सावंतवाडीतही कोरोना लसीकरण धिमे  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यामध्ये कोरोना लसीकरणासाठी आतापर्यंत 30 जणांनी नकार दर्शवला आहे तर 198 जणांनी लसीकरण मोहिमेत गैरहजेरी लावली आहे. एकूण 1317 व्यक्तींपैकी 724 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून कोरोना लसीकरणासाठी काहीशी नकारात्मकता यातून दिसून येत आहे.  कोरोना आजार आटोक्‍यात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवेतील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना हे लसीकरण सुरू असून सावंतवाडी तालुक्‍यामध्ये 16 जानेवारीपासून हे लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी डॉक्‍टरांना व व तेथील कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत आहे; मात्र राज्यभरात लस घेतल्यानंतर झालेले साईड इफेक्‍ट आणि त्याबाबतचा बातम्या आल्याने ही लस घेण्यासाठी अनेकांच्या मनामध्ये नकारात्मकता दिसून आली; मात्र दुसरीकडे सकारात्मकता तितकीच दिसून येत आहे. अनेकांनी उस्फूर्तपणे ही लस टोचून घेतली आहे. तालुक्‍यात 1317 व्यक्तींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यात लसीकरण सुरू असून आत्तापर्यंत नऊवेळा लसीकरण मोहीम घेण्यात आली. यामध्ये शहरी भागातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पक्षात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर्स, नर्स, स्टाफ, कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आदी 143 जणांना ही लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कक्षेत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील 581 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील डॉक्‍टरांचाही समावेश असून 48 खाजगी डॉक्‍टर व कर्मचारी यांनाही लस देण्यात आली आहे; मात्र असे असले तरी तब्बल 198 जणांनी काहीना काही कारण पुढे करून लसीकरण मोहिमेमध्ये गैहजारी दर्शवली आहे तर 30 जणांनी लस घेण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही लस देण्यात आली आहे.  सद्य परिस्थिती लक्षात घेता कोरोनाला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. मास्क वापरण्यासाठी सुरुवातीला जशी काळजी घेतली जात होती तशी काळजी आता कुठेच घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करण्यासही लोकांच्या मनामध्ये द्विधा अवस्था दिसून येत आहे. दुसरीकडे ही लस घेतल्यानंतर मानवी शरीरावर काहीसा झालेला परिणाम व त्याबाबतच्या आलेल्या बातम्या पाहता, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ही ही लस घेतना नाराजी दिसून येत आहे. सद्यस्थितीत झालेल्या लसीकरणामधून गैरहजर आणि नकार देण्यात आलेल्या व्यक्तींमधून हे चित्र स्पष्ट होत आहे. तालुक्‍यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामधून 11 गर्भवती, 21 आजारी व्यक्ती, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली नाही. उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच खासगी डॉक्‍टरांना पुढील टप्प्यामध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये खासगी डॉक्‍टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्यात ही मोहीम सुरू असून 1317 जणांना लसीकरण होणार आहे. काहींनी नकार दर्शवला असला तरी उस्फूर्तपणे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच खासगी डॉक्‍टर हे पुढे येत आहेत. किरकोळ ताप वगळता अन्य कुठलीही लक्षणे लस घेतलेल्यांमध्ये दिसून आली नाही.  - डॉ. वर्षा शिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

सावंतवाडीतही कोरोना लसीकरण धिमे  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यामध्ये कोरोना लसीकरणासाठी आतापर्यंत 30 जणांनी नकार दर्शवला आहे तर 198 जणांनी लसीकरण मोहिमेत गैरहजेरी लावली आहे. एकूण 1317 व्यक्तींपैकी 724 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून कोरोना लसीकरणासाठी काहीशी नकारात्मकता यातून दिसून येत आहे.  कोरोना आजार आटोक्‍यात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवेतील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना हे लसीकरण सुरू असून सावंतवाडी तालुक्‍यामध्ये 16 जानेवारीपासून हे लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी डॉक्‍टरांना व व तेथील कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत आहे; मात्र राज्यभरात लस घेतल्यानंतर झालेले साईड इफेक्‍ट आणि त्याबाबतचा बातम्या आल्याने ही लस घेण्यासाठी अनेकांच्या मनामध्ये नकारात्मकता दिसून आली; मात्र दुसरीकडे सकारात्मकता तितकीच दिसून येत आहे. अनेकांनी उस्फूर्तपणे ही लस टोचून घेतली आहे. तालुक्‍यात 1317 व्यक्तींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यात लसीकरण सुरू असून आत्तापर्यंत नऊवेळा लसीकरण मोहीम घेण्यात आली. यामध्ये शहरी भागातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पक्षात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर्स, नर्स, स्टाफ, कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आदी 143 जणांना ही लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कक्षेत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील 581 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील डॉक्‍टरांचाही समावेश असून 48 खाजगी डॉक्‍टर व कर्मचारी यांनाही लस देण्यात आली आहे; मात्र असे असले तरी तब्बल 198 जणांनी काहीना काही कारण पुढे करून लसीकरण मोहिमेमध्ये गैहजारी दर्शवली आहे तर 30 जणांनी लस घेण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही लस देण्यात आली आहे.  सद्य परिस्थिती लक्षात घेता कोरोनाला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. मास्क वापरण्यासाठी सुरुवातीला जशी काळजी घेतली जात होती तशी काळजी आता कुठेच घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करण्यासही लोकांच्या मनामध्ये द्विधा अवस्था दिसून येत आहे. दुसरीकडे ही लस घेतल्यानंतर मानवी शरीरावर काहीसा झालेला परिणाम व त्याबाबतच्या आलेल्या बातम्या पाहता, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ही ही लस घेतना नाराजी दिसून येत आहे. सद्यस्थितीत झालेल्या लसीकरणामधून गैरहजर आणि नकार देण्यात आलेल्या व्यक्तींमधून हे चित्र स्पष्ट होत आहे. तालुक्‍यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामधून 11 गर्भवती, 21 आजारी व्यक्ती, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली नाही. उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच खासगी डॉक्‍टरांना पुढील टप्प्यामध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये खासगी डॉक्‍टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्यात ही मोहीम सुरू असून 1317 जणांना लसीकरण होणार आहे. काहींनी नकार दर्शवला असला तरी उस्फूर्तपणे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच खासगी डॉक्‍टर हे पुढे येत आहेत. किरकोळ ताप वगळता अन्य कुठलीही लक्षणे लस घेतलेल्यांमध्ये दिसून आली नाही.  - डॉ. वर्षा शिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3j6CvDO

No comments:

Post a Comment