबत संभ्रम आहे. या लशीचे प्रमाण देखील अद्याप निश्‍चित नाही.  कोव्हॅक्सिन - डोसचे प्रमाण अद्याप अनिश्‍चित  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोव्हिशिल्ड - मात्रा - २, साठवणूक तापमान - २-८ अं. से, चाचणी टप्पे - तिन्ही पूर्ण  कोव्हॅक्सिन - मात्रा - २, साठवणूक तापमान - २-८ अं. से, चाचणी टप्पे - पहिला, दुसरा पूर्ण, तिसरा सुरू  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3b91OD5

No comments:

Post a Comment