सावंतवाडीला निधी कमी पडू देणार नाही ः चव्हाण सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदासारख्या महत्वाकांक्षी योजनेला ठाकरे सरकारने तिलांजली दिली, हे कोकणासाठी दुर्दैव आहे; मात्र हे शहर आपले आहे. सत्ता कोणाची आहे हे नंतर. या शहराच्या विकासासाठी लागणारे कोट्यवधी रुपये आपण कसे आणू शकतो? यासाठी सांघिक प्रयत्न करुया, नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहा. विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजप नेते माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.  पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विशाल परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, ऍड. परिमल नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, उपसभापती शितल राऊळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष तातोबा गवस आदी उपस्थित होते.  चव्हाण पुढे म्हणाले, ""कोरोनाचा कालावधी असतानाही अडचणीच्या काळात नगराध्यक्ष परब यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. हे शहर माझे आहे व ते मला चांगल करायचे आहे, या मानसिकतेतून त्यांनी काम केले. आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध निधीतून त्यांनी शहर विकासाचा धडाका लावला. सावंतवाडी हे सुशिक्षित लोकांचे शहर आहे. येथील नागरिकांना शहराच्या विकासाच्या आपणा सर्वांकडून अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी सांधिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. श्री. परब व त्यांचे सहकारी ते नक्कीच करतील.''  ते पुढे म्हणाले, ""फडणवीस सरकारच्या काळामध्ये आमदार दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला; मात्र ठाकरे सरकारने योजना बंद करून एक प्रकारे सिंधुदुर्गबरोबरच कोकणावर अन्याय केला. या ठिकाणी असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे याआधीच्या नगराध्यक्षांनी आलेल्या पैशांचा विनियोग केला नाही; मात्र पर्यटन शहर म्हणून सावंतवाडीची ओळख आहे. त्याला चालना देण्यासाठी मागील एका वर्षात नगराध्यक्ष परब यांनी काम केले. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 11 कोटी रुपये याठिकाणी देण्यात आले. भाजी मंडईसाठी 5 कोटी रुपये दिले होते; मात्र हे सर्व पैसे खर्च होऊ न शकल्यामुळे परत गेले. त्यामुळे काम करण्याची मानसिकता असली पाहिजे तरच ते काम होऊ शकते आणि ही मानसिकता परब यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे.''  श्री. तेली म्हणाले, ""वर्षपूर्तीनिमित्त नगराध्यक्ष परब यांनी आज केलेल्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने शहराला पुढे मिळाले आहेत. नगराध्यक्ष म्हणून अवघा काही कालावधी परब यांना मिळाला आहे. या काळात एका वर्षातच त्यांनी विकासकामांचा सपाटा लावला; मात्र येणारा काळातही भाजपच्या हाती सत्ता द्या आणि शहराचा विकास पहा.''  प्रास्ताविकात परब यांनी मागच्या तीन वर्षांमध्ये ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी अपूर्ण ठेवलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे काम आपण केले आहे. याठिकाणी सत्ता कोणाची असो; मात्र निधी कसा आणायचा? हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे उरलेल्या कारण तिथेही शहराचा विकास आणि शहराचा ध्यास घेऊनच आपण काम करणार आहे.  मुख्याधिकाऱ्यांनी राजकारणात पडू नये  पालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांनी तेथील राजकारणात पडायचे नव्हते. लवकरच सत्ता बदलानंतर काय होईल? हे सांगता येत नाही. त्यामुळे सहकार्याची भूमिका दाखवा, असा टोला तेली यांनी मुख्याधिकारी यांचे नाव न घेता लगावला.  शिव पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण  येथील शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असेल? त्याची प्रतिकृती आज या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आली. आमदार चव्हाण यांच्या हस्ते प्रस्तावित शिवपुतळा सर्वांसमोर दाखवण्यात आला. यावेळी इतरांचीही उपस्थिती होती.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

