जाणिवांची दीपावली ! (प्रवीण दवणे ) दीपोत्सवाला येत्या शनिवारपासून (१४ नोव्हेंबर ) सुरवात होत आहे.  काळोखाला प्रकाशानं उत्तर देणाऱ्या दीपोत्सवाची साद अगदी अंतरावर येऊन ठेपली आहे. पर्यावरणानं मानवाला परखड परीक्षेला बसवलं. आतषबाजीचा हा काळ नव्हे; पण लहानग्यांच्या आनंदासाठी, संस्कारांच्या सुगंधासाठी साजरी करताना या वर्षीची दिवाळी मोहकरंगी, पण मौन बोलकी असायला हवी. ऑनलाइन नाती जपताना, सामाजिक संस्थेला बहीण मानून उपेक्षित जिवांना सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना मदतीची भाऊबीज देताना हा दीपोत्सव जाणिवांचाही होऊ शकेल. तपश्‍चर्येची सत्त्वपरीक्षा घ्यावी तसा यंदाचा दीपोत्सव आहे. हे तप पृथ्वीच्या पाठीवर जिथं-जिथं माणूस आहे, तिथं-तिथं केलं गेलं नि अजूनही ते सुरूच आहे. वर्षभराच्या सर्व क्षणांचा आणि सणांचा चेहरा बदलणारं हे वर्ष गेलं; तालाविना रास नि शोभेविना आरास असं कधी झालं नव्हतं; परंतु विजिगीषू वृत्ती नेहमीच आव्हानं स्वीकारते; जीवनानं ते स्वीकारलं आणि अश्रूंनीही थबकून हसावं अशी किमया केली. या अनपेक्षित गुंतागुंतीच्या वाटेवर समंजस संवेदनेला एकच गोष्ट पटली, ती म्हणजे पंचमहाभुतं ज्याप्रमाणे मानवनिर्मित रेषा जाणीत नाहीत, त्याप्रमाणंच असे आव्हानात्मक आघातही ! अवघं विश्‍व त्यासाठी आजही एकवटलं आहे. अतिशय धीरानं, सहिष्णुतेनं सारी वसुंधरा प्रकाशोत्सवाकडे निघाली आहे. आठवणींना वळून बघता येतं; पण वर्तमान मात्र नित्य नवा क्षण जागवत निघालेला असतो. त्याला वळून मागं-मागं जाण्याची सोय नाही. म्हणूनच त्याला भविष्य असतं. येणाऱ्या क्षणांतून, म्हणूनच आनंदोत्सवाचे नवे चेहरे दिसू लागले आहेत. यंदाचा दीपोत्सव कुणा अनामिकानं उजळलेल्या पहिल्या पणतीसारखा मला जाणवू लागला आहे. संदर्भ बदलले आहेत; ते स्वीकारून आपण प्रत्ययकारी सकारात्मकतेनं तो साजरा करणार आहोत. नात्यांची सोबत सहज होती; तेव्हा आपण ती गृहीत धरत गेलो. दारात रुजलेल्या मोगऱ्यासारखी ती दरवळताना, वाट अडवणाऱ्या सौरभासाठी आपल्याला वेळ नव्हता; पण या वर्षी नात्यांची ऊब अधिक ओढीनं जाणवणार आहे. कारण प्रत्येक घरानं आणि घरातील प्रत्येकानं एकटेपण सोसलं आहे. आपल्यासाठी अनेक घरं साद घालतात, तेव्हा आपण निश्‍चिंत असतो; पण हे वर्ष मुकं-मुकं गेलं. म्हणूनच अनेक माध्यमांतून हे मुकेपण घालवणं, पुन्हा नव्या प्रसन्नतेनं नव्या नात्यांना विविध प्रकारे साद घालणं, आपल्याच नव्हे, आपली मूकपणे वाट पाहणाऱ्या घरालाही स्वयंकेंद्रितता दूर ठेवून ‘आम्ही सोबत आहोत’ हे आश्‍वासन देणं ही या वर्षीची आपली रंगावली असणार आहे. काळोखाला प्रकाशाचं उत्तर देणारा हा सण आता त्याच निर्धारानं आपण साजरा करणार आहोत. जेव्हा एकमेकांना सहज भेटणं शक्‍य होतं तेव्हा आपण ‘ऑनलाइन’ होतो. आता ‘ऑनलाइन’ भेट हीच प्रत्यक्ष भेटीची ओढ घेऊन यायला हवी. थोडं अधिक दृढतेनं भेटलं, तर या वर्षी चालणार नाही. जेव्हा अंतर पार करून येणं चालणार होतं, तेव्हा आपण अंतर ठेवत होतो. आता अगदी उलट असणार आहे. अंतर राखून अंतरापर्यंत पोचणं या दीपोत्सवात जमायला हवं. सात-आठ महिने झेललेल्या मानसिक ताण-तणावाचं रूपांतर आता नव्या सहनशक्तीत करायला हवं. दिवाळी तर साजरी करायचीच; पण आता नव्या रिवाजासह! परंपरा तर जपायचीच; पण नवी परंपरा त्यात सहज मिसळून. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हातावर ज्यांचं पोट, त्या लक्षावधी आयुष्यांचा जीवनावरचा विश्‍वास पार उडाला आहे. आपल्या भोवती असे अनेक-अनेक आहेत. लघुउद्योग क्षीण झाले, चुली विझू-विझू झाल्या; त्या घरापर्यंत आपण पोहोचू शकलो तर! आपल्या वसाहतीतील आकाशकंदील कष्टकरी हातांनी केलेले असतील, तर आकाशकंदील आपण घेताना, थोडा प्रकाश त्यांच्याही घरात उजळेल. उटणं आणि सुवासिक अत्तरांचा मानसिक मूड काहीसा कमी असेल; पण मदतीचा भाग म्हणून आपण लघुउद्योजक भगिनींकडून ते विकत घेतले नि इतरांना तसा आग्रह केला, तर अत्तराचं एक बोट त्यांच्याही मनगटाला लागू शकेल... सणांची निर्मितीच मुळी ऊर्जावर्धनासाठी झाली. ऋतुमानाप्रमाणं सण रुजवताना पूर्वजांनी मानसिकतेचा विचार केला. या वर्षीचा दीपोत्सव नव्या ऊर्जेचा स्रोत असायलाच हवा. कारण चैतन्यशक्तीची ही लहरच पुढच्या पावलासाठी उत्तर असणार आहे. म्हणूनच मोबाईलवरच्या संदेशातून