माकडताप रुग्णांत वाढ, लॅबची मागणी  सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात 2018 मध्ये माकडताप निदान करण्याची लॅब कार्यान्वित केली असली तरी या लॅबचा वापर सद्यस्थितीत कोरोना तपासणीसाठी केला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात माकडतापाचे रूग्ण आढळू लागले आहेत. यावर तत्काळ निदान व उपचार होण्याच्या दृष्टीने ही लॅब माकडताप निदान करण्यासाठी पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.  जिल्ह्यात गेली अनेक वर्षे सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्‍यांमध्ये माकडतापाचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराने आतापर्यंत अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. या तापाचे निदान या जिल्ह्यातच व्हावे व उपचार तत्काळ करता यावेत, यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडताप निदान करण्याची लॅब 2018 मध्ये निर्माण करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या लॅबचा वापर कोरोना निदानासाठी होत आहे. जिल्ह्यात माकडतापाचा हंगाम डिसेंबरपासून सुरू होतो. या कालावधीत मोठ्या प्रमाणात माकड तापाचे रुग्ण आढळतात. गतवर्षी माकड तापाचे 83 रुग्ण आढळले होते. 4 जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षीही आतापर्यंत 41 माकडतापाचे रुग्ण आढळले आहेत; मात्र याचे निदान करण्यासाठी जिल्ह्याबाहेर रक्ताचे नमुने पाठवावे लागत आहेत. त्यामुळे निदान आणि उपचारासाठी विलंब होत आहे. रुग्णाचे निदान होण्यास विलंब होत असल्याने रुग्ण दगावण्याची भीती वाढली आहे. तरी जिल्ह्यात माकडताप रुग्णांच्या निदानासाठी सुरू करण्यात आलेल्या लॅबमध्ये निदान व्हावे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्या कमी झाली असून माकडतापाचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. याचा विचार करता जिल्ह्यातील लॅबमध्ये माकडतापाच्या रुग्णांचे निदान व्हावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. सध्यस्थितीत माकडताप निदानासाठी जिल्ह्याबाहेर रूग्णांच्या रक्ताचे नमुने पाठवावे लागत असल्याने ज्या उद्देशाने ही लब कार्यन्वित केली तो उद्देश सफल होताना दिसत नाही. तरी याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात असलेली माकडतापाची लॅब माकडतापाच्या निदानासाठी पूर्ववत सुरू करावी. शासनाने या लॅबमध्ये आवश्‍यक कर्मचारी, तज्ञ यांची नेमणूक करून साहित्य कीट पुरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  जिल्ह्यात 104 माकडांचा मृत्यू  जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 104 माकडांचा मृत्यू झाला आहे. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून माकडाची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध व्हावे. या लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आवश्‍यक भत्ते देण्यासाठी शासनाने तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडून शासनाकडे केली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

माकडताप रुग्णांत वाढ, लॅबची मागणी  सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात 2018 मध्ये माकडताप निदान करण्याची लॅब कार्यान्वित केली असली तरी या लॅबचा वापर सद्यस्थितीत कोरोना तपासणीसाठी केला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात माकडतापाचे रूग्ण आढळू लागले आहेत. यावर तत्काळ निदान व उपचार होण्याच्या दृष्टीने ही लॅब माकडताप निदान करण्यासाठी पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.  जिल्ह्यात गेली अनेक वर्षे सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्‍यांमध्ये माकडतापाचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराने आतापर्यंत अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. या तापाचे निदान या जिल्ह्यातच व्हावे व उपचार तत्काळ करता यावेत, यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडताप निदान करण्याची लॅब 2018 मध्ये निर्माण करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या लॅबचा वापर कोरोना निदानासाठी होत आहे. जिल्ह्यात माकडतापाचा हंगाम डिसेंबरपासून सुरू होतो. या कालावधीत मोठ्या प्रमाणात माकड तापाचे रुग्ण आढळतात. गतवर्षी माकड तापाचे 83 रुग्ण आढळले होते. 4 जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षीही आतापर्यंत 41 माकडतापाचे रुग्ण आढळले आहेत; मात्र याचे निदान करण्यासाठी जिल्ह्याबाहेर रक्ताचे नमुने पाठवावे लागत आहेत. त्यामुळे निदान आणि उपचारासाठी विलंब होत आहे. रुग्णाचे निदान होण्यास विलंब होत असल्याने रुग्ण दगावण्याची भीती वाढली आहे. तरी जिल्ह्यात माकडताप रुग्णांच्या निदानासाठी सुरू करण्यात आलेल्या लॅबमध्ये निदान व्हावे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्या कमी झाली असून माकडतापाचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. याचा विचार करता जिल्ह्यातील लॅबमध्ये माकडतापाच्या रुग्णांचे निदान व्हावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. सध्यस्थितीत माकडताप निदानासाठी जिल्ह्याबाहेर रूग्णांच्या रक्ताचे नमुने पाठवावे लागत असल्याने ज्या उद्देशाने ही लब कार्यन्वित केली तो उद्देश सफल होताना दिसत नाही. तरी याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात असलेली माकडतापाची लॅब माकडतापाच्या निदानासाठी पूर्ववत सुरू करावी. शासनाने या लॅबमध्ये आवश्‍यक कर्मचारी, तज्ञ यांची नेमणूक करून साहित्य कीट पुरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  जिल्ह्यात 104 माकडांचा मृत्यू  जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 104 माकडांचा मृत्यू झाला आहे. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून माकडाची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध व्हावे. या लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आवश्‍यक भत्ते देण्यासाठी शासनाने तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडून शासनाकडे केली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pt5Z0i

No comments:

Post a Comment