धरलं तर चावतंय अन्‌ अनेकांचं फावतंय ‘आमच्या बॅंकेचे क्रेडिट कार्ड घ्या’, ‘आमची विमा पॉलिसी घ्या’, ‘आमच्याकडून पर्सनल लोन घ्या’ या आणि अशा मेसेज आणि फोनने जनुभाऊ वैतागून गेले होते. सकाळी सातपासून रात्री कधीही असे फोन यायचे. त्याबद्दलही त्यांची तक्रार नव्हती. मात्र, हे फोन दुपारी एक ते चार या दरम्यान येऊ लागल्याने त्यांची चिडचिड वाढली होती.  ‘अरे आमच्या वामकुक्षीच्या वेळी कसले डोंबलाचे फोन करता ? तुम्ही देत असलेल्या त्रासाबद्दल मी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवेल ‘वाचकांच्या पत्रव्यवहारातही लिहीन’, अशी धमकी ते द्यायचे. पण काही उपयोग व्हायचा नाही. दुसऱ्या दिवशी ‘आमची ही ऑफर आहे आणि ती सवलत आहे’, असे फोन सुरू असायचे. ‘एक ते चार या वेळेत कोणीही बेल वा दार वाजवू नये, अन्यथा त्याच्या कानाखाली वाजल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही,’ अशी पाटी लावून ते निर्धास्त झाले होते. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे कोणीही फिरकत नव्हते. अगदी पाहुणेसुद्धा. मात्र, वेळी-अवेळी फोन करणाऱ्यांना धडा कसा शिकवावा, याचा ते नेहमी विचार करत असत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘अहो, त्यापेक्षा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा किंवा स्वीच ऑफ ठेवा’, जनुभाऊंच्या बायकोने तोडगा सुचवला. ‘छे. . छे. . ही तर शरणागती झाली, पळकुटेपणा झाला. मी गेल्या सत्तर वर्षांत कोणापुढे झुकलो नाही आणि आता हार मानू ? मुळीच नाही. मी लढेन, मोडेन; पण वाकणार नाही,’ जनुभाऊंनी बायकोला अर्धा तास लेक्‍चर दिले. बायकोने मात्र तोंड फिरवले. असे फोन आले की जनुभाऊ फोन करणाऱ्यांना चांगले झापायचे, नंतर धमकीही द्यायचे. हे करत असताना त्यांच्या घरातील सगळ्यांची झोप मोडायची. पुण्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या मात्र, जनुभाऊंना बोलायची कोणाची बिशाद नव्हती. नंतर जनुभाऊ संबंधित कंपनी वा बॅंकेत जाऊन तेथील मॅनेजरला चांगले झापायचे. पण उपयोग शून्य. या सगळ्यांना कंटाळून त्यांनी पोलिस ठाणेही गाठले; पण तिथेही त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले होते. चिडून, भांडून, वैतागून काही उपयोग होत नाही, हे जनुभाऊंच्या लक्षात आले. आता त्यांनी जशास तसे उत्तर द्यायचे ठरवले. त्यांना आता कोणाचा फोन आला की ते कानातील ध्वनीयंत्र बाजूला काढून ठेवतात.  न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख ‘आमच्या कंपनीचा विमा घ्या विमा’, असे कोणी म्हटले, की ‘क्काय सीमा !  कशी आहेस सीमा ? जरा मोठ्याने बोल, ऐकू येत नाही. अगं अजून मोठ्याने बोल. बरं ते जाऊ दे. तुझं लग्न झालंय का? अगं माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे. नवरा मुलगा विमा कंपनीत चांगल्या हुद्यावर आहे. ऐकतेस ना सीमा.. सीमा... . फोन ठेवला वाटतं. असं बोलून त्यांनी फोन करणाऱ्यांच्या ‘सीमा’भिंती रोखल्या होत्या. खळबळजनक : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची कारागृहात असलेल्या सराईत गुंडाला सुपारी   दुसरा फोन एका तरुणाचा होता. पर्सनल लोन घ्या म्हणून. त्यावर जनुभाऊ म्हणत होते. ‘कोण? अहो मलाच फोन करून मलाच काय विचारताय ‘कोण’ म्हणून. अच्छा-अच्छा. तुम्ही कोनांविषयी बोलताय होय. तुम्हाला काय काटकोन, त्रिकोण, चौकोन याविषयी माहिती हवीय? बरं...बरं !  नव्वद अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात बरं का? त्रिकोण म्हणजे तीन बाजू व तीन कोन. त्यांच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० डिग्री असते? ध्यानात ठेवा बरं का ? समभुज त्रिकोण म्हणजे. . .हॅलो, हॅलो, ठेवला वाटतं फोन.’ असे संभाषण होऊ लागल्याने जनुभाऊही एकदम खूष झाले. ‘मोठ्याने बोला’, ‘उचलून बोला’ या वाक्‍यांची फोडणी दिल्याने समोरचा एकदम गप्पगार व्हायचा आणि तीन-चार दिवसांतच जनुभाऊंना असे फोन येणेच बंद झाले. आता त्यांना ‘तुम्ही एक कोटींची लॉटरी जिंकलीय, तुम्ही फक्त एवढं करा’, ‘तुम्हाला पन्नास हजार पाठवतोय, तुमच्या मोबाईलवरील ओटीपी नंबर सांगा’, ‘तुमच्या एटीएम कार्डचा सोळा आकडी नंबर सांगा’, असले फोन येतात. आता काय करायचे? असा हतबल प्रश्न ते बायकोला करतात. तासभर लेक्‍चर ऐकायला लागू नये म्हणून बायको मात्र शांत राहते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