दुर्दम्य आशावाद रुजवणारीच रोपं आपण रुजवायला हवीत. नकारात्मकतेच्या मार्केटिंग युगात आपण शुभता, सात्त्विकता यांचे सूर अधिक एकजुटीनं आळवायला हवेत. काहीसे कृत्रिम वाटेल ते; पण त्यातून इच्छाशक्तीचं बळ वाढेल, तो उत्साह हेसुद्धा दीपोत्सवाचेच एक सुरेल रोप असेल. या वर्षी दूर गावी ज्यांची मुलं आहेत असे अनेक ज्येष्ठ नागरिक थोडे हिरमुसले असतील. परदेशातील आप्तांनी तर येण्याचा विचारच केला नसेल; कारण तिथंही हेच उंबरठे आहेत. अशा वेळी योग्य काळजी घेऊन ज्येष्ठांना भेटणं हा वेगळाच आनंद असेल. घरातून बाहेर दिसणारी माणसं वेगळी नि घरात त्यांचे एकाकीपण वेगळे. समजूतदार मनं आपली कातरता व्यक्त करीत नाहीत; सोसत राहतात. अशांना आपली प्रत्यक्ष भेट खूप दिलासा देणारी ठरेल. जर तेही शक्‍य नसेल, तर एखाददुसरा व्हिडिओ कॉल! चेहऱ्यासहित थोड्या हॅलो! हाय! च्या स्नेहगप्पा! त्या तर कुठूनही कुठे करता येतील. नात्यांना आलेलं हळवं मौन थोडं मोकळं करणं ही या वर्षीच्या दीपोत्सवाची निरांजन असतील. व्यक्त होण्याचं मोल संवेदनशील मनांना आता अधिक ठळकपणे जाणवलं आहे. अगदी माझ्यासह आधीच्या पिढीतील मंडळी ज्या समाजमाध्यमांकडे काहीशा दूरस्थतेने पाहत होती, त्या सर्वांना गेल्या जवळ जवळ वर्षभरात याच माध्यमांनी आधार दिला. दोन नाकपुड्यांप्रमाणं जणू तिसरी नाकपुडी म्हणजे हा सोशल मीडिया झाला. गंमत म्हणजे ज्यांना केवळ आलेले फोन घेता येत होते व त्यातून केवळ बोलता येत होते, तीही माणसं आता बोटांचे ओठ करून, अक्षरे मुद्रित करून चुकतमाकत, धडपडत बोलू लागली. म्हणजे ‘डॉक्‍टर, औषध घ्यायला केव्हा येऊ?’ असं म्हणायचं असताना ‘औषध द्यायला केव्हा येऊ?’ असं डॉक्‍टरांनाच विचारू लागली नि डॉक्‍टरही मास्कखाली हसू लागले. हे खुद्द डॉक्‍टरांनीच मला मास्कमधून सांगितलं. आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा तर अशा माध्यमांची पहिली मुळाक्षरे गिरवणारी जुनी पिढी आता या निमित्ताने नव्या पिढीशी ‘कनेक्‍ट’ झाली. एका वेगळ्या अर्थानं ‘माध्यमांतर’ पडलं होतं; पण ते अंतर कमी होऊन गॅडम्माला ‘हाय’ करणारी रिंकू नि ‘बेटा हाऊ आर यू?’ असं विचारणारी पूर्वीची आजी आजच्या ग्रॅंडम्माच्या रुबाबात विचारू लागली. आता हीच संवादाची ओळ दीपोत्सवाच्या वातावरणात पुढे नेता येणार आहे. दिवाळीच्या वातावरणात आजीच्याच जुन्या ‘रेसिपीज’ नव्यानं शिकता येणं सहज शक्‍य आहे. पार्सल संस्कृतीचं प्रमाण विपरीत कारणानं का होईना कमी झालं; ते मुद्दाम वाढवण्याचं काहीच कारण नाही. आता घरात जेवणारी माणसं घरात शिजवलेलंच जेवून बऱ्यापैकी सडपातळ झालेली दिसत आहेत. घरातलं अन्न आप्तस्वकियांच्या केवळ भुकेची सोय नसते; त्यात आपुलकी असते. मग या वेळच्या फराळात नात नि आजी, आजोबा नि नातू, पती नि पत्नी असं मिळू नवा असा एक तरी पदार्थ केला, तरी दिवाळी पहाट चवदार व्हायला मदत होईल. निदान झालेल्या चुकांतून एक नवीच चवसुद्धा हाती नव्हे, पण जिभेवर येऊ शकेल. उत्सव साजरा करणं हा मला निव्वळ ‘टाइमपास’ वाटत नाही; ती अनेकदा जगण्याचीही गरज असते. घडून घडलेल्या काही घटनांची आठवणही माणसाला काही वेळा दुबळी करते, तेव्हा त्या स्मरणांना थोडं दूर करण्याची प्रकाशमय युक्ती करावीच लागते. ‘कधी थांबते ना कोठे त्याला म्हणावं जीवन’ तेव्हा जीवनाला थांबून चालणारच नसतं. मग नदी वाहताना दोन्ही काठावर त्याज्य  ते दूर ठेवीत, नवे ते स्वीकारीत पुढे निघते; सागर होते. प्रत्येकाचं आयुष्य इतक्‍याच प्रगल्भतेनं नीतळ-निखळ करण्यासाठीच साऱ्या पृथ्वीला तपश्‍चर्येला बसावं लागलं; अवघा मानवसमाज होरपळला; पण त्यातून आपण किती उजळलो हे या दीपोत्सवात कळणार आहे. ‘पर्यावरण’ या शब्दाचाही वीट यावा इतकं पर्यावरणाबद्दल आपण ऐकत-वाचत होतो. परीक्षेला ‘पर्यावरण’ हा विषय नेमूनही अंदाजे उत्तर देऊन नावापुरतं उत्तीर्ण होणं होत होतं. पण यातून आपण काहीही शिकत नव्हतो. सांगत राहणाऱ्या वैज्ञानिकांकडे दुर्लक्ष करण्याचा वसा घेतल्याप्रमाणं सारा मानवसमूह वागत होता. माणूस निसर्गावर प्रेम करतो ते स्वतःच्या सोयीनं, निसर्ग जीवमात्रावर प्रेम करतो ते आईच्या ओढीनं. निरपेक्ष जिव्हाळ्यानं. केव्हा तरी - केव्हा जरी आईलाही मुलावरच्या प्रेमाखातरच डोळे वटारावेच लागतात. आई सहसा हातात छडी घेत नाही; पण व्रात्यपणा हाताबाहेर गेला, की छडी हाती घ्यावीच लागते. मुलगा दचकतो. हे काय? आईच्या हातात - नि छडी? निसर्ग माउलीनं अतिशय - अतिशय नाइलाजानं छडी हाती घेतली. रुद्राचं रूप कसं असेल याची केवळ झलक आपल्याला मिळाली आहे. ब्रह्मा-विष्णूचे निर्मितीशांत रूप आपल्याला माहीत होतं; पण महेशाचं ‘शंख फुंकीत ये, येई रुद्रा!’ हे रूप फक्त काव्यात वा चित्रात पाहिलं होतं. गेल्या सात-आठ महिन्यांत निसर्गाला रुद्र व्हावं लागलं; ते का व्हावं लागलं याचा विचार आपण आजही केलेला नाही. व्यक्ती समंजस असते; पण व्यक्तिसमूहात ती समंजसता शिस्त रूपात दिसत नाही. आता पर्यावरणानं मानवाला परखड परीक्षेला बसवलं. ध्वनींचा अतिरेक, आनंदाचं उन्मादी विखारीपण, चंगळवादाचा अतिरेक इतका वाढला, की हे सारं ‘मीडियम मोल्ड’वर आणणं, त्या अरूप असलेल्या, पण सृष्टी नियंत्रित करणाऱ्या ऊर्जेला अत्यावश्‍यक वाटलं. आता येत्या दीपोत्सवात त्या परीक्षेचा निर्णय लागणार आहे. आतषबाजीचा हा काळ नव्हेच; पण लहानग्यांच्या आनंदासाठी ती केली, तर ती तितकीच निरागस असली पाहिजे. मोहक रंगी, पण मौनबोलकी अशीच ती पाहिजे. आपण आनंद कसा साजरा करतो यावरही सुविद्यता आणि सुसंस्कृतता अवलंबून असते. आनंद साजरा करताना हजारो जणांच्या झोपा उडवून, मेंदूला ठणका देत - हादरे बसवणारे ध्वनिकल्लोळ उठवणारे कुणी असेल, तर त्यानं अंतर्मुख व्हायला हवं. कारण माणसाला आता शांती हवीच आहे; पण निसर्गालाही ती हवी आहे. जो मनःशांती देतो तो निसर्ग आपण शहरीकरण, भौतिक प्रगतीच्या नावाखाली संकोच वाटावा इतका कमी केला; आता पुन्हा त्या निसर्गाचं जाणिवेनं स्वागत करणारी ही दिवाळी असायला हवी. ‘जगा नि आनंदानं मलाही जगू द्या - तेही आपल्या पुढील पिढ्यांसाठी!’ असं सांगत निसर्गानं जरा कुठं चुणूक दाखवली. यंदाच्या पणतीप्रकाशात निसर्गाची ही पावलं ओळखणारेच पुढच्या निरोगी आणि निरामय दिवाळीची पेरणी करणार आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी लौकिक संपत्तीची पासबुकं ठेवणारे पालक आपण पाहतो; पण आता निसर्ग जपणाऱ्या, फुलवणाऱ्या संवेदनांची पासबुकं आपण त्यांना द्यायला हवीत; या दीपावलीचा शुभ मुहूर्त त्यासाठी वाट पाहत आहे. या वेळीच नव्हे तर यापुढील कोणत्याही उत्सवात ही प्रगल्भता दिसेल, ही अपेक्षा सणांची महाराणी करीत आहे. या दीपोत्सवात दीप उजळताना आणखी एक वेगळा ज्ञानोत्सव घडू शकेल. तो म्हणजे कानांनीही वाचता येतं या जाणिवेचा. होय, कानालाही दृष्टी देणारं आकाशवाणीसारखं सुरेल माध्यम झळझळीत प्रकाशमाध्यम आलं. गायन ऐकण्याऐवजी नर्तन आहे, हे नव्यानं समजणारं हे दृक् माध्यम अतिपरिचयात होऊन माणसाची बौद्धिकता गृहीत धरू लागलं. पुस्तकांचं, सुरेल, अर्थपूर्ण गाण्यांचं अस्तित्व काहीसं सावलीत गेलं. आता पुन्हा नऊ माही अभ्यासाची वार्षिक परीक्षा दीपोत्सव घेणार आहे. काही पुस्तकं बोलणारी पुस्तकं म्हणून सादर होत आहेत. शालेय पाठ्यक्रम कानांच्या पाठशाळेत संपन्न होत आहे. पडत, धडपडत, ठेच लागत श्री सरस्वतीही आपली पथक्रमणा करीत आहे. अशा वेळी मराठी वाचकांचा उत्सुकता बिंदू असणारा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दिवाळी अंक! लेखक म्हणून जून-जुलैतच मला जाणवलं, निमंत्रणं मोजकीच आहेत. सारं विश्‍वच भांबावलेलं. निर्णय तरी काय घेणार? लेखन घरात करता येईल; ते इलेक्‍ट्रॉनिक पायवाटेवरून संपादकांपर्यंत पोहोचवताही येईल; पण मुद्रित करणारे कर्मचारीवर्ग, चित्रकार, वितरण व्यवस्थाच कोलमडलेली; परंतु जीवन ठामपणं आपला मार्ग शोधतेच! परंपरेत किंचितही खंड पडू नये म्हणून अविरत धडपडणाऱ्या संपादकांनी अतिशय धाडसानं काही प्रमाणात अंक प्रकाशित केले आहेत. त्या संपादकांनी आपल्याकडून अपेक्षिलेली उमेद आवडणारे अंक विकत घेऊन वाढवायला हवी. दिवाळी अंक विकत घेणं हा केवळ पैसे दिले नि वस्तू घेतली असा व्यवहार नसतो. तो एक मनामनांचा अनुबंध असतो. आनंदाची एक शांत, सुशीतल वाट वाचनातून जाते; प्रतिकूलतेवर मात करीत प्रकाशित झालेल्या अभिरुचीसंपन्न साहित्याला वाचक दाद देतातच. या वर्षी तर प्रकाशनपूर्व नोंदणीचे (जे संपादकांनीच जाहीर केले आहेत) ते आकडे पाहिले, की मराठी वाचक हा ‘दिवाळी अंक’ या सांस्कृतिक घटनेवर किती प्रीती करतो याचं घडललं दर्शन सुखदायी आहे. विशेष म्हणजे आता नव्या माध्यमातून ‘श्राव्य’ करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अंक वाचण्याची सवय कायम ठेवून अंक ऐकण्याची सवयही काही वेगळे परिमाण देऊ शकेल का, हे सांगणारी ही दिवाळी आहे. काही प्रयोग कालांतरानं सिद्ध होतात. थोडा वेळ त्यासाठी जावा लागतो. जमिनीत मुरलेलं पाणी, बीजातून फूल येईपर्यंतचा प्रवास धीरानं आजमावा लागतो. यंदाचा दीपोत्सव शब्दांतून जागा होईलच; पण तो नेत्रांबरोबर श्रवणातूनही. यंत्र-तंत्र माध्यमानं नव्या आव्हानाला दिलेली ही एक सृजनशील सोबत म्हणावी लागेल. या दीपोत्सवाचं आणखी एक देणं म्हणजे अति धावून जे गमावलंत; ते थोडं थांबून मिळतंय का हे पाहण्याचं बळ हे वर्ष देणार आहे. किती धावत-धावत सुटलो होतो आपण. पोचण्याची शाश्‍वती नसलेलं शिखर प्रत्येकाला गाठताना रस्ते दमत होते, हात हातातून सुटत होते, नाती मागं पडत होती. बोलायला उसंत नव्हती. आरोग्यातली संपत्ती कळत नव्हती. पुस्तक हाती घेणं विसरलो होतो. फक्त लौकिकासाठी... ऐहिकासाठी प्रचंड गती. अगतिक करणारी गती. या वेळची दिवाळी विरामातलेही चैतन्य दाखवणारी आहे. मोजक्‍याच आप्ताशी सुरक्षित अंतर ठेवून पण अंतःकरणपूर्वक आपण भेटणार आहोत. आता वाट पाहू लागलेल्या संवादांच्या रस्त्यांना आम्ही येतोय हे सांगणार आहोत. मुख्य म्हणजे जगाला  वेळ देताना वेळ नि आपण अपुरे पडलेले आपण स्वतःलाही जाणिवेनं अपॉइंटमेंट देणार आहोत! गोंगाट खूप ऐकला. आता आतली शांतताही ऐकणार आहोत. स्वतःशी संवादी राहण्यातून खूप काही मिळतं, ते असं मूठ उघडून तळहातावर दाखवता नाही येणार; पण आपल्या प्रसन्नतेतून ते दिसणार आहे. सुगंधी उटण्याचं हळदुलं तेज उत्सवासाठी जरूर असूद्या; पण हे स्वतःशी संवादाचं, काही वेळा स्वीकारलेल्या मौनाचं तेज सतत सोबतीला असणार आहे. या सात-आठ महिन्यांनी मनानं बरेच टप्पे ओलांडले. त्या मनाचेही खरे तर मनापासून आभार मानायला हवेत. जगाला थॅंक्‍यू म्हणताना स्वतःला ‘थॅंक्‍यू’ म्हणणं राहून जातं; या दीपोत्सवात तेही म्हणूया! का? कारण या आपल्यात सर्वत्र वावरणाऱ्या मनाने आपल्याला या अचानक उद्‌भवलेल्या एकाकी वाटेवर प्राणप्रिय सोबत केली आहे. मन कासाविस झालेलं कळतं; पण तेच आधार देताना ध्यानात येत नाही. मन कुणी दुखावलेलं कळतं; पण आपण आपल्याच मनाला दुखावतो ते कळत नाही. या काळात भांबावणं, सैरभैर होणं, एकाकी होणं, स्वतःला समजावणं, चैतन्यानं पुन्हा नव्यानं स्वतःला शोधणं, जुने सल विसरून नव्यानं नात्यांशी बोलणं, आपले दुराग्रह विसरून जे समोर येईल त्याचा सहज स्वीकार करणं, दुसऱ्याच्या हितासाठी ‘प्रार्थना’ होणं असे असंख्य टप्पे मनानं ओलांडून आपण दीपोत्सवाच्या अगदी एका सादेच्या अंतरावर आलो आहोत. त्या मनाशी सकारात्मक बोलणं आणि नव्या गतीला पंख दे, हे सांगण हेही एक नवं नातंच असणार आहे. निसर्गानं आणखी एक करुणा आपल्यावर केली आहे. आधीचे सर्व सण केवळ दिनदर्शिकेपर्यंतच उरले. आले कधी, गेले कधी कळलेही नाहीत. तारखांचे नि महिन्यांचे इतके घोटाळे सुरू झाले, की सुरू आहे तो ऑगस्ट की सप्टेंबर, वार मंगळवार की बुधवार इतकं आपण मजेनं म्हणायचं तर कालातीत जगू लागलो. पण साऱ्या भारतीयांनी गांभीर्य ओळखून सण अंगणात न वावरू देता घरापुरते ठेवले. आता त्याचमुळं की काय, लाट जरा ओसरून मनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढून माणसं घराबाहेर पडू लागली आहेत. दिवाळी नक्कीच अधिक उजळावी, काळोखातून प्रकाशाकडं मनं निघावीत हे निसर्गालाही वाटत आहे. अनाहत ओंकार पुन्हा घ्यावा नि पुनश्‍च हरिॐ म्हणत काळानं शिकवलेले धडे न विसरता नव्या जाणिवेनं तेजाकडं पाऊल टाकावं असं निसर्गालाही वाटत असावं. म्हणूनच भयाची घट्ट गाठ जरा सैल करीत श्‍वास घेण्याची मोकळीक मिळाली असावी. या भासणाऱ्या सैलाव्यानं पुन्हा जर पहिले पाढे पंचावन्न केले, तर मात्र...  म्हणूनच जाणिवांचा दीपोत्सव ही सद्यःस्थितीची गरज आहे. यंदाची भाऊबीज ऑनलाइन असेल, बहीण भावाला व्हिडिओ कॉलवर ओवाळेल, भाऊबीजही फक्त पाकीट दाखवून केली जाईल; पण त्याच वेळी गरजवंताच्या संस्थेला आपण बहीण मानून ऑनलाइन भाऊबीज दिलीत तर ! बंधूभाव अधिक सहिष्णुतेनं उजळेल. दीपावलीत प्रयत्न करणार आहोत अंधार दूर करण्याचा; म्हणूनच यंदाचा दीपोत्सव अधिक निरामय असेल ! जाणिवांचा असेल. ! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 7, 2020

