'शौक के लिये कुछ भी करेगा' नागपूर  : एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल तर, त्याचे व्यसन लागणे किंवा वेड असणे अतिशय आवश्यक असते. नागपूरचा सायकलपटू दिलीप भरत मलिक अशाच अवलियांपैकी एक. दिलीपने गेल्या दोन-तीन दशकांत सायकलने अख्खा देश पिंजून काढला असून, लवकरच तो 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'साठी प्रयत्न करणार आहे. दिलीप हा नागपूर महानगरपालिकेत धरमपेठ झोनमध्ये सफाई कर्मचारी आहे. आपली ड्यूटी प्रामाणिकपणे करून उरलेल्या वेळात तो आपला शौक पूर्ण करतो. वयाच्या सातव्या वर्षांपासून सायकल चालवीत असलेल्या दिलीपने आतापर्यंत सायकलने भारतभर अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करून उपराजधानीला नावलौकिक मिळवून दिला आहे.  हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम    अगदी जम्मू- काश्मीर, लेह लद्दाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकातापर्यंत सर्वच राज्यांमध्ये हा अवलिया एकटाच सायकलवर तिरंगा झेंडा लावून फिरतो आहे. पन्नाशी पार होऊनही आजही त्याच्यात तितकीच ऊर्जा व जोश आहे. तो सायकलने नुसता फिरतच नाही, तर 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'झाडे लावा झाडे वाचवा', स्वच्छ भारत यासारख्या अभियानांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत निरोगी व फिट राहण्याचा संदेशदेखील पोहोचवितो. सायकलचा शौक पूर्ण करण्यासाठी दिलीपला खूप काही गमवावेही लागले आहे. गरिबीमुळे बऱ्याचवेळा देशभ्रमणासाठी त्याच्याकडे पैसे राहत नाही. कुणी आर्थिक मदत केली तर ठीक, अन्यथा पीएफ, कर्ज किंवा उसनवारी करून कोणत्याही परिस्थितीत तो आपली इच्छा पूर्ण करतो. दिलीपला आता ४५ हजार किमी सायकल चालवून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव नोंदवायचे आहे. ध्या एका सायकलपटूच्या नावावर ४० हजार किमीचा रेकॉर्ड आहे. खरं तर या मिशनला तो येत्या रविवारपासूनच सुरुवात करणार होता. दुर्दैवाने कोरोनामुळे त्याला परवानगी मिळू शकली नाही. २०२१-२२ मध्ये निश्चितच स्वप्न पूर्ण करेल, असे दिलीपने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. दर्जेदार ऍथलिटसुद्धा शहरात सायकल रॅली असो किंवा स्पर्धा. वेळ मिळाल्यास दिलीप हमखास तिथे हजर असतो. सायकलपटूशिवाय तो एक दर्जेदार ऍथलिटसुद्धा आहे. प्रौढांच्या अनेक मैदानी स्पर्धांमध्ये त्याने मेडल्स, ट्रॉफीज व रोख पुरस्कार जिंकले आहेत. ५१ वर्षीय दिलीपचा दिवस पहाटे चारलाच सुरू होऊन उशिरा रात्री संपतो. दररोज ४० ते ५० किमी सायकल चालविल्याशिवाय त्याला झोपच येत नाही. संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 4, 2020

'शौक के लिये कुछ भी करेगा' नागपूर  : एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल तर, त्याचे व्यसन लागणे किंवा वेड असणे अतिशय आवश्यक असते. नागपूरचा सायकलपटू दिलीप भरत मलिक अशाच अवलियांपैकी एक. दिलीपने गेल्या दोन-तीन दशकांत सायकलने अख्खा देश पिंजून काढला असून, लवकरच तो 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'साठी प्रयत्न करणार आहे. दिलीप हा नागपूर महानगरपालिकेत धरमपेठ झोनमध्ये सफाई कर्मचारी आहे. आपली ड्यूटी प्रामाणिकपणे करून उरलेल्या वेळात तो आपला शौक पूर्ण करतो. वयाच्या सातव्या वर्षांपासून सायकल चालवीत असलेल्या दिलीपने आतापर्यंत सायकलने भारतभर अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करून उपराजधानीला नावलौकिक मिळवून दिला आहे.  हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम    अगदी जम्मू- काश्मीर, लेह लद्दाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकातापर्यंत सर्वच राज्यांमध्ये हा अवलिया एकटाच सायकलवर तिरंगा झेंडा लावून फिरतो आहे. पन्नाशी पार होऊनही आजही त्याच्यात तितकीच ऊर्जा व जोश आहे. तो सायकलने नुसता फिरतच नाही, तर 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'झाडे लावा झाडे वाचवा', स्वच्छ भारत यासारख्या अभियानांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत निरोगी व फिट राहण्याचा संदेशदेखील पोहोचवितो. सायकलचा शौक पूर्ण करण्यासाठी दिलीपला खूप काही गमवावेही लागले आहे. गरिबीमुळे बऱ्याचवेळा देशभ्रमणासाठी त्याच्याकडे पैसे राहत नाही. कुणी आर्थिक मदत केली तर ठीक, अन्यथा पीएफ, कर्ज किंवा उसनवारी करून कोणत्याही परिस्थितीत तो आपली इच्छा पूर्ण करतो. दिलीपला आता ४५ हजार किमी सायकल चालवून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव नोंदवायचे आहे. ध्या एका सायकलपटूच्या नावावर ४० हजार किमीचा रेकॉर्ड आहे. खरं तर या मिशनला तो येत्या रविवारपासूनच सुरुवात करणार होता. दुर्दैवाने कोरोनामुळे त्याला परवानगी मिळू शकली नाही. २०२१-२२ मध्ये निश्चितच स्वप्न पूर्ण करेल, असे दिलीपने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. दर्जेदार ऍथलिटसुद्धा शहरात सायकल रॅली असो किंवा स्पर्धा. वेळ मिळाल्यास दिलीप हमखास तिथे हजर असतो. सायकलपटूशिवाय तो एक दर्जेदार ऍथलिटसुद्धा आहे. प्रौढांच्या अनेक मैदानी स्पर्धांमध्ये त्याने मेडल्स, ट्रॉफीज व रोख पुरस्कार जिंकले आहेत. ५१ वर्षीय दिलीपचा दिवस पहाटे चारलाच सुरू होऊन उशिरा रात्री संपतो. दररोज ४० ते ५० किमी सायकल चालविल्याशिवाय त्याला झोपच येत नाही. संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3l2UCuj

No comments:

Post a Comment