कडेगावला लोकवर्गणीतून सांडपाण्याची व्यवस्था  कडेगाव : घरफाळ्याच्या माध्यमातून नगरपंचायतीला सर्वाधिक महसूल भरणाऱ्या प्रभाग क्र. 17 मधील नागरिक विविध विकास योजनांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे चार वर्षे केवळ उपेक्षा नशिबी आलेल्या लोकांनी शेवटी नगरपंचायत कारभावर नाराज होत लोकवर्गणीतून गरजेपोटी सुमारे दोन लाख रुपये खर्चून सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटार बांधकाम केले.  नगरपंचायतीने निदान आता तरी लोकांच्या मूलभूत गरजांची पुर्तता करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत काळात अनामत रक्कम भरूनही आजपर्यंत लोकांना नळ कनेक्‍शन नाहीत, पक्के रस्ते व गटर नाहीत, अशा अनेकांनी प्रभागातील लोक ग्रासलेत.  पावसाळ्यात नागरिकांना तारेवरची कसरत चिखलातून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वीही येथील लोकवर्गणीतून वडतुकाई मंदिर रस्त्याचे मुरुमीकरण केले होते. घरफाळा भरण्यात आघाडीवर असणाऱ्या लोकांनी कारभाऱ्यांकडून होत आणलेल्या दुजाभावाबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारभारी निधी वाटप करताना दुजाभाव करत असतील तर नेत्यांनी कानउघडणी करून शहर विकासाबाबत समन्यायी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.  विरोधी पक्षातील नगरसेवक निवडून दिला याचा राग धरून या प्रभागातील कामांना जाणीवपूर्वक डावलले जाते आहे का ? स्थायीच्या सभेतून बहुचर्चित स्वच्छता ठेका, घंटा गाडी खरेदी यासारखी अनेक लाखो रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. लोकांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित आहेत. यापूढे प्रभाग क्र. 17 मध्ये असाच कामाबाबत दुजाभाव राहिला तर जनआंदोलन करु.  - नितीन शिंदे, नगरसेवक, कडेगाव        संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

कडेगावला लोकवर्गणीतून सांडपाण्याची व्यवस्था  कडेगाव : घरफाळ्याच्या माध्यमातून नगरपंचायतीला सर्वाधिक महसूल भरणाऱ्या प्रभाग क्र. 17 मधील नागरिक विविध विकास योजनांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे चार वर्षे केवळ उपेक्षा नशिबी आलेल्या लोकांनी शेवटी नगरपंचायत कारभावर नाराज होत लोकवर्गणीतून गरजेपोटी सुमारे दोन लाख रुपये खर्चून सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटार बांधकाम केले.  नगरपंचायतीने निदान आता तरी लोकांच्या मूलभूत गरजांची पुर्तता करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत काळात अनामत रक्कम भरूनही आजपर्यंत लोकांना नळ कनेक्‍शन नाहीत, पक्के रस्ते व गटर नाहीत, अशा अनेकांनी प्रभागातील लोक ग्रासलेत.  पावसाळ्यात नागरिकांना तारेवरची कसरत चिखलातून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वीही येथील लोकवर्गणीतून वडतुकाई मंदिर रस्त्याचे मुरुमीकरण केले होते. घरफाळा भरण्यात आघाडीवर असणाऱ्या लोकांनी कारभाऱ्यांकडून होत आणलेल्या दुजाभावाबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारभारी निधी वाटप करताना दुजाभाव करत असतील तर नेत्यांनी कानउघडणी करून शहर विकासाबाबत समन्यायी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.  विरोधी पक्षातील नगरसेवक निवडून दिला याचा राग धरून या प्रभागातील कामांना जाणीवपूर्वक डावलले जाते आहे का ? स्थायीच्या सभेतून बहुचर्चित स्वच्छता ठेका, घंटा गाडी खरेदी यासारखी अनेक लाखो रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. लोकांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित आहेत. यापूढे प्रभाग क्र. 17 मध्ये असाच कामाबाबत दुजाभाव राहिला तर जनआंदोलन करु.  - नितीन शिंदे, नगरसेवक, कडेगाव        संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ooD3G5

No comments:

Post a Comment