जाणिवांची दीपावली ! (प्रवीण दवणे ) दीपोत्सवाला येत्या शनिवारपासून (१४ नोव्हेंबर ) सुरवात होत आहे.  काळोखाला प्रकाशानं उत्तर देणाऱ्या दीपोत्सवाची साद अगदी अंतरावर येऊन ठेपली आहे. पर्यावरणानं मानवाला परखड परीक्षेला बसवलं. आतषबाजीचा हा काळ नव्हे; पण लहानग्यांच्या आनंदासाठी, संस्कारांच्या सुगंधासाठी साजरी करताना या वर्षीची दिवाळी मोहकरंगी, पण मौन बोलकी असायला हवी. ऑनलाइन नाती जपताना, सामाजिक संस्थेला बहीण मानून उपेक्षित जिवांना सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना मदतीची भाऊबीज देताना हा दीपोत्सव जाणिवांचाही होऊ शकेल. तपश्‍चर्येची सत्त्वपरीक्षा घ्यावी तसा यंदाचा दीपोत्सव आहे. हे तप पृथ्वीच्या पाठीवर जिथं-जिथं माणूस आहे, तिथं-तिथं केलं गेलं नि अजूनही ते सुरूच आहे. वर्षभराच्या सर्व क्षणांचा आणि सणांचा चेहरा बदलणारं हे वर्ष गेलं; तालाविना रास नि शोभेविना आरास असं कधी झालं नव्हतं; परंतु विजिगीषू वृत्ती नेहमीच आव्हानं स्वीकारते; जीवनानं ते स्वीकारलं आणि अश्रूंनीही थबकून हसावं अशी किमया केली. या अनपेक्षित गुंतागुंतीच्या वाटेवर समंजस संवेदनेला एकच गोष्ट पटली, ती म्हणजे पंचमहाभुतं ज्याप्रमाणे मानवनिर्मित रेषा जाणीत नाहीत, त्याप्रमाणंच असे आव्हानात्मक आघातही ! अवघं विश्‍व त्यासाठी आजही एकवटलं आहे. अतिशय धीरानं, सहिष्णुतेनं सारी वसुंधरा प्रकाशोत्सवाकडे निघाली आहे. आठवणींना वळून बघता येतं; पण वर्तमान मात्र नित्य नवा क्षण जागवत निघालेला असतो. त्याला वळून मागं-मागं जाण्याची सोय नाही. म्हणूनच त्याला भविष्य असतं. येणाऱ्या क्षणांतून, म्हणूनच आनंदोत्सवाचे नवे चेहरे दिसू लागले आहेत. यंदाचा दीपोत्सव कुणा अनामिकानं उजळलेल्या पहिल्या पणतीसारखा मला जाणवू लागला आहे. संदर्भ बदलले आहेत; ते स्वीकारून आपण प्रत्ययकारी सकारात्मकतेनं तो साजरा करणार आहोत. नात्यांची सोबत सहज होती; तेव्हा आपण ती गृहीत धरत गेलो. दारात रुजलेल्या मोगऱ्यासारखी ती दरवळताना, वाट अडवणाऱ्या सौरभासाठी आपल्याला वेळ नव्हता; पण या वर्षी नात्यांची ऊब अधिक ओढीनं जाणवणार आहे. कारण प्रत्येक घरानं आणि घरातील प्रत्येकानं एकटेपण सोसलं आहे. आपल्यासाठी अनेक घरं साद घालतात, तेव्हा आपण निश्‍चिंत असतो; पण हे वर्ष मुकं-मुकं गेलं. म्हणूनच अनेक माध्यमांतून हे मुकेपण घालवणं, पुन्हा नव्या प्रसन्नतेनं नव्या नात्यांना विविध प्रकारे साद घालणं, आपल्याच नव्हे, आपली मूकपणे वाट पाहणाऱ्या घरालाही स्वयंकेंद्रितता दूर ठेवून ‘आम्ही सोबत आहोत’ हे आश्‍वासन देणं ही या वर्षीची आपली रंगावली असणार आहे. काळोखाला प्रकाशाचं उत्तर देणारा हा सण आता त्याच निर्धारानं आपण साजरा करणार आहोत. जेव्हा एकमेकांना सहज भेटणं शक्‍य होतं तेव्हा आपण ‘ऑनलाइन’ होतो. आता ‘ऑनलाइन’ भेट हीच प्रत्यक्ष भेटीची ओढ घेऊन यायला हवी. थोडं अधिक दृढतेनं भेटलं, तर या वर्षी चालणार नाही. जेव्हा अंतर पार करून येणं चालणार होतं, तेव्हा आपण अंतर ठेवत होतो. आता अगदी उलट असणार आहे. अंतर राखून अंतरापर्यंत पोचणं या दीपोत्सवात जमायला हवं. सात-आठ महिने झेललेल्या मानसिक ताण-तणावाचं रूपांतर आता नव्या सहनशक्तीत करायला हवं. दिवाळी तर साजरी करायचीच; पण आता नव्या रिवाजासह! परंपरा तर जपायचीच; पण नवी परंपरा त्यात सहज मिसळून. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हातावर ज्यांचं पोट, त्या लक्षावधी आयुष्यांचा जीवनावरचा विश्‍वास पार उडाला आहे. आपल्या भोवती असे अनेक-अनेक आहेत. लघुउद्योग क्षीण झाले, चुली विझू-विझू झाल्या; त्या घरापर्यंत आपण पोहोचू शकलो तर! आपल्या वसाहतीतील आकाशकंदील कष्टकरी हातांनी केलेले असतील, तर आकाशकंदील आपण घेताना, थोडा प्रकाश त्यांच्याही घरात उजळेल. उटणं आणि सुवासिक अत्तरांचा मानसिक मूड काहीसा कमी असेल; पण मदतीचा भाग म्हणून आपण लघुउद्योजक भगिनींकडून ते विकत घेतले नि इतरांना तसा आग्रह केला, तर अत्तराचं एक बोट त्यांच्याही मनगटाला लागू शकेल... सणांची निर्मितीच मुळी ऊर्जावर्धनासाठी झाली. ऋतुमानाप्रमाणं सण रुजवताना पूर्वजांनी मानसिकतेचा विचार केला. या वर्षीचा दीपोत्सव नव्या ऊर्जेचा स्रोत असायलाच हवा. कारण चैतन्यशक्तीची ही लहरच पुढच्या पावलासाठी उत्तर असणार आहे. म्हणूनच मोबाईलवरच्या संदेशातून दुर्दम्य आशावाद