हे वर्ष कुणासाठी धडा देणारे तर कुणासाठी ठरले अविस्मरणीय; २० हजार कुटुंबीयांत आनंदाचे ढोल नागपूर : कोरोनाच्या काळात एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत नागपूरकर दहशतीत, प्रशासन चिंतेत व आरोग्य कर्मचारी संघर्षात होते. एकूणच निराशाजनक वातावरण असतानाच शहरातील २० हजारांवर कुटुंबीयांनी बाळाच्या जन्मामुळे आनंदाचे क्षण साजरे केले. शहरात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २० हजार ५८२ बालकांनी जन्म घेतल्याची आकडेवारी महापालिकेने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून पुढे आली आहे. त्यामुळे या बाळांच्या पालकांना कोरोनाच्या काळातही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. किंबहुना त्यांच्यासाठी ते अविस्मरणीय क्षण ठरले. हेही वाचा - पदवीधर निवडणुक: काँग्रसचं ठरलं, भाजपचं अजूनही गुलदस्त्यात; अभिजित वंजारी सोमवारी अर्ज दाखल करणार सहा महिन्यांत ९ हजार ८६३ मुलींना जन्म घेतला तर १० हजार ७१९ मुलांनी जन्म घेतला. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत १५ हजार ५५६ मुली तर १६ हजार ६८० मुले जन्माला आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचा जन्मदर कमीच दिसून आला. एवढेच नव्हे मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान बाळांच्या जन्माच्या तुलनेत यंदा जन्मदर कमी दिसून येत आहे. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २५ हजार ९६६ बाळांनी जन्म घेतला होता. यंदा मात्र या सहा महिन्यांत २० हजार ५८२ जन्माची नोंद महापालिकेने केली. मागील वर्षी एकूण ४० हजार ६७२ बाळांच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. यंदा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ३२ हजार २३६ बाळांची नोंद करण्यात आली असून, या कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला. अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा! यंदाही मुलींचा जन्मदर कमीच कोरोनामुळे सर्वांसाठी हे वर्ष धडा देणारे ठरले. परंतु, घरात नवा पाहुणा आल्याने २० हजारांवर कुटुंबीयांसाठी हे वर्ष अविस्मरणीय ठरले. विशेष म्हणजे इतर वर्षांप्रमाणेच यंदाही मुलींचा जन्मदर कमी असल्याचेच आकडेवारीतून स्पष्ट झाले. महिन्यानुसार बाळांच्या जन्माची नोंद महिना २०१९ २०२० एप्रिल ४२४४ ३२०७ मे ४५०७ ३८४२ जून ३८६५ ३३८२ जुलै ४१५१ ३७७९ ऑगस्ट ४६६४ २८२० सप्टेंबर ४५३४ ३५५२ संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 8, 2020

हे वर्ष कुणासाठी धडा देणारे तर कुणासाठी ठरले अविस्मरणीय; २० हजार कुटुंबीयांत आनंदाचे ढोल नागपूर : कोरोनाच्या काळात एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत नागपूरकर दहशतीत, प्रशासन चिंतेत व आरोग्य कर्मचारी संघर्षात होते. एकूणच निराशाजनक वातावरण असतानाच शहरातील २० हजारांवर कुटुंबीयांनी बाळाच्या जन्मामुळे आनंदाचे क्षण साजरे केले. शहरात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २० हजार ५८२ बालकांनी जन्म घेतल्याची आकडेवारी महापालिकेने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून पुढे आली आहे. त्यामुळे या बाळांच्या पालकांना कोरोनाच्या काळातही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. किंबहुना त्यांच्यासाठी ते अविस्मरणीय क्षण ठरले. हेही वाचा - पदवीधर निवडणुक: काँग्रसचं ठरलं, भाजपचं अजूनही गुलदस्त्यात; अभिजित वंजारी सोमवारी अर्ज दाखल करणार सहा महिन्यांत ९ हजार ८६३ मुलींना जन्म घेतला तर १० हजार ७१९ मुलांनी जन्म घेतला. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत १५ हजार ५५६ मुली तर १६ हजार ६८० मुले जन्माला आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचा जन्मदर कमीच दिसून आला. एवढेच नव्हे मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान बाळांच्या जन्माच्या तुलनेत यंदा जन्मदर कमी दिसून येत आहे. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २५ हजार ९६६ बाळांनी जन्म घेतला होता. यंदा मात्र या सहा महिन्यांत २० हजार ५८२ जन्माची नोंद महापालिकेने केली. मागील वर्षी एकूण ४० हजार ६७२ बाळांच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. यंदा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ३२ हजार २३६ बाळांची नोंद करण्यात आली असून, या कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला. अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा! यंदाही मुलींचा जन्मदर कमीच कोरोनामुळे सर्वांसाठी हे वर्ष धडा देणारे ठरले. परंतु, घरात नवा पाहुणा आल्याने २० हजारांवर कुटुंबीयांसाठी हे वर्ष अविस्मरणीय ठरले. विशेष म्हणजे इतर वर्षांप्रमाणेच यंदाही मुलींचा जन्मदर कमी असल्याचेच आकडेवारीतून स्पष्ट झाले. महिन्यानुसार बाळांच्या जन्माची नोंद महिना २०१९ २०२० एप्रिल ४२४४ ३२०७ मे ४५०७ ३८४२ जून ३८६५ ३३८२ जुलै ४१५१ ३७७९ ऑगस्ट ४६६४ २८२० सप्टेंबर ४५३४ ३५५२ संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/357s3q6

No comments:

Post a Comment