आयनोडे हेवाळेत ग्रामविकासचे वर्चस्व; शिवसेनेला धोबीपछाड दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेला धोबीपछाड देत वर्चस्व मिळविले. ग्रामविकास पॅनेलकडे चार तर शिवसेना पुरस्कृत महाविकास पॅनेलकडे तीन सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सखाराम कुंभार आणि उल्हास सुतार या दोघांना समसमान 67 मते पडली. त्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात उल्हास सुतार विजयी ठरले. त्या दोघांच्या एकूण मतात पाच नोटा अधिक करता 139 मते दाखवण्यात आली; मात्र प्रत्यक्षात झालेले एकूण मतदान 141 होते. त्यामुळे ग्रामविकासच्या उमेदवाराने आक्षेप घेतला.  यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश जाधव यांना दोन मतांच्या फरकाबाबत विचारले असता, मते 139 दिसत असली तरी ती 141 असू शकतात, असे सांगितले. याप्रकरणी ग्रामविकासच्यावतीने न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्‍यता आहे.  विजयी आणि पराभूत उमेदवार असे ः (कंसात मते)-सखाराम कुंभार (67), उल्हास सुतार (67) (चिट्ठी टाकून विजयी), नोटा (5), रूपेश कदम (89) विजयी, उदय हरिजन (49) पराभूत, नोटा (3), अश्‍विनी जाधव (97) (विजयी), प्रतीक्षा सावंत (65), नोटा (2), वैशाली गवस (118) (विजयी), मंजिरी देसाई (67) (पराभूत), समीर देसाई (114) विजयी, ओल्वीन लोबो (69) पराभूत.  हेवाळेची निवडणूक शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी महविकास पनेलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले होते. सुरुवातीला ग्रामविकासचे दोन उमेदवार साक्षी देसाई व जान्हवी खानोलकर बिनविरोध निवडून आल्या होत्या. नंतर श्रीमती खानोलकर यांनी तळ्यात मळ्यातची भूमिका घेतली. त्यांनी कधी ग्रामविकास तर कधी महाविकासच्या आपण उमेदवार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही पनेलकडे एक एक बिनविरोध उमेदवार आहे. आज निवडून आलेल्या पाच उमेदवारांमध्ये तीन उमेदवार ग्रामविकासकडे तर दोन महाविकासकडे आहेत. त्यामुळे ग्रामविकासची सदस्य संख्या चार झाल्याने त्यांना सत्ता स्थापनेची संधी आहे.  तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुखात खडाजंगी  उपतालुकाप्रमुख दौलत राणे आणि बाबुराव धुरी यांनी शिवसेनेकडून प्रतीक्षा सावंत यांना उभे केले होते. त्या पराभूत झाल्यावर तालुकाप्रमुख धुरी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अश्‍विनी जाधव यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. त्याबद्दल श्री. राणे, तालुका समन्वयक मदन राणे, संदेश राणे आदींनी श्री. धुरी यांना असलं राजकारण करायच होतं तर शिवसेनेकडून उमेदवार का उभा केला होता? असे विचारून ग्रामविकासच्या उमेदवाराचे अभिनंदन केल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांच्यात काही काळ खडाजंगीही झाली.  संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 18, 2021

आयनोडे हेवाळेत ग्रामविकासचे वर्चस्व; शिवसेनेला धोबीपछाड दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेला धोबीपछाड देत वर्चस्व मिळविले. ग्रामविकास पॅनेलकडे चार तर शिवसेना पुरस्कृत महाविकास पॅनेलकडे तीन सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सखाराम कुंभार आणि उल्हास सुतार या दोघांना समसमान 67 मते पडली. त्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात उल्हास सुतार विजयी ठरले. त्या दोघांच्या एकूण मतात पाच नोटा अधिक करता 139 मते दाखवण्यात आली; मात्र प्रत्यक्षात झालेले एकूण मतदान 141 होते. त्यामुळे ग्रामविकासच्या उमेदवाराने आक्षेप घेतला.  यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश जाधव यांना दोन मतांच्या फरकाबाबत विचारले असता, मते 139 दिसत असली तरी ती 141 असू शकतात, असे सांगितले. याप्रकरणी ग्रामविकासच्यावतीने न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्‍यता आहे.  विजयी आणि पराभूत उमेदवार असे ः (कंसात मते)-सखाराम कुंभार (67), उल्हास सुतार (67) (चिट्ठी टाकून विजयी), नोटा (5), रूपेश कदम (89) विजयी, उदय हरिजन (49) पराभूत, नोटा (3), अश्‍विनी जाधव (97) (विजयी), प्रतीक्षा सावंत (65), नोटा (2), वैशाली गवस (118) (विजयी), मंजिरी देसाई (67) (पराभूत), समीर देसाई (114) विजयी, ओल्वीन लोबो (69) पराभूत.  हेवाळेची निवडणूक शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी महविकास पनेलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले होते. सुरुवातीला ग्रामविकासचे दोन उमेदवार साक्षी देसाई व जान्हवी खानोलकर बिनविरोध निवडून आल्या होत्या. नंतर श्रीमती खानोलकर यांनी तळ्यात मळ्यातची भूमिका घेतली. त्यांनी कधी ग्रामविकास तर कधी महाविकासच्या आपण उमेदवार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही पनेलकडे एक एक बिनविरोध उमेदवार आहे. आज निवडून आलेल्या पाच उमेदवारांमध्ये तीन उमेदवार ग्रामविकासकडे तर दोन महाविकासकडे आहेत. त्यामुळे ग्रामविकासची सदस्य संख्या चार झाल्याने त्यांना सत्ता स्थापनेची संधी आहे.  तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुखात खडाजंगी  उपतालुकाप्रमुख दौलत राणे आणि बाबुराव धुरी यांनी शिवसेनेकडून प्रतीक्षा सावंत यांना उभे केले होते. त्या पराभूत झाल्यावर तालुकाप्रमुख धुरी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अश्‍विनी जाधव यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. त्याबद्दल श्री. राणे, तालुका समन्वयक मदन राणे, संदेश राणे आदींनी श्री. धुरी यांना असलं राजकारण करायच होतं तर शिवसेनेकडून उमेदवार का उभा केला होता? असे विचारून ग्रामविकासच्या उमेदवाराचे अभिनंदन केल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांच्यात काही काळ खडाजंगीही झाली.  संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3irn9t4

No comments:

Post a Comment