राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राची कार्यवाही सुरू करा; खासदार कोल्हेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मंचर (पुणे) : राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र शिरुर लोकसभा मतदार संघात उभारण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या केंद्रासाठीचा डीपीआर तयार करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.  - पुरंदरच्या सीताफळाचा हंगाम दिड महिना अगोदरच गुंडाळला जातोय!​ भीमाशंकरचे अभयारण्य आणि खेड, जुन्नरच्या आदिवासी क्षेत्रात गुळवेल, हिरडा यासह असंख्य वनौषधी आहेत. या भागात वनौषधी व लागवडीसाठी बराच वाव आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळू शकेल. या भागात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नाईक यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सदर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर तयार करणे, जागा निश्चित करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे आदी कामांसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.  - 'सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही, पण...'; वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख व आयुष उपसंचालक . दिगंबर मोकाट, ए. बी. आढे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे नियोजन अधिकारी स्वप्निल कोरडे, संकेत तोंडारे, शुभांगी फुले (तहसीलदार सर्वसाधारण शाखा), जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आदी बाबींसाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याकरिता सर्व संबंधितांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.  या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र आपल्या भागात होणे ही मोठी बाब असून त्याचा मोठा लाभ आदिवासी समाजाला तर होईलच परंतु आयुर्वेदाच्या संशोधनासाठी त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्तरावर याचा पाठपुरावा करणार आहोत. आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याच्या प्रस्ताव आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी, पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/Tcb3G6o41D — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 30, 2020 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 11, 2020

राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राची कार्यवाही सुरू करा; खासदार कोल्हेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मंचर (पुणे) : राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र शिरुर लोकसभा मतदार संघात उभारण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या केंद्रासाठीचा डीपीआर तयार करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.  - पुरंदरच्या सीताफळाचा हंगाम दिड महिना अगोदरच गुंडाळला जातोय!​ भीमाशंकरचे अभयारण्य आणि खेड, जुन्नरच्या आदिवासी क्षेत्रात गुळवेल, हिरडा यासह असंख्य वनौषधी आहेत. या भागात वनौषधी व लागवडीसाठी बराच वाव आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळू शकेल. या भागात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नाईक यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सदर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर तयार करणे, जागा निश्चित करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे आदी कामांसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.  - 'सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही, पण...'; वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख व आयुष उपसंचालक . दिगंबर मोकाट, ए. बी. आढे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे नियोजन अधिकारी स्वप्निल कोरडे, संकेत तोंडारे, शुभांगी फुले (तहसीलदार सर्वसाधारण शाखा), जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आदी बाबींसाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याकरिता सर्व संबंधितांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.  या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र आपल्या भागात होणे ही मोठी बाब असून त्याचा मोठा लाभ आदिवासी समाजाला तर होईलच परंतु आयुर्वेदाच्या संशोधनासाठी त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्तरावर याचा पाठपुरावा करणार आहोत. आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याच्या प्रस्ताव आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी, पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/Tcb3G6o41D — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 30, 2020 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32yQISU

No comments:

Post a Comment