हिमालयीन पाहुणा "कंपन' अकलूजमध्ये दाखल ! वाचा या पक्ष्याची वैशिष्ट्ये  अकलूज (सोलापूर) : येथील सयाजीराजे पार्कमध्ये हिमालयातील थिरथिरा अर्थात कंपन पक्षी दाखल झाला आहे. हिमालयाच्या पर्वतरांगेत तसेच लेह - लडाख येथील मूळ वास्तव्याला असलेला कंपन पक्षी हा कस्तुरिका कुळातील असून, या पक्ष्याला इंग्रजीत "रेड स्टार्ट' असे नाव आहे. या पक्ष्याबाबत पक्षी निरीक्षक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीपासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर - जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांत स्थलांतर करून येतात.  हे पक्षी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणीच येऊन राहतात. जोडीने आलेले हे चिमुकले पक्षी उन्हाळा संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहून पावसाळ्याच्या प्रारंभी मूळ ठिकाणी परत जातात. या पक्ष्यातील वैशिष्ट्य म्हणजे, नर व मादी दोन्हींमधील शेपटी एखाद्या मद्यपी किंवा क्रोधित व्यक्तीचे हात जसे थरथरतात तसे थरथरते. याच कारणावरून या पक्ष्याला कंपन पक्षी असे नाव पडले आहे. या पक्ष्यातील नर - मादीतील फरक सहज ओळखता येतो. नर पक्षी रुबाबदार असून त्याचे डोके, पाठ व पंख कुळकुळीत काळ्या रंगाचे असतात. छातीला केशरी रंगाची छटा असते. मादी पूर्णपणे फिकट रंगाची असून तिच्या डोळ्याभोवती पिवळसर वलय असते. हे पक्षी अतिशय चपळ असून कीटक व कोळी टिपण्यासाठी सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडत राहतात.  कंपन पक्ष्याची जोडी सकाळ व संध्याकाळच्या वेळी सयाजी पार्कमधील विस्तृत हिरवळ व बोटिंगच्या पायरीजवळ भक्ष्य मटकावत वावरतानाचे दृश्‍य मनोहारी वाटते. पार्कमध्ये वाढविलेल्या सुशोभित वृक्षराजीत चिमणी वर्गीय अनेक स्थानिक तथा स्थलांतरित पक्षी आकर्षित होतात.  - स्वरूपाराणी मोहिते - पाटील,  सयाजीराजे पार्क, अकलूज  कंपन पक्षी सयाजीराजे पार्कमध्ये 2009 पासून दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात हमखास येऊन दाखल होतो, हे आमच्या निरीक्षणावरून लक्षात आले आहे. आम्ही सध्या या पक्ष्याच्या खाद्य सवयी, राहणीमान व त्याचा परतीचा प्रवास आदी घटनाक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.  - ऋतुराज कुंभार,  पक्षी निरीक्षक  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 11, 2021

हिमालयीन पाहुणा "कंपन' अकलूजमध्ये दाखल ! वाचा या पक्ष्याची वैशिष्ट्ये  अकलूज (सोलापूर) : येथील सयाजीराजे पार्कमध्ये हिमालयातील थिरथिरा अर्थात कंपन पक्षी दाखल झाला आहे. हिमालयाच्या पर्वतरांगेत तसेच लेह - लडाख येथील मूळ वास्तव्याला असलेला कंपन पक्षी हा कस्तुरिका कुळातील असून, या पक्ष्याला इंग्रजीत "रेड स्टार्ट' असे नाव आहे. या पक्ष्याबाबत पक्षी निरीक्षक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीपासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर - जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांत स्थलांतर करून येतात.  हे पक्षी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणीच येऊन राहतात. जोडीने आलेले हे चिमुकले पक्षी उन्हाळा संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहून पावसाळ्याच्या प्रारंभी मूळ ठिकाणी परत जातात. या पक्ष्यातील वैशिष्ट्य म्हणजे, नर व मादी दोन्हींमधील शेपटी एखाद्या मद्यपी किंवा क्रोधित व्यक्तीचे हात जसे थरथरतात तसे थरथरते. याच कारणावरून या पक्ष्याला कंपन पक्षी असे नाव पडले आहे. या पक्ष्यातील नर - मादीतील फरक सहज ओळखता येतो. नर पक्षी रुबाबदार असून त्याचे डोके, पाठ व पंख कुळकुळीत काळ्या रंगाचे असतात. छातीला केशरी रंगाची छटा असते. मादी पूर्णपणे फिकट रंगाची असून तिच्या डोळ्याभोवती पिवळसर वलय असते. हे पक्षी अतिशय चपळ असून कीटक व कोळी टिपण्यासाठी सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडत राहतात.  कंपन पक्ष्याची जोडी सकाळ व संध्याकाळच्या वेळी सयाजी पार्कमधील विस्तृत हिरवळ व बोटिंगच्या पायरीजवळ भक्ष्य मटकावत वावरतानाचे दृश्‍य मनोहारी वाटते. पार्कमध्ये वाढविलेल्या सुशोभित वृक्षराजीत चिमणी वर्गीय अनेक स्थानिक तथा स्थलांतरित पक्षी आकर्षित होतात.  - स्वरूपाराणी मोहिते - पाटील,  सयाजीराजे पार्क, अकलूज  कंपन पक्षी सयाजीराजे पार्कमध्ये 2009 पासून दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात हमखास येऊन दाखल होतो, हे आमच्या निरीक्षणावरून लक्षात आले आहे. आम्ही सध्या या पक्ष्याच्या खाद्य सवयी, राहणीमान व त्याचा परतीचा प्रवास आदी घटनाक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.  - ऋतुराज कुंभार,  पक्षी निरीक्षक  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Xzr8Kx

No comments:

Post a Comment