वाढत्या रुग्णसंख्येतच कणकवलीत स्वॅब संकलन ठप्प  कणकवली (सिंधुदुर्ग ) - शहरातील कोरोना स्वॅब संकलन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाल्याने स्वॅब कलेक्‍शनचे काम आजपासून ठप्प झाले. जिल्ह्यात तसेच तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना संकलन केंद्र बंद झाल्याने तालुक्‍यातील संशयित नागरिकांना चाचणीसाठी ओरोस किंवा अन्य तालुक्‍यात जावे लागण्याची शक्‍यता आहे.  जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण कणकवली तालुक्‍यात सापडला होता. याखेरीज जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण कणकवली तालुक्‍यात आहेत. मे 2020 पासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयांतर्गत येथील शासकीय विश्रामगृहातील कक्षात स्वॅब संकलन केंद्र सुरू झाले. केंद्रात ऍन्टिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या होतात. दररोज सरासरी 40 स्वॅब येतात. केंद्रामुळे कणकवली शहर, तालुका तसेच तालुक्‍यासह लगतच्या देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील नागरिकांनाही स्वॅब देणे सोईस्कर होते.  या केंद्रासाठी कंत्राटी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. कर्मचाऱ्यांची नियुक्तीची मुदत 31 डिसेंबरला समाप्त होत असल्याचे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला कळविले होत; मात्र जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी स्वॅब केंद्र आजपासून बंद ठेवण्यात आले आहे.    कोरोनाचे आणखी 12 रुग्ण  जिल्ह्यात आज नवे 12 कोरोनाबाधित मिळाले. तिघे कोरोनामुक्त झाले. एकूण 222 सक्रिय आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बाधित संख्या पाच हजार 899 झाली. यातील पाच हजार 514 कोरोनामुक्त आहेत. 157 जणांचे निधन झाले. सक्रियपैकी सहाजण जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  सक्रियपैकी दोघे ऑक्‍सिजनवर तर दोघे व्हेंन्टीलेटरवर आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 28 हजार 783 नमुने तपासले. यातील चार हजार 139 पॉझिटिव्ह आहेत. आज 51 नमुने घेतले. ऍन्टिजेनमध्ये एकूण 21 हजार 350 नमुने तपासले. पैकी एक हजार 885 पॉझिटिव्ह आहेत. नवीन 65 नमूने घेतले. आतापर्यंत एकूण 50 हजार 133 नमुने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात मृत्यू) ः देवगड - 413 (9), दोडामार्ग - 334 (3), कणकवली - 1807 (39), कुडाळ - 1317 (30), मालवण - 500 (16), सावंतवाडी - 807 (42), वैभववाडी - 177 (7), वेंगुर्ले - 526, (10). जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 18 (1). तालुका निहाय सक्रिय रुग्ण ः देवगड-15, दोडामार्ग-25, कणकवली-50, कुडाळ-34, मालवण-35, सावंतवाडी-21, वैभववाडी-15, वेंगुर्ले-23 व जिल्ह्याबाहेरील - 4.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

वाढत्या रुग्णसंख्येतच कणकवलीत स्वॅब संकलन ठप्प  कणकवली (सिंधुदुर्ग ) - शहरातील कोरोना स्वॅब संकलन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाल्याने स्वॅब कलेक्‍शनचे काम आजपासून ठप्प झाले. जिल्ह्यात तसेच तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना संकलन केंद्र बंद झाल्याने तालुक्‍यातील संशयित नागरिकांना चाचणीसाठी ओरोस किंवा अन्य तालुक्‍यात जावे लागण्याची शक्‍यता आहे.  जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण कणकवली तालुक्‍यात सापडला होता. याखेरीज जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण कणकवली तालुक्‍यात आहेत. मे 2020 पासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयांतर्गत येथील शासकीय विश्रामगृहातील कक्षात स्वॅब संकलन केंद्र सुरू झाले. केंद्रात ऍन्टिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या होतात. दररोज सरासरी 40 स्वॅब येतात. केंद्रामुळे कणकवली शहर, तालुका तसेच तालुक्‍यासह लगतच्या देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील नागरिकांनाही स्वॅब देणे सोईस्कर होते.  या केंद्रासाठी कंत्राटी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. कर्मचाऱ्यांची नियुक्तीची मुदत 31 डिसेंबरला समाप्त होत असल्याचे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला कळविले होत; मात्र जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी स्वॅब केंद्र आजपासून बंद ठेवण्यात आले आहे.    कोरोनाचे आणखी 12 रुग्ण  जिल्ह्यात आज नवे 12 कोरोनाबाधित मिळाले. तिघे कोरोनामुक्त झाले. एकूण 222 सक्रिय आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बाधित संख्या पाच हजार 899 झाली. यातील पाच हजार 514 कोरोनामुक्त आहेत. 157 जणांचे निधन झाले. सक्रियपैकी सहाजण जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  सक्रियपैकी दोघे ऑक्‍सिजनवर तर दोघे व्हेंन्टीलेटरवर आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 28 हजार 783 नमुने तपासले. यातील चार हजार 139 पॉझिटिव्ह आहेत. आज 51 नमुने घेतले. ऍन्टिजेनमध्ये एकूण 21 हजार 350 नमुने तपासले. पैकी एक हजार 885 पॉझिटिव्ह आहेत. नवीन 65 नमूने घेतले. आतापर्यंत एकूण 50 हजार 133 नमुने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात मृत्यू) ः देवगड - 413 (9), दोडामार्ग - 334 (3), कणकवली - 1807 (39), कुडाळ - 1317 (30), मालवण - 500 (16), सावंतवाडी - 807 (42), वैभववाडी - 177 (7), वेंगुर्ले - 526, (10). जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 18 (1). तालुका निहाय सक्रिय रुग्ण ः देवगड-15, दोडामार्ग-25, कणकवली-50, कुडाळ-34, मालवण-35, सावंतवाडी-21, वैभववाडी-15, वेंगुर्ले-23 व जिल्ह्याबाहेरील - 4.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3rQmRjw

No comments:

Post a Comment