दारूचा महापूर रोखायचा कसा?  बांदा (सिंधुदुर्ग) - नववर्ष स्वागतासाठी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने राज्यात येत्या चार दिवसांत गोवा बनावटीच्या दारूचा महापूर येण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीच्या कारवाईना यावर्षी "ब्रेक' लागल्याने पोलिस व उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदा दारू व अंमली पदार्थ वाहतूक टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तपासणी नाक्‍यांवर ब्रावो श्‍वानसह विशेष पथकाची नियुक्ती केली खरी; मात्र दारू कारवाईचा "आलेख' हा समाधानकारक नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 4 दिवसांत बेकायदा दारू वाहतुकीवर किती कारवाया होतात? याकडे पाहणे गरजेचे आहे.  नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची पहिली पसंती ही गोव्याला असते. त्यानंतर पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांची पसंती असते. त्यामुळे दरवर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात गोवा बनावटीच्या दारूला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्रात विशेष मागणी असते. दरवर्षी डिसेंबरमध्ये गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते; मात्र वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध होताच व केवळ वरिष्ठांचा आदेश आल्यानंतरच पोलिस मटका, दारू, जुगारावर कारवाई करताना दिसतात. केवळ करचाईचे "टार्गेट' पूर्ण करण्यासाठीच अशा केसेस दाखविल्या जातात.  बांदा हे गोवा सीमेलगत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे दारूची वाहतूक सुरू असते; मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी परराज्यातील गाड्यांवर कारवाई करण्यात येते. इन्सुली तपासणी नाक्‍यावरून दारू वाहतूक करणाऱ्या गाड्या सुटतातच कशा? हे प्रश्‍नचिन्ह आहे. वृत्त प्रसिद्ध झाले की दोन दिवस तपासणी नाके अलर्ट करण्यात येतात. नंतर मात्र "येरे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे पुन्हा "जैसे थे' स्थिती असते. तपासणी नाक्‍यावरून कशाप्रकारे व कोणत्या वाहनातून दारू वाहतूक होते? याची इत्यंभूत माहिती स्थानिक पोलिसांना असते; मात्र अशा वाहनांवर कारवाई शून्य आहे.  दरदिवशी विविध वाहनांतून दारूची बेकायदा वाहतूक करण्यात येते. गेल्या पाच वर्षातील डिसेंबरमधील दारू कारवाईचा आलेख बघितल्यास यावर्षी कारवाईचे प्रमाण हे अत्यल्प आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गोव्यातून तस्करी होणाऱ्या दारू व अंमली पदार्थ रोखण्यासाठी सीमावर्ती भागातील तपासणी नाक्‍यांवर विशेष पथकाची नेमणूक केली आहे. मागील काही महिन्यात गोव्यात अंमली पदार्थ विरोधात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याच्या नजीक असल्याने अंमली पदार्थांची बेकायदा तस्करी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे यादृष्टीने तपासणी नाक्‍यावरील पोलीस कर्मचारी अलर्ट असणे गरजेचे आहे. नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या कारवाया वाढणे अपेक्षित आहे; मात्र या महिन्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे अवैध व्यावसायिकांचे फावले आहे. पोलिसांचा आशीर्वाद असल्याने दिवसागणिक लाखो रुपयांची दारू जिल्ह्यात तपासणी नाक्‍यांवर कोणतीही "आडकाठी' न होता बिनदिक्कतपणे येत आहे.  गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासनाने कडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात येणारी दारू जिल्ह्याच्या सीमेवरच रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवैध धंद्यांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. यासाठी सीमेवरील पोलिस तपासणी नाक्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.  - राजेंद्र दाभाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

दारूचा महापूर रोखायचा कसा?  बांदा (सिंधुदुर्ग) - नववर्ष स्वागतासाठी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने राज्यात येत्या चार दिवसांत गोवा बनावटीच्या दारूचा महापूर येण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीच्या कारवाईना यावर्षी "ब्रेक' लागल्याने पोलिस व उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदा दारू व अंमली पदार्थ वाहतूक टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तपासणी नाक्‍यांवर ब्रावो श्‍वानसह विशेष पथकाची नियुक्ती केली खरी; मात्र दारू कारवाईचा "आलेख' हा समाधानकारक नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 4 दिवसांत बेकायदा दारू वाहतुकीवर किती कारवाया होतात? याकडे पाहणे गरजेचे आहे.  नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची पहिली पसंती ही गोव्याला असते. त्यानंतर पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांची पसंती असते. त्यामुळे दरवर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात गोवा बनावटीच्या दारूला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्रात विशेष मागणी असते. दरवर्षी डिसेंबरमध्ये गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते; मात्र वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध होताच व केवळ वरिष्ठांचा आदेश आल्यानंतरच पोलिस मटका, दारू, जुगारावर कारवाई करताना दिसतात. केवळ करचाईचे "टार्गेट' पूर्ण करण्यासाठीच अशा केसेस दाखविल्या जातात.  बांदा हे गोवा सीमेलगत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे दारूची वाहतूक सुरू असते; मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी परराज्यातील गाड्यांवर कारवाई करण्यात येते. इन्सुली तपासणी नाक्‍यावरून दारू वाहतूक करणाऱ्या गाड्या सुटतातच कशा? हे प्रश्‍नचिन्ह आहे. वृत्त प्रसिद्ध झाले की दोन दिवस तपासणी नाके अलर्ट करण्यात येतात. नंतर मात्र "येरे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे पुन्हा "जैसे थे' स्थिती असते. तपासणी नाक्‍यावरून कशाप्रकारे व कोणत्या वाहनातून दारू वाहतूक होते? याची इत्यंभूत माहिती स्थानिक पोलिसांना असते; मात्र अशा वाहनांवर कारवाई शून्य आहे.  दरदिवशी विविध वाहनांतून दारूची बेकायदा वाहतूक करण्यात येते. गेल्या पाच वर्षातील डिसेंबरमधील दारू कारवाईचा आलेख बघितल्यास यावर्षी कारवाईचे प्रमाण हे अत्यल्प आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गोव्यातून तस्करी होणाऱ्या दारू व अंमली पदार्थ रोखण्यासाठी सीमावर्ती भागातील तपासणी नाक्‍यांवर विशेष पथकाची नेमणूक केली आहे. मागील काही महिन्यात गोव्यात अंमली पदार्थ विरोधात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याच्या नजीक असल्याने अंमली पदार्थांची बेकायदा तस्करी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे यादृष्टीने तपासणी नाक्‍यावरील पोलीस कर्मचारी अलर्ट असणे गरजेचे आहे. नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या कारवाया वाढणे अपेक्षित आहे; मात्र या महिन्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे अवैध व्यावसायिकांचे फावले आहे. पोलिसांचा आशीर्वाद असल्याने दिवसागणिक लाखो रुपयांची दारू जिल्ह्यात तपासणी नाक्‍यांवर कोणतीही "आडकाठी' न होता बिनदिक्कतपणे येत आहे.  गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासनाने कडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात येणारी दारू जिल्ह्याच्या सीमेवरच रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवैध धंद्यांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. यासाठी सीमेवरील पोलिस तपासणी नाक्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.  - राजेंद्र दाभाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3rHE52O

No comments:

Post a Comment