सावंतवाडीला निधी कमी पडू देणार नाही ः चव्हाण सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदासारख्या महत्वाकांक्षी योजनेला ठाकरे सरकारने तिलांजली दिली, हे कोकणासाठी दुर्दैव आहे; मात्र हे शहर आपले आहे. सत्ता कोणाची आहे हे नंतर. या शहराच्या विकासासाठी लागणारे कोट्यवधी रुपये आपण कसे आणू शकतो? यासाठी सांघिक प्रयत्न करुया, नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहा. विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजप नेते माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.  पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विशाल परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, ऍड. परिमल नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, उपसभापती शितल राऊळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष तातोबा गवस आदी उपस्थित होते.  चव्हाण पुढे म्हणाले, ""कोरोनाचा कालावधी असतानाही अडचणीच्या काळात नगराध्यक्ष परब यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. हे शहर माझे आहे व ते मला चांगल करायचे आहे, या मानसिकतेतून त्यांनी काम केले. आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध निधीतून त्यांनी शहर विकासाचा धडाका लावला. सावंतवाडी हे सुशिक्षित लोकांचे शहर आहे. येथील नागरिकांना शहराच्या विकासाच्या आपणा सर्वांकडून अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी सांधिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. श्री. परब व त्यांचे सहकारी ते नक्कीच करतील.''  ते पुढे म्हणाले, ""फडणवीस सरकारच्या काळामध्ये आमदार दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला; मात्र ठाकरे सरकारने योजना बंद करून एक प्रकारे सिंधुदुर्गबरोबरच कोकणावर अन्याय केला. या ठिकाणी असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे याआधीच्या नगराध्यक्षांनी आलेल्या पैशांचा विनियोग केला नाही; मात्र पर्यटन शहर म्हणून सावंतवाडीची ओळख आहे. त्याला चालना देण्यासाठी मागील एका वर्षात नगराध्यक्ष परब यांनी काम केले. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 11 कोटी रुपये याठिकाणी देण्यात आले. भाजी मंडईसाठी 5 कोटी रुपये दिले होते; मात्र हे सर्व पैसे खर्च होऊ न शकल्यामुळे परत गेले. त्यामुळे काम करण्याची मानसिकता असली पाहिजे तरच ते काम होऊ शकते आणि ही मानसिकता परब यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे.''  श्री. तेली म्हणाले, ""वर्षपूर्तीनिमित्त नगराध्यक्ष परब यांनी आज केलेल्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने शहराला पुढे मिळाले आहेत. नगराध्यक्ष म्हणून अवघा काही कालावधी परब यांना मिळाला आहे. या काळात एका वर्षातच त्यांनी विकासकामांचा सपाटा लावला; मात्र येणारा काळातही भाजपच्या हाती सत्ता द्या आणि शहराचा विकास पहा.''  प्रास्ताविकात परब यांनी मागच्या तीन वर्षांमध्ये ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी अपूर्ण ठेवलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे काम आपण केले आहे. याठिकाणी सत्ता कोणाची असो; मात्र निधी कसा आणायचा? हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे उरलेल्या कारण तिथेही शहराचा विकास आणि शहराचा ध्यास घेऊनच आपण काम करणार आहे.  मुख्याधिकाऱ्यांनी राजकारणात पडू नये  पालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांनी तेथील राजकारणात पडायचे नव्हते. लवकरच सत्ता बदलानंतर काय होईल? हे सांगता येत नाही. त्यामुळे सहकार्याची भूमिका दाखवा, असा टोला तेली यांनी मुख्याधिकारी यांचे नाव न घेता लगावला.  शिव पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण  येथील शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असेल? त्याची प्रतिकृती आज या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आली. आमदार चव्हाण यांच्या हस्ते प्रस्तावित शिवपुतळा सर्वांसमोर दाखवण्यात आला. यावेळी इतरांचीही उपस्थिती होती.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3n2puLu

No comments:

Post a Comment