अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी; उद्यापासून "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरी मुंबई  : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी बुधवारपासून (ता. 13) "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी' राबवण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये महाविद्यालय अलॉट न झालेले, मिळालेला प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण, दहावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी असलेले विद्यार्थी या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.  प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्ग ठरविले असून, 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पहिली संधी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमे 80 टक्के व त्यापेक्षा, 70 टक्के व त्यापेक्षा जास्त, 60 टक्के व त्यापेक्षा जास्त, 50 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी ही अकरावी प्रवेशाची अखेरची फेरी असणार आहे. या फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही, असे आवाहन शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे. तसेच 29 जानेवारीपासून एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 'आतापर्यंत झालेले प्रवेश  कला- 19,346  वाणिज्य- 1,11,211  विज्ञान- 63,300  एचएसव्हीसी- 2279  एकूण- 1,96,136  (मुंबई विभागात अकरावीच्या एकूण 3,20,390 जागा असून, या प्रवेशानंतर 1 लाख 24 हजार 254 जागा रिक्त आहेत.)  प्रवेशाचे वेळापत्रक  - 13 जानेवारी- 90 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 13 ते 15 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 15 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 16 जानेवारी- 80 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 16 ते 18 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 18 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 18 जानेवारी- 79 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 19 ते 20 जानेवारी- महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे  - 20 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 21 जानेवारी- 60 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 21 ते 22 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 22 जानेवारी - रिक्त जागा जाहीर  - 23 जानेवारी- 50 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 22 ते 25 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 25 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 27 जानेवारी- उत्तीर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश  - 27 ते 28 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 28 जानेवारी- रिक्त जागा जाहीर Another chance of eleventh admission The first come first served round from tomorrow -------------------------------------- संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 11, 2021

अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी; उद्यापासून "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरी मुंबई  : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी बुधवारपासून (ता. 13) "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी' राबवण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये महाविद्यालय अलॉट न झालेले, मिळालेला प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण, दहावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी असलेले विद्यार्थी या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.  प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्ग ठरविले असून, 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पहिली संधी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमे 80 टक्के व त्यापेक्षा, 70 टक्के व त्यापेक्षा जास्त, 60 टक्के व त्यापेक्षा जास्त, 50 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी ही अकरावी प्रवेशाची अखेरची फेरी असणार आहे. या फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही, असे आवाहन शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे. तसेच 29 जानेवारीपासून एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 'आतापर्यंत झालेले प्रवेश  कला- 19,346  वाणिज्य- 1,11,211  विज्ञान- 63,300  एचएसव्हीसी- 2279  एकूण- 1,96,136  (मुंबई विभागात अकरावीच्या एकूण 3,20,390 जागा असून, या प्रवेशानंतर 1 लाख 24 हजार 254 जागा रिक्त आहेत.)  प्रवेशाचे वेळापत्रक  - 13 जानेवारी- 90 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 13 ते 15 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 15 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 16 जानेवारी- 80 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 16 ते 18 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 18 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 18 जानेवारी- 79 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 19 ते 20 जानेवारी- महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे  - 20 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 21 जानेवारी- 60 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 21 ते 22 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 22 जानेवारी - रिक्त जागा जाहीर  - 23 जानेवारी- 50 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश  - 22 ते 25 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 25 जानेवारी- रिक्त जागा जाहीर  - 27 जानेवारी- उत्तीर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश  - 27 ते 28 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे  - 28 जानेवारी- रिक्त जागा जाहीर Another chance of eleventh admission The first come first served round from tomorrow -------------------------------------- संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qf8uUi

No comments:

Post a Comment