धरलं तर चावतंय अन्‌ अनेकांचं फावतंय ‘आमच्या बॅंकेचे क्रेडिट कार्ड घ्या’, ‘आमची विमा पॉलिसी घ्या’, ‘आमच्याकडून पर्सनल लोन घ्या’ या आणि अशा मेसेज आणि फोनने जनुभाऊ वैतागून गेले होते. सकाळी सातपासून रात्री कधीही असे फोन यायचे. त्याबद्दलही त्यांची तक्रार नव्हती. मात्र, हे फोन दुपारी एक ते चार या दरम्यान येऊ लागल्याने त्यांची चिडचिड वाढली होती.  ‘अरे आमच्या वामकुक्षीच्या वेळी कसले डोंबलाचे फोन करता ? तुम्ही देत असलेल्या त्रासाबद्दल मी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवेल ‘वाचकांच्या पत्रव्यवहारातही लिहीन’, अशी धमकी ते द्यायचे. पण काही उपयोग व्हायचा नाही. दुसऱ्या दिवशी ‘आमची ही ऑफर आहे आणि ती सवलत आहे’, असे फोन सुरू असायचे. ‘एक ते चार या वेळेत कोणीही बेल वा दार वाजवू नये, अन्यथा त्याच्या कानाखाली वाजल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही,’ अशी पाटी लावून ते निर्धास्त झाले होते. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे कोणीही फिरकत नव्हते. अगदी पाहुणेसुद्धा. मात्र, वेळी-अवेळी फोन करणाऱ्यांना धडा कसा शिकवावा, याचा ते नेहमी विचार करत असत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘अहो, त्यापेक्षा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा किंवा स्वीच ऑफ ठेवा’, जनुभाऊंच्या बायकोने तोडगा सुचवला. ‘छे. . छे. . ही तर शरणागती झाली, पळकुटेपणा झाला. मी गेल्या सत्तर वर्षांत कोणापुढे झुकलो नाही आणि आता हार मानू ? मुळीच नाही. मी लढेन, मोडेन; पण वाकणार नाही,’ जनुभाऊंनी बायकोला अर्धा तास लेक्‍चर दिले. बायकोने मात्र तोंड फिरवले. असे फोन आले की जनुभाऊ फोन करणाऱ्यांना चांगले झापायचे, नंतर धमकीही द्यायचे. हे करत असताना त्यांच्या घरातील सगळ्यांची झोप मोडायची. पुण्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या मात्र, जनुभाऊंना बोलायची कोणाची बिशाद नव्हती. नंतर जनुभाऊ संबंधित कंपनी वा बॅंकेत जाऊन तेथील मॅनेजरला चांगले झापायचे. पण उपयोग शून्य. या सगळ्यांना कंटाळून त्यांनी पोलिस ठाणेही गाठले; पण तिथेही त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले होते. चिडून, भांडून, वैतागून काही उपयोग होत नाही, हे जनुभाऊंच्या लक्षात आले. आता त्यांनी जशास तसे उत्तर द्यायचे ठरवले. त्यांना आता कोणाचा फोन आला की ते कानातील ध्वनीयंत्र बाजूला काढून ठेवतात.  न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख ‘आमच्या कंपनीचा विमा घ्या विमा’, असे कोणी म्हटले, की ‘क्काय सीमा !  कशी आहेस सीमा ? जरा मोठ्याने बोल, ऐकू येत नाही. अगं अजून मोठ्याने बोल. बरं ते जाऊ दे. तुझं लग्न झालंय का? अगं माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे. नवरा मुलगा विमा कंपनीत चांगल्या हुद्यावर आहे. ऐकतेस ना सीमा.. सीमा... . फोन ठेवला वाटतं. असं बोलून त्यांनी फोन करणाऱ्यांच्या ‘सीमा’भिंती रोखल्या होत्या. खळबळजनक : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची कारागृहात असलेल्या सराईत गुंडाला सुपारी   दुसरा फोन एका तरुणाचा होता. पर्सनल लोन घ्या म्हणून. त्यावर जनुभाऊ म्हणत होते. ‘कोण? अहो मलाच फोन करून मलाच काय विचारताय ‘कोण’ म्हणून. अच्छा-अच्छा. तुम्ही कोनांविषयी बोलताय होय. तुम्हाला काय काटकोन, त्रिकोण, चौकोन याविषयी माहिती हवीय? बरं...बरं !  नव्वद अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात बरं का? त्रिकोण म्हणजे तीन बाजू व तीन कोन. त्यांच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० डिग्री असते? ध्यानात ठेवा बरं का ? समभुज त्रिकोण म्हणजे. . .हॅलो, हॅलो, ठेवला वाटतं फोन.’ असे संभाषण होऊ लागल्याने जनुभाऊही एकदम खूष झाले. ‘मोठ्याने बोला’, ‘उचलून बोला’ या वाक्‍यांची फोडणी दिल्याने समोरचा एकदम गप्पगार व्हायचा आणि तीन-चार दिवसांतच जनुभाऊंना असे फोन येणेच बंद झाले. आता त्यांना ‘तुम्ही एक कोटींची लॉटरी जिंकलीय, तुम्ही फक्त एवढं करा’, ‘तुम्हाला पन्नास हजार पाठवतोय, तुमच्या मोबाईलवरील ओटीपी नंबर सांगा’, ‘तुमच्या एटीएम कार्डचा सोळा आकडी नंबर सांगा’, असले फोन येतात. आता काय करायचे? असा हतबल प्रश्न ते बायकोला करतात. तासभर लेक्‍चर ऐकायला लागू नये म्हणून बायको मात्र शांत राहते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nUtK10

No comments:

Post a Comment