Final Year Exam : पुणे विद्यापीठाची फेरपरीक्षा आजपासून पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी फेर परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा गुरुवार (ता.५) पासून सुरू होत असून, यासाठी 26 हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत.  - अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार दडपशाही करतंय; भाजप नेत्याची टीका​ 'कोरोना'मुळे लांबणीवर पडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर संपविण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून घेण्यात येणार असल्याने त्यासाठी खासगी कंपनीची निवड करण्यात आली. या परीक्षेसाठी २ लाख ५० हजार विद्यार्थी बसणार होते, त्यातील सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार होते. १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या परीक्षेला ९७ टक्के विद्यार्थी उपस्थित राहिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.  - शिक्षकांचं ट्रेनिंग सुरू; 'नीट'चा निकाल वाढविण्यासाठी 'डीपर'ने घेतला पुढाकार​ ऑनलाइन परीक्षेत लॉगइन न होणे, प्रश्न किंवा उत्तरांचे पर्याय न दिसणे, आकृत्या न दिसणे, सोडवलेला पेपर सबमिट न होणे, तसेच सोडवलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न गायब होणे अशा समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागले होते. या सदोष प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार होता. त्यामुळे या परीक्षा पद्धतीवर टीकेची झोड उठली. त्याची दखल  घेत विद्यापीठाने गुगल फाॅर्म आणि ईमेल द्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंदणी करून घेतली. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.  - पुण्याच्या महापौरांचे ई-मेल हॅक करण्याचा प्रयत्न; नाजेरियन फ्रॉड उघडकीस​ विद्यापीठाने तक्रारींचे वर्गीकरण करून २६ हजार विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेसाठी वेळपत्रक तयार केले. शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, मानसनिती व समाजविज्ञान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांची परीक्षा ५ नोव्हेंबरला होतील. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ६ नोव्हेंबर आणि कला आणि विज्ञान अभ्यासक्रमाची परीक्षा ७ नोव्हेंबरला होणार आहे. या सर्व परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहेत. या परीक्षेत पुन्हा तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली असल्याचे, परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 4, 2020

Final Year Exam : पुणे विद्यापीठाची फेरपरीक्षा आजपासून पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी फेर परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा गुरुवार (ता.५) पासून सुरू होत असून, यासाठी 26 हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत.  - अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार दडपशाही करतंय; भाजप नेत्याची टीका​ 'कोरोना'मुळे लांबणीवर पडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर संपविण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून घेण्यात येणार असल्याने त्यासाठी खासगी कंपनीची निवड करण्यात आली. या परीक्षेसाठी २ लाख ५० हजार विद्यार्थी बसणार होते, त्यातील सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार होते. १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या परीक्षेला ९७ टक्के विद्यार्थी उपस्थित राहिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.  - शिक्षकांचं ट्रेनिंग सुरू; 'नीट'चा निकाल वाढविण्यासाठी 'डीपर'ने घेतला पुढाकार​ ऑनलाइन परीक्षेत लॉगइन न होणे, प्रश्न किंवा उत्तरांचे पर्याय न दिसणे, आकृत्या न दिसणे, सोडवलेला पेपर सबमिट न होणे, तसेच सोडवलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न गायब होणे अशा समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागले होते. या सदोष प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार होता. त्यामुळे या परीक्षा पद्धतीवर टीकेची झोड उठली. त्याची दखल  घेत विद्यापीठाने गुगल फाॅर्म आणि ईमेल द्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंदणी करून घेतली. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.  - पुण्याच्या महापौरांचे ई-मेल हॅक करण्याचा प्रयत्न; नाजेरियन फ्रॉड उघडकीस​ विद्यापीठाने तक्रारींचे वर्गीकरण करून २६ हजार विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेसाठी वेळपत्रक तयार केले. शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, मानसनिती व समाजविज्ञान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांची परीक्षा ५ नोव्हेंबरला होतील. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ६ नोव्हेंबर आणि कला आणि विज्ञान अभ्यासक्रमाची परीक्षा ७ नोव्हेंबरला होणार आहे. या सर्व परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहेत. या परीक्षेत पुन्हा तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली असल्याचे, परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mPSner

No comments:

Post a Comment