रुजवणारीच रोपं आपण रुजवायला हवीत. नकारात्मकतेच्या मार्केटिंग युगात आपण शुभता, सात्त्विकता यांचे सूर अधिक एकजुटीनं आळवायला हवेत. काहीसे कृत्रिम वाटेल ते; पण त्यातून इच्छाशक्तीचं बळ वाढेल, तो उत्साह हेसुद्धा दीपोत्सवाचेच एक सुरेल रोप असेल. या वर्षी दूर गावी ज्यांची मुलं आहेत असे अनेक ज्येष्ठ नागरिक थोडे हिरमुसले असतील. परदेशातील आप्तांनी तर येण्याचा विचारच केला नसेल; कारण तिथंही हेच उंबरठे आहेत. अशा वेळी योग्य काळजी घेऊन ज्येष्ठांना भेटणं हा वेगळाच आनंद असेल. घरातून बाहेर दिसणारी माणसं वेगळी नि घरात त्यांचे एकाकीपण वेगळे. समजूतदार मनं आपली कातरता व्यक्त करीत नाहीत; सोसत राहतात. अशांना आपली प्रत्यक्ष भेट खूप दिलासा देणारी ठरेल. जर तेही शक्‍य नसेल, तर एखाददुसरा व्हिडिओ कॉल! चेहऱ्यासहित थोड्या हॅलो! हाय! च्या स्नेहगप्पा! त्या तर कुठूनही कुठे करता येतील. नात्यांना आलेलं हळवं मौन थोडं मोकळं करणं ही या वर्षीच्या दीपोत्सवाची निरांजन असतील. व्यक्त होण्याचं मोल संवेदनशील मनांना आता अधिक ठळकपणे जाणवलं आहे. अगदी माझ्यासह आधीच्या पिढीतील मंडळी ज्या समाजमाध्यमांकडे काहीशा दूरस्थतेने पाहत होती, त्या सर्वांना गेल्या जवळ जवळ वर्षभरात याच माध्यमांनी आधार दिला. दोन नाकपुड्यांप्रमाणं जणू तिसरी नाकपुडी म्हणजे हा सोशल मीडिया झाला. गंमत म्हणजे ज्यांना केवळ आलेले फोन घेता येत होते व त्यातून केवळ बोलता येत होते, तीही माणसं आता बोटांचे ओठ करून, अक्षरे मुद्रित करून चुकतमाकत, धडपडत बोलू लागली. म्हणजे ‘डॉक्‍टर, औषध घ्यायला केव्हा येऊ?’ असं म्हणायचं असताना ‘औषध द्यायला केव्हा येऊ?’ असं डॉक्‍टरांनाच विचारू लागली नि डॉक्‍टरही मास्कखाली हसू लागले. हे खुद्द डॉक्‍टरांनीच मला मास्कमधून सांगितलं. आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा तर अशा माध्यमांची पहिली मुळाक्षरे गिरवणारी जुनी पिढी आता या निमित्ताने नव्या पिढीशी ‘कनेक्‍ट’ झाली. एका वेगळ्या अर्थानं ‘माध्यमांतर’ पडलं होतं; पण ते अंतर कमी होऊन गॅडम्माला ‘हाय’ करणारी रिंकू नि ‘बेटा हाऊ आर यू?’ असं विचारणारी पूर्वीची आजी आजच्या ग्रॅंडम्माच्या रुबाबात विचारू लागली. आता हीच संवादाची ओळ दीपोत्सवाच्या वातावरणात पुढे नेता येणार आहे. दिवाळीच्या वातावरणात आजीच्याच जुन्या ‘रेसिपीज’ नव्यानं शिकता येणं सहज शक्‍य आहे. पार्सल संस्कृतीचं प्रमाण विपरीत कारणानं का होईना कमी झालं; ते मुद्दाम वाढवण्याचं काहीच कारण नाही. आता घरात जेवणारी माणसं घरात शिजवलेलंच जेवून बऱ्यापैकी सडपातळ झालेली दिसत आहेत. घरातलं अन्न आप्तस्वकियांच्या केवळ भुकेची सोय नसते; त्यात आपुलकी असते. मग या वेळच्या फराळात नात नि आजी, आजोबा नि नातू, पती नि पत्नी असं मिळू नवा असा एक तरी पदार्थ केला, तरी दिवाळी पहाट चवदार व्हायला मदत होईल. निदान झालेल्या चुकांतून एक नवीच चवसुद्धा हाती नव्हे, पण जिभेवर येऊ शकेल. उत्सव साजरा करणं हा मला निव्वळ ‘टाइमपास’ वाटत नाही; ती अनेकदा जगण्याचीही गरज असते. घडून घडलेल्या काही घटनांची आठवणही माणसाला काही वेळा दुबळी करते, तेव्हा त्या स्मरणांना थोडं दूर करण्याची प्रकाशमय युक्ती करावीच लागते. ‘कधी थांबते ना कोठे त्याला म्हणावं जीवन’ तेव्हा जीवनाला थांबून चालणारच नसतं. मग नदी वाहताना दोन्ही काठावर त्याज्य  ते दूर ठेवीत, नवे ते स्वीकारीत पुढे निघते; सागर होते. प्रत्येकाचं आयुष्य इतक्‍याच प्रगल्भतेनं नीतळ-निखळ करण्यासाठीच साऱ्या पृथ्वीला तपश्‍चर्येला बसावं लागलं; अवघा मानवसमाज होरपळला; पण त्यातून आपण किती उजळलो हे या दीपोत्सवात कळणार आहे. ‘पर्यावरण’ या शब्दाचाही वीट यावा इतकं पर्यावरणाबद्दल आपण ऐकत-वाचत होतो. परीक्षेला ‘पर्यावरण’ हा विषय नेमूनही अंदाजे उत्तर देऊन नावापुरतं उत्तीर्ण होणं होत होतं. पण यातून आपण काहीही शिकत नव्हतो. सांगत राहणाऱ्या वैज्ञानिकांकडे दुर्लक्ष करण्याचा वसा घेतल्याप्रमाणं सारा मानवसमूह वागत होता. माणूस निसर्गावर प्रेम करतो ते स्वतःच्या सोयीनं, निसर्ग जीवमात्रावर प्रेम करतो ते आईच्या ओढीनं. निरपेक्ष जिव्हाळ्यानं. केव्हा तरी - केव्हा जरी आईलाही मुलावरच्या प्रेमाखातरच डोळे वटारावेच लागतात. आई सहसा हातात छडी घेत नाही; पण व्रात्यपणा हाताबाहेर गेला, की छडी हाती घ्यावीच लागते. मुलगा दचकतो. हे काय? आईच्या हातात - नि छडी? निसर्ग माउलीनं अतिशय - अतिशय नाइलाजानं छडी हाती घेतली. रुद्राचं रूप कसं असेल याची केवळ झलक आपल्याला मिळाली आहे. ब्रह्मा-विष्णूचे निर्मितीशांत रूप आपल्याला माहीत होतं; पण महेशाचं ‘शंख फुंकीत ये, येई रुद्रा!’ हे रूप फक्त काव्यात वा चित्रात पाहिलं होतं. गेल्या सात-आठ महिन्यांत निसर्गाला रुद्र व्हावं लागलं; ते का व्हावं लागलं याचा विचार आपण आजही केलेला नाही. व्यक्ती समंजस असते; पण व्यक्तिसमूहात ती समंजसता शिस्त रूपात दिसत नाही. आता पर्यावरणानं मानवाला परखड परीक्षेला बसवलं. ध्वनींचा अतिरेक, आनंदाचं उन्मादी विखारीपण, चंगळवादाचा अतिरेक इतका वाढला, की हे सारं ‘मीडियम मोल्ड’वर आणणं, त्या अरूप असलेल्या, पण सृष्टी नियंत्रित करणाऱ्या ऊर्जेला अत्यावश्‍यक वाटलं. आता येत्या दीपोत्सवात त्या परीक्षेचा निर्णय लागणार आहे. आतषबाजीचा हा काळ नव्हेच; पण लहानग्यांच्या आनंदासाठी ती केली, तर ती तितकीच निरागस असली पाहिजे. मोहक रंगी, पण मौनबोलकी अशीच ती पाहिजे. आपण आनंद कसा साजरा करतो यावरही सुविद्यता आणि सुसंस्कृतता अवलंबून असते. आनंद साजरा करताना हजारो जणांच्या झोपा उडवून, मेंदूला ठणका देत - हादरे बसवणारे ध्वनिकल्लोळ उठवणारे कुणी असेल, तर त्यानं अंतर्मुख व्हायला हवं. कारण माणसाला आता शांती हवीच आहे; पण निसर्गालाही ती हवी आहे. जो मनःशांती देतो तो निसर्ग आपण शहरीकरण, भौतिक प्रगतीच्या नावाखाली संकोच वाटावा इतका कमी केला; आता पुन्हा त्या निसर्गाचं जाणिवेनं स्वागत करणारी ही दिवाळी असायला हवी. ‘जगा नि आनंदानं मलाही जगू द्या - तेही आपल्या पुढील पिढ्यांसाठी!’ असं सांगत निसर्गानं जरा कुठं चुणूक दाखवली. यंदाच्या पणतीप्रकाशात निसर्गाची ही पावलं ओळखणारेच पुढच्या निरोगी आणि निरामय दिवाळीची पेरणी करणार आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी लौकिक संपत्तीची पासबुकं ठेवणारे पालक आपण पाहतो; पण आता निसर्ग जपणाऱ्या, फुलवणाऱ्या संवेदनांची पासबुकं आपण त्यांना द्यायला हवीत; या दीपावलीचा शुभ मुहूर्त त्यासाठी वाट पाहत आहे. या वेळीच नव्हे तर यापुढील कोणत्याही उत्सवात ही प्रगल्भता दिसेल, ही अपेक्षा सणांची महाराणी करीत आहे. या दीपोत्सवात दीप उजळताना आणखी एक वेगळा ज्ञानोत्सव घडू शकेल. तो म्हणजे कानांनीही वाचता येतं या जाणिवेचा. होय, कानालाही दृष्टी देणारं आकाशवाणीसारखं सुरेल माध्यम झळझळीत प्रकाशमाध्यम आलं. गायन ऐकण्याऐवजी नर्तन आहे, हे नव्यानं समजणारं हे दृक् माध्यम अतिपरिचयात होऊन माणसाची बौद्धिकता गृहीत धरू लागलं. पुस्तकांचं, सुरेल, अर्थपूर्ण गाण्यांचं अस्तित्व काहीसं सावलीत गेलं. आता पुन्हा नऊ माही अभ्यासाची वार्षिक परीक्षा दीपोत्सव घेणार आहे. काही पुस्तकं बोलणारी पुस्तकं म्हणून सादर होत आहेत. शालेय पाठ्यक्रम कानांच्या पाठशाळेत संपन्न होत आहे. पडत, धडपडत, ठेच लागत श्री सरस्वतीही आपली पथक्रमणा करीत आहे. अशा वेळी मराठी वाचकांचा उत्सुकता बिंदू असणारा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दिवाळी अंक! लेखक म्हणून जून-जुलैतच मला जाणवलं, निमंत्रणं मोजकीच आहेत. सारं विश्‍वच भांबावलेलं. निर्णय तरी काय घेणार? लेखन घरात करता येईल; ते इलेक्‍ट्रॉनिक पायवाटेवरून संपादकांपर्यंत पोहोचवताही येईल; पण मुद्रित करणारे कर्मचारीवर्ग, चित्रकार, वितरण व्यवस्थाच कोलमडलेली; परंतु जीवन ठामपणं आपला मार्ग शोधतेच! परंपरेत किंचितही खंड पडू नये म्हणून अविरत धडपडणाऱ्या संपादकांनी अतिशय धाडसानं काही प्रमाणात अंक प्रकाशित केले आहेत. त्या संपादकांनी आपल्याकडून अपेक्षिलेली उमेद आवडणारे अंक विकत घेऊन वाढवायला हवी. दिवाळी अंक विकत घेणं हा केवळ पैसे दिले नि वस्तू घेतली असा व्यवहार नसतो. तो एक मनामनांचा अनुबंध असतो. आनंदाची एक शांत, सुशीतल वाट वाचनातून जाते; प्रतिकूलतेवर मात करीत प्रकाशित झालेल्या अभिरुचीसंपन्न साहित्याला वाचक दाद देतातच. या वर्षी तर प्रकाशनपूर्व नोंदणीचे (जे संपादकांनीच जाहीर केले आहेत) ते आकडे पाहिले, की मराठी वाचक हा ‘दिवाळी अंक’ या सांस्कृतिक घटनेवर किती प्रीती करतो याचं घडललं दर्शन सुखदायी आहे. विशेष म्हणजे आता नव्या माध्यमातून ‘श्राव्य’ करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अंक