"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार पुणे- कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली. एक कोटी दहा लाख लसीच्या डोसचा हा खरेदी आदेश असून, येत्या मंगळवारी (ता.12) सकाळपासून ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली जाणार आहे. या एका लसीच्या डोसची किंमत 200 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.  "ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी' आणि "ऍस्ट्राझेनेका' यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील "एसआयआय'मध्ये उत्पादित "कोव्हिशिल्ड' लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या "सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) एक जानेवारीला परवागनी दिली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीच्या खरेदी पहिली खरेदी ऑर्डर "एसआयआय'ला मिळाली. केंद्राने 22 कोटी डोस खरेदी करण्याबद्दल चर्चा झाली होती. पहिल्या टप्प्यात एक कोटी 10 लाख लसीचे डोस खरेदी करण्याचा येत असल्याची माहिती "एसआयआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांना ही लस दिली जाईल. त्यात डॉक्‍टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यापासून ते रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. केंद्रातर्फे ही लस खरेदीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली.  पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​ पुण्यातून देशभरात वितरण  कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्‍सिन लस पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रापर्यंत लस वितरणासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सीरम इन्स्टिट्युटमध्ये गेले. तेथे ट्रकमध्ये लसीचे डोस अपोलड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  "कोव्हॅक्‍सिन'ही सज्ज  "सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन आणि सीरमची कोव्हिया दोन लसींना आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली. "ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनी याची माहिती दिली. त्यानंतर अकरा दिवसांनी आता लस वितरण होत आहे. या दरम्यान लशीची नेमकी खरेदी किंमत, कोणत्या कंपनीच्या किती लसी सरकार खरेदी करेल, त्याचे वितरण व्यवस्था कशी असेल, त्याचे लसीकरण कसे होईल याची तयारी या अकरा दिवसांमध्ये करण्यात येईल. ही तयारी आणि खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लस वितरणाच्या टप्पा सुरू होत आहे.  सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​ दिवसभरात काय घडले?  "सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'कडून लस वितरणासाठी तयारी - सकाळी 10 वाजता  - लस वाहतुकीसाठी अत्यावश्‍यक वाहन व्यवस्था आकुर्डी येथे सज्ज - दुपारी 12  - केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटला ऑफ इंडियाला लस खरेदीची "आर्डर' मिळाली - दुपारी 4  आकुर्डीकडून हडपसर येथील सीरमच्या लस डेपोकडे लस वितरणाची वाहने रवाना - 5 वाजता  लस वितरणासाठी राज्य सरकारला विचारणा - संध्याकाळी 7  केंद्राकडून लस वितरणाच्या अधिकृत मेलची प्रतीक्षा - रात्री 7.30  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लस वितरणासाठी अधिकाऱ्यांबरोबर "व्हिडिओ कॉंन्फरन्सिंग' - रात्री 8  'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप ""सिरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्‍सिन या दोन्ही लसी राज्यात केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. कोव्हॅक्‍सिनची 20 हजार लसीचे डोस प्रत्येक राज्यांना मिळणार आहेत. तर, संपूर्ण देशासाठी एक कोटी 10 लाख डोस खरेदी केले आहेत. त्यापैकी 10 टक्के म्हणजे 9 ते 10 लाख डोस महाराष्ट्राला मिळतील,''  - डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 11, 2021

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार पुणे- कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली. एक कोटी दहा लाख लसीच्या डोसचा हा खरेदी आदेश असून, येत्या मंगळवारी (ता.12) सकाळपासून ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली जाणार आहे. या एका लसीच्या डोसची किंमत 200 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.  "ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी' आणि "ऍस्ट्राझेनेका' यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील "एसआयआय'मध्ये उत्पादित "कोव्हिशिल्ड' लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या "सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) एक जानेवारीला परवागनी दिली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीच्या खरेदी पहिली खरेदी ऑर्डर "एसआयआय'ला मिळाली. केंद्राने 22 कोटी डोस खरेदी करण्याबद्दल चर्चा झाली होती. पहिल्या टप्प्यात एक कोटी 10 लाख लसीचे डोस खरेदी करण्याचा येत असल्याची माहिती "एसआयआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांना ही लस दिली जाईल. त्यात डॉक्‍टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यापासून ते रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. केंद्रातर्फे ही लस खरेदीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली.  पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​ पुण्यातून देशभरात वितरण  कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्‍सिन लस पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रापर्यंत लस वितरणासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सीरम इन्स्टिट्युटमध्ये गेले. तेथे ट्रकमध्ये लसीचे डोस अपोलड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  "कोव्हॅक्‍सिन'ही सज्ज  "सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन आणि सीरमची कोव्हिया दोन लसींना आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली. "ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनी याची माहिती दिली. त्यानंतर अकरा दिवसांनी आता लस वितरण होत आहे. या दरम्यान लशीची नेमकी खरेदी किंमत, कोणत्या कंपनीच्या किती लसी सरकार खरेदी करेल, त्याचे वितरण व्यवस्था कशी असेल, त्याचे लसीकरण कसे होईल याची तयारी या अकरा दिवसांमध्ये करण्यात येईल. ही तयारी आणि खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लस वितरणाच्या टप्पा सुरू होत आहे.  सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​ दिवसभरात काय घडले?  "सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'कडून लस वितरणासाठी तयारी - सकाळी 10 वाजता  - लस वाहतुकीसाठी अत्यावश्‍यक वाहन व्यवस्था आकुर्डी येथे सज्ज - दुपारी 12  - केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटला ऑफ इंडियाला लस खरेदीची "आर्डर' मिळाली - दुपारी 4  आकुर्डीकडून हडपसर येथील सीरमच्या लस डेपोकडे लस वितरणाची वाहने रवाना - 5 वाजता  लस वितरणासाठी राज्य सरकारला विचारणा - संध्याकाळी 7  केंद्राकडून लस वितरणाच्या अधिकृत मेलची प्रतीक्षा - रात्री 7.30  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लस वितरणासाठी अधिकाऱ्यांबरोबर "व्हिडिओ कॉंन्फरन्सिंग' - रात्री 8  'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप ""सिरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्‍सिन या दोन्ही लसी राज्यात केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. कोव्हॅक्‍सिनची 20 हजार लसीचे डोस प्रत्येक राज्यांना मिळणार आहेत. तर, संपूर्ण देशासाठी एक कोटी 10 लाख डोस खरेदी केले आहेत. त्यापैकी 10 टक्के म्हणजे 9 ते 10 लाख डोस महाराष्ट्राला मिळतील,''  - डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3sfXmZc

No comments:

Post a Comment