जातेगावात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांची सत्ता घालविण्यासाठी विरोधक एकत्र !  करमाळा (सोलापूर) : जातेगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. या निवडणुकीत आमदार शिंदे गट, जगताप गट व बागल गट, पाटील गट, शेतकरी संघटना एकत्र आल्या असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच संतोष वारे यांची सत्ता घालवण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. तर संतोष वारे हे या सर्व तगड्या मंडळींना एकतर्फी झुंज देत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  संतोष वारे हे तालुक्‍यात कट्टर बागल समर्थक म्हणून 2019 च्या विधानसभेपर्यंत ओळखले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संतोष वारे यांनी बागल गटापासून फारकत घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत. संतोष वारे यांच्या माध्यमातून जातेगाव ग्रामपंचायतीवर बागल गटाची गेली 10 वर्षे सत्ता होती. मात्र, संतोष वारे हे बागल गटापासून दूर गेल्याने जातेगाव येथील बागल समर्थक यांनी शिंदे - जगताप - पाटील गटाबरोबर मिळतेजुळते घेत संतोष वारे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे संतोष वारे यांची जातेगाव ग्रामपंचायतीवरील सत्ता कायम राहणार की जाणार? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.  जातेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी 2010 ते 2015 या कालावधीत स्वतः संतोष वारे तर 2015 ते 2017 त्यांच्या पत्नी राणी वारे या सरपंच होत्या. सध्या संतोष वारे यांच्या पत्नी पांडे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर संतोष वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. वॉर्ड क्रमांक एकमधून संदीप गोरख वारे व अच्युत कामटे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच सर्व प्रभागातील लढती रंगतदार होत आहेत.  वारेविरूद्ध वारे अशा लढती  या जातेगावात बहुसंख्येने वारे व शिंदे आडनावाचे लोक आहेत. त्यामुळेच वर्षानुवर्षे येथे वारे विरुद्ध शिंदे असे गावपातळीवर राजकीय चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. मात्र या निवडणुकीत संतोष वारे यांची सत्ता घालवण्यात शिंदे यांनी एक पाऊल मागे घेत वारे यांच्या विरोधात वारे यांच्या भावकीतीलच उमेदवारांना प्राधान्य दिले असून, यात ते यशस्वी झाले आहेत. प्रभाग दोन व तीनमध्ये वारे विरुद्ध वारे अशी लढत होत आहे.  सख्खे चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात  जातेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून सख्खे चुलते -पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शहाजी भगवान ससाणे हे संतोष वारे यांच्याकडून तर त्यांचे पुतणे छगन जगन्नाथ ससाणे हे बागल- जगताप -शिंदे - पाटील गटाकडून निवडणूक लढवत आहेत.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 10, 2021

जातेगावात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांची सत्ता घालविण्यासाठी विरोधक एकत्र !  करमाळा (सोलापूर) : जातेगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. या निवडणुकीत आमदार शिंदे गट, जगताप गट व बागल गट, पाटील गट, शेतकरी संघटना एकत्र आल्या असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच संतोष वारे यांची सत्ता घालवण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. तर संतोष वारे हे या सर्व तगड्या मंडळींना एकतर्फी झुंज देत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  संतोष वारे हे तालुक्‍यात कट्टर बागल समर्थक म्हणून 2019 च्या विधानसभेपर्यंत ओळखले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संतोष वारे यांनी बागल गटापासून फारकत घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत. संतोष वारे यांच्या माध्यमातून जातेगाव ग्रामपंचायतीवर बागल गटाची गेली 10 वर्षे सत्ता होती. मात्र, संतोष वारे हे बागल गटापासून दूर गेल्याने जातेगाव येथील बागल समर्थक यांनी शिंदे - जगताप - पाटील गटाबरोबर मिळतेजुळते घेत संतोष वारे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे संतोष वारे यांची जातेगाव ग्रामपंचायतीवरील सत्ता कायम राहणार की जाणार? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.  जातेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी 2010 ते 2015 या कालावधीत स्वतः संतोष वारे तर 2015 ते 2017 त्यांच्या पत्नी राणी वारे या सरपंच होत्या. सध्या संतोष वारे यांच्या पत्नी पांडे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर संतोष वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. वॉर्ड क्रमांक एकमधून संदीप गोरख वारे व अच्युत कामटे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच सर्व प्रभागातील लढती रंगतदार होत आहेत.  वारेविरूद्ध वारे अशा लढती  या जातेगावात बहुसंख्येने वारे व शिंदे आडनावाचे लोक आहेत. त्यामुळेच वर्षानुवर्षे येथे वारे विरुद्ध शिंदे असे गावपातळीवर राजकीय चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. मात्र या निवडणुकीत संतोष वारे यांची सत्ता घालवण्यात शिंदे यांनी एक पाऊल मागे घेत वारे यांच्या विरोधात वारे यांच्या भावकीतीलच उमेदवारांना प्राधान्य दिले असून, यात ते यशस्वी झाले आहेत. प्रभाग दोन व तीनमध्ये वारे विरुद्ध वारे अशी लढत होत आहे.  सख्खे चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात  जातेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून सख्खे चुलते -पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शहाजी भगवान ससाणे हे संतोष वारे यांच्याकडून तर त्यांचे पुतणे छगन जगन्नाथ ससाणे हे बागल- जगताप -शिंदे - पाटील गटाकडून निवडणूक लढवत आहेत.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38wE1v1

No comments:

Post a Comment