पाडलोसमध्ये गव्यांचा उपद्रव बांदा (सिंधुदुर्ग) - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा दुसऱ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे. पाडलोस-केणीवाडा येथे चार ते पाच गव्यांनी शेतकरी हर्षद परब यांच्या वायंगणी शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उपद्रवी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.  बांदा-शिरोडा मार्गावर गेले काही दिवस गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या गवे फिरत असल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी हर्षद परब यांनी हजारो रुपये खर्च करून वायंगणी शेती केली आहे. शनिवारी रात्रो सुमारे चार ते पाच गवे रेडे आपल्या शेतात येऊन संपूर्ण मेहनत पायदळी तुडविल्यामुळे सुमारे 20 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे हर्षद परब यांनी सांगितले. तसेच वनविभागालाही याची कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.  पाडलोसमध्ये शेकडो एकरवर वायंगणी शेती केली आहे. परंतु पेरलेले पीक पुन्हा हातात मिळते की नाही अशी शाशंकता गव्या रेड्यांच्या उपद्रवामुळे निर्माण झाली आहे. हजारो रुपये खर्चून केलेली शेती वाचवा व झालेली नुकसान भरपाई आम्हाला द्या, अशी मागणी हर्षद परब यांनी केली आहे.  पोकळ घोषणा नकोत  सद्यस्थितीत वायंगणी शेतीचा कालावधी सुरू असून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काजूबागायतीचा हंगाम सुरू होणार असून वनविभागाने शेती-बागायती वाचविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. भरपाईची केवळ घोषणाबाजी न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची मागणी होत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

पाडलोसमध्ये गव्यांचा उपद्रव बांदा (सिंधुदुर्ग) - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा दुसऱ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे. पाडलोस-केणीवाडा येथे चार ते पाच गव्यांनी शेतकरी हर्षद परब यांच्या वायंगणी शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उपद्रवी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.  बांदा-शिरोडा मार्गावर गेले काही दिवस गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या गवे फिरत असल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी हर्षद परब यांनी हजारो रुपये खर्च करून वायंगणी शेती केली आहे. शनिवारी रात्रो सुमारे चार ते पाच गवे रेडे आपल्या शेतात येऊन संपूर्ण मेहनत पायदळी तुडविल्यामुळे सुमारे 20 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे हर्षद परब यांनी सांगितले. तसेच वनविभागालाही याची कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.  पाडलोसमध्ये शेकडो एकरवर वायंगणी शेती केली आहे. परंतु पेरलेले पीक पुन्हा हातात मिळते की नाही अशी शाशंकता गव्या रेड्यांच्या उपद्रवामुळे निर्माण झाली आहे. हजारो रुपये खर्चून केलेली शेती वाचवा व झालेली नुकसान भरपाई आम्हाला द्या, अशी मागणी हर्षद परब यांनी केली आहे.  पोकळ घोषणा नकोत  सद्यस्थितीत वायंगणी शेतीचा कालावधी सुरू असून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काजूबागायतीचा हंगाम सुरू होणार असून वनविभागाने शेती-बागायती वाचविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. भरपाईची केवळ घोषणाबाजी न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची मागणी होत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34NqahU

No comments:

Post a Comment