फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - अणसुर (ता. वेंगुर्ले) येथे अज्ञाताने मंगळवारी (ता.29) सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकला होता. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले होते; परंतु त्या बिबट्याला दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.  वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता. मंगळवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्री. गावडे बागेत गेले असता बिबट्याने डरकाळी फोडली; मात्र बिबट्या फासकीत अडकल्याने गावडे वाचले होते. तत्काळ त्यांनी पोलिसपाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही. एस. नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी गावडे यांच्यासह पोलिसपाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले.  उपचारावेळी मृत्यू  अणसुर येथील बिबट्या (मादी) 2 वर्षाची होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वनविभागाने पकडून आकेरी येथील वन विश्रामगृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. सकाळपर्यंत बिबट्याची प्रकृती ठीक होईल, असे वाटत होते; मात्र आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी यांनी विच्छेदन केले. त्यानंतर आकेरी येथे वनविभागाने अंत्यसंस्कार केले, अशी माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - अणसुर (ता. वेंगुर्ले) येथे अज्ञाताने मंगळवारी (ता.29) सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकला होता. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले होते; परंतु त्या बिबट्याला दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.  वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता. मंगळवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्री. गावडे बागेत गेले असता बिबट्याने डरकाळी फोडली; मात्र बिबट्या फासकीत अडकल्याने गावडे वाचले होते. तत्काळ त्यांनी पोलिसपाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही. एस. नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी गावडे यांच्यासह पोलिसपाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले.  उपचारावेळी मृत्यू  अणसुर येथील बिबट्या (मादी) 2 वर्षाची होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वनविभागाने पकडून आकेरी येथील वन विश्रामगृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. सकाळपर्यंत बिबट्याची प्रकृती ठीक होईल, असे वाटत होते; मात्र आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी यांनी विच्छेदन केले. त्यानंतर आकेरी येथे वनविभागाने अंत्यसंस्कार केले, अशी माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3rH3ucQ

No comments:

Post a Comment