पालकमंत्र्यांमुळेच "पेयजल' रखडली ः म्हापसेकर सिंधुदुर्गनगरी -  देवगड तालुक्‍यातील इळये येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील विहीर, शिवसेनेच्या आमदार व पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रखडली आहे. संबंधित ठेकेदार काम करायला तयार असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम थांबवून अडवणूक करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत केला.  जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, समिती सदस्य संजना सावंत, प्रमोद कामत आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.  देवगड तालुक्‍यातील इळये येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली आहे. या विहिरीच्या खोदाईसाठी संबंधित ठेकेदाराने काही निधी खर्च केला आहे; मात्र संबंधित विहिरीच्या जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने विहिरीचे काम प्रशासनाकडून थांबवण्यात आले आहे. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. संबंधित ठेकेदारही विहीर पूर्ण करून देण्यास तयार असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हे काम थांबवण्याचा उद्देश काय ?असा प्रश्‍न उपस्थित केला. या कामात राजकारण करून शिवसेनेचे आमदार व पालकमंत्री हस्तक्षेप करीत असल्याने या विहिरीचे काम रखडले आहे. विहिरीच्या कामात होत असलेल्या राजकारणाला संबंधित अधिकारी खतपाणी घालत असल्याचा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. या कामाबाबत आपण अहवाल मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या कामाबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी स्पष्ट केले.  जिल्ह्यात 10 ठिकाणी पाझर तलाव बांधकाम करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ बांदिवडे, कसाल, ओसरगाव या तीन तलावांमध्येच पाण्याचा साठा कायम होतो. उर्वरित 7 तलावांमध्ये डिसेंबरनंतर पाणी राहत नाही. ही तलावे कोरडी पडतात, अशी माहिती सभेत उघड झाली. यावर ज्यावेळी पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळणार नसेल व डिसेंबरनंतर पाझर तलावात पाण्याचा साठा राहत नसेल तर ही तलावे बांधलीत कशाला ? असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने ही पाझर तलावे आहेत. त्यामुळे यातील पाणी झिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी मध्ये वाढ व्हावी, हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले.  दोडामार्गात खोदकामामुळे रस्ता खराब  दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथे रस्त्यावरून नळ योजनेची पाईपलाईन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खोदाई केली आहे. यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. याबाबत आंदोलन करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही. तरी या रस्त्याचे यावर्षी काम झाले नसेल तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या सभेत दिला.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

पालकमंत्र्यांमुळेच "पेयजल' रखडली ः म्हापसेकर सिंधुदुर्गनगरी -  देवगड तालुक्‍यातील इळये येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील विहीर, शिवसेनेच्या आमदार व पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रखडली आहे. संबंधित ठेकेदार काम करायला तयार असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम थांबवून अडवणूक करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत केला.  जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, समिती सदस्य संजना सावंत, प्रमोद कामत आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.  देवगड तालुक्‍यातील इळये येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली आहे. या विहिरीच्या खोदाईसाठी संबंधित ठेकेदाराने काही निधी खर्च केला आहे; मात्र संबंधित विहिरीच्या जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने विहिरीचे काम प्रशासनाकडून थांबवण्यात आले आहे. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. संबंधित ठेकेदारही विहीर पूर्ण करून देण्यास तयार असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हे काम थांबवण्याचा उद्देश काय ?असा प्रश्‍न उपस्थित केला. या कामात राजकारण करून शिवसेनेचे आमदार व पालकमंत्री हस्तक्षेप करीत असल्याने या विहिरीचे काम रखडले आहे. विहिरीच्या कामात होत असलेल्या राजकारणाला संबंधित अधिकारी खतपाणी घालत असल्याचा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. या कामाबाबत आपण अहवाल मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या कामाबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी स्पष्ट केले.  जिल्ह्यात 10 ठिकाणी पाझर तलाव बांधकाम करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ बांदिवडे, कसाल, ओसरगाव या तीन तलावांमध्येच पाण्याचा साठा कायम होतो. उर्वरित 7 तलावांमध्ये डिसेंबरनंतर पाणी राहत नाही. ही तलावे कोरडी पडतात, अशी माहिती सभेत उघड झाली. यावर ज्यावेळी पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळणार नसेल व डिसेंबरनंतर पाझर तलावात पाण्याचा साठा राहत नसेल तर ही तलावे बांधलीत कशाला ? असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने ही पाझर तलावे आहेत. त्यामुळे यातील पाणी झिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी मध्ये वाढ व्हावी, हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले.  दोडामार्गात खोदकामामुळे रस्ता खराब  दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथे रस्त्यावरून नळ योजनेची पाईपलाईन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खोदाई केली आहे. यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. याबाबत आंदोलन करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही. तरी या रस्त्याचे यावर्षी काम झाले नसेल तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या सभेत दिला.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nX8EiF

No comments:

Post a Comment