वाचण्याची सवय कायम ठेवून अंक ऐकण्याची सवयही काही वेगळे परिमाण देऊ शकेल का, हे सांगणारी ही दिवाळी आहे. काही प्रयोग कालांतरानं सिद्ध होतात. थोडा वेळ त्यासाठी जावा लागतो. जमिनीत मुरलेलं पाणी, बीजातून फूल येईपर्यंतचा प्रवास धीरानं आजमावा लागतो. यंदाचा दीपोत्सव शब्दांतून जागा होईलच; पण तो नेत्रांबरोबर श्रवणातूनही. यंत्र-तंत्र माध्यमानं नव्या आव्हानाला दिलेली ही एक सृजनशील सोबत म्हणावी लागेल. या दीपोत्सवाचं आणखी एक देणं म्हणजे अति धावून जे गमावलंत; ते थोडं थांबून मिळतंय का हे पाहण्याचं बळ हे वर्ष देणार आहे. किती धावत-धावत सुटलो होतो आपण. पोचण्याची शाश्‍वती नसलेलं शिखर प्रत्येकाला गाठताना रस्ते दमत होते, हात हातातून सुटत होते, नाती मागं पडत होती. बोलायला उसंत नव्हती. आरोग्यातली संपत्ती कळत नव्हती. पुस्तक हाती घेणं विसरलो होतो. फक्त लौकिकासाठी... ऐहिकासाठी प्रचंड गती. अगतिक करणारी गती. या वेळची दिवाळी विरामातलेही चैतन्य दाखवणारी आहे. मोजक्‍याच आप्ताशी सुरक्षित अंतर ठेवून पण अंतःकरणपूर्वक आपण भेटणार आहोत. आता वाट पाहू लागलेल्या संवादांच्या रस्त्यांना आम्ही येतोय हे सांगणार आहोत. मुख्य म्हणजे जगाला  वेळ देताना वेळ नि आपण अपुरे पडलेले आपण स्वतःलाही जाणिवेनं अपॉइंटमेंट देणार आहोत! गोंगाट खूप ऐकला. आता आतली शांतताही ऐकणार आहोत. स्वतःशी संवादी राहण्यातून खूप काही मिळतं, ते असं मूठ उघडून तळहातावर दाखवता नाही येणार; पण आपल्या प्रसन्नतेतून ते दिसणार आहे. सुगंधी उटण्याचं हळदुलं तेज उत्सवासाठी जरूर असूद्या; पण हे स्वतःशी संवादाचं, काही वेळा स्वीकारलेल्या मौनाचं तेज सतत सोबतीला असणार आहे. या सात-आठ महिन्यांनी मनानं बरेच टप्पे ओलांडले. त्या मनाचेही खरे तर मनापासून आभार मानायला हवेत. जगाला थॅंक्‍यू म्हणताना स्वतःला ‘थॅंक्‍यू’ म्हणणं राहून जातं; या दीपोत्सवात तेही म्हणूया! का? कारण या आपल्यात सर्वत्र वावरणाऱ्या मनाने आपल्याला या अचानक उद्‌भवलेल्या एकाकी वाटेवर प्राणप्रिय सोबत केली आहे. मन कासाविस झालेलं कळतं; पण तेच आधार देताना ध्यानात येत नाही. मन कुणी दुखावलेलं कळतं; पण आपण आपल्याच मनाला दुखावतो ते कळत नाही. या काळात भांबावणं, सैरभैर होणं, एकाकी होणं, स्वतःला समजावणं, चैतन्यानं पुन्हा नव्यानं स्वतःला शोधणं, जुने सल विसरून नव्यानं नात्यांशी बोलणं, आपले दुराग्रह विसरून जे समोर येईल त्याचा सहज स्वीकार करणं, दुसऱ्याच्या हितासाठी ‘प्रार्थना’ होणं असे असंख्य टप्पे मनानं ओलांडून आपण दीपोत्सवाच्या अगदी एका सादेच्या अंतरावर आलो आहोत. त्या मनाशी सकारात्मक बोलणं आणि नव्या गतीला पंख दे, हे सांगण हेही एक नवं नातंच असणार आहे. निसर्गानं आणखी एक करुणा आपल्यावर केली आहे. आधीचे सर्व सण केवळ दिनदर्शिकेपर्यंतच उरले. आले कधी, गेले कधी कळलेही नाहीत. तारखांचे नि महिन्यांचे इतके घोटाळे सुरू झाले, की सुरू आहे तो ऑगस्ट की सप्टेंबर, वार मंगळवार की बुधवार इतकं आपण मजेनं म्हणायचं तर कालातीत जगू लागलो. पण साऱ्या भारतीयांनी गांभीर्य ओळखून सण अंगणात न वावरू देता घरापुरते ठेवले. आता त्याचमुळं की काय, लाट जरा ओसरून मनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढून माणसं घराबाहेर पडू लागली आहेत. दिवाळी नक्कीच अधिक उजळावी, काळोखातून प्रकाशाकडं मनं निघावीत हे निसर्गालाही वाटत आहे. अनाहत ओंकार पुन्हा घ्यावा नि पुनश्‍च हरिॐ म्हणत काळानं शिकवलेले धडे न विसरता नव्या जाणिवेनं तेजाकडं पाऊल टाकावं असं निसर्गालाही वाटत असावं. म्हणूनच भयाची घट्ट गाठ जरा सैल करीत श्‍वास घेण्याची मोकळीक मिळाली असावी. या भासणाऱ्या सैलाव्यानं पुन्हा जर पहिले पाढे पंचावन्न केले, तर मात्र...  म्हणूनच जाणिवांचा दीपोत्सव ही सद्यःस्थितीची गरज आहे. यंदाची भाऊबीज ऑनलाइन असेल, बहीण भावाला व्हिडिओ कॉलवर ओवाळेल, भाऊबीजही फक्त पाकीट दाखवून केली जाईल; पण त्याच वेळी गरजवंताच्या संस्थेला आपण बहीण मानून ऑनलाइन भाऊबीज दिलीत तर ! बंधूभाव अधिक सहिष्णुतेनं उजळेल. दीपावलीत प्रयत्न करणार आहोत अंधार दूर करण्याचा; म्हणूनच यंदाचा दीपोत्सव अधिक निरामय असेल ! जाणिवांचा असेल. ! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IigdQN

No comments:

Post a Comment