पुण्यातील सर्व कॉलेज सुरू होणार; पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय पुणे : गेल्या महिन्याभरापासून महाविद्यालये सुरू कधी होणार याची प्रतीक्षा लागलेली असताना आता 11 जानेवारीपासून (सोमवार) सर्व अभ्यासक्रमांचे थेट वर्ग आणि प्रॅक्‍टिकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वर्ग सुरू करताना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. पुणे विद्यापीठाने प्राचार्य व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीची बैठक आज (सोमवारी) पार पडली. समितीने त्यांच्या शिफारशी व महाविद्यालये सुरू करण्याची पद्धत याचा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर केला आहे. - 'नॅशनल वॉर मेमोरिअल'चं नूतनीकरण होणार? महापालिका आयुक्तांचा स्थायी समितीकडे प्रस्ताव​ ऑगस्ट महिन्यापासून बीए, बीएससी, बीकॉमचे प्रथम वर्ष आणि अन्य व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षातील प्रथम सत्राचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. त्यांचा प्रथम सत्राचा बहुतांश अभ्यासक्रम संपला आहे. पण प्रॅक्‍टिकल होत नसल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास अडचण होत होती. त्यामुळे शाळा सुरू झाल्या, महाविद्यालये सुरू करण्याबाबत मागणी केली जात होती. इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्‍चर, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, शैक्षणिक, शारीरिक शिक्षण, विधी, बीएससी, एमएससी आदी अभ्यासक्रमांचे प्रथम सत्राचे प्रॅक्‍टिकल 11 जानेवारीपासून सुरू होतील. तसेच ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या 50च्या आत आहे, त्यांचे प्रत्यक्ष वर्ग देखील सुरू केले जाणार आहेत. - हाथरस प्रकरणी योगी सरकारला दणका; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई​ प्रथम सत्राच्या परीक्षेनंतर लगेच द्वितीय वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठातील विभाग व संलग्न महाविद्यालयांनी त्वरित दुसऱ्या सत्राचे थेट वर्ग घेण्यास सुरवात करावी. यासाठी "यूजीसी', राज्य सरकार यांच्या नियमावलीचे पालन करावे, तसेच स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविली जात आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्षम संस्थांनी जाहीर केलेल्या तारखांनुसार थेट शिकवणी व प्रॅक्‍टिकल पूर्ण करावेत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

पुण्यातील सर्व कॉलेज सुरू होणार; पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय पुणे : गेल्या महिन्याभरापासून महाविद्यालये सुरू कधी होणार याची प्रतीक्षा लागलेली असताना आता 11 जानेवारीपासून (सोमवार) सर्व अभ्यासक्रमांचे थेट वर्ग आणि प्रॅक्‍टिकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वर्ग सुरू करताना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. पुणे विद्यापीठाने प्राचार्य व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीची बैठक आज (सोमवारी) पार पडली. समितीने त्यांच्या शिफारशी व महाविद्यालये सुरू करण्याची पद्धत याचा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर केला आहे. - 'नॅशनल वॉर मेमोरिअल'चं नूतनीकरण होणार? महापालिका आयुक्तांचा स्थायी समितीकडे प्रस्ताव​ ऑगस्ट महिन्यापासून बीए, बीएससी, बीकॉमचे प्रथम वर्ष आणि अन्य व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षातील प्रथम सत्राचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. त्यांचा प्रथम सत्राचा बहुतांश अभ्यासक्रम संपला आहे. पण प्रॅक्‍टिकल होत नसल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास अडचण होत होती. त्यामुळे शाळा सुरू झाल्या, महाविद्यालये सुरू करण्याबाबत मागणी केली जात होती. इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्‍चर, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, शैक्षणिक, शारीरिक शिक्षण, विधी, बीएससी, एमएससी आदी अभ्यासक्रमांचे प्रथम सत्राचे प्रॅक्‍टिकल 11 जानेवारीपासून सुरू होतील. तसेच ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या 50च्या आत आहे, त्यांचे प्रत्यक्ष वर्ग देखील सुरू केले जाणार आहेत. - हाथरस प्रकरणी योगी सरकारला दणका; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई​ प्रथम सत्राच्या परीक्षेनंतर लगेच द्वितीय वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठातील विभाग व संलग्न महाविद्यालयांनी त्वरित दुसऱ्या सत्राचे थेट वर्ग घेण्यास सुरवात करावी. यासाठी "यूजीसी', राज्य सरकार यांच्या नियमावलीचे पालन करावे, तसेच स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविली जात आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्षम संस्थांनी जाहीर केलेल्या तारखांनुसार थेट शिकवणी व प्रॅक्‍टिकल पूर्ण करावेत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nc9M0x

No comments:

Post a Comment