ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका - छगन भुजबळ पुणे - ‘मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर पाठिंबा आहे; पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्ही पाठिंबा देत असताना ‘ओबीसी आरक्षणा’तून काही जाती वगळून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असा प्रयत्न होऊन सवलतींना धक्का लागत असेल, तर या समाजात जागृती करण्यास आणि आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढावे लागतील,’’ असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना शनिवारी ‘महात्मा फुले समता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार जयदेव गायकवाड, हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, समता परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, एकनाथ खेडकर, कमल ढोले पाटील, प्रीतेश गवळी, गौतम बेंगाळे, मनीषा लडकत आदी या वेळी उपस्थित होते. पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना? भुजबळ म्हणाले, ‘आरक्षणाच्या क्रमवारीत इतर मागास वर्ग (ओबीसी) हा सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थात्मक पातळीवर आरक्षण मिळत नाही. त्यात आता या प्रवर्गात काही जातींचा बेकायदा समावेश झाल्याचा आरोप करून त्या जाती वगळून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मराठा समाजातील काही नेते करीत आहेत. तसे करता येणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे भाजपसह सर्व पक्षांची भूमिका आहे. कारण या समाजाचे अनेक प्रश्‍न, समस्या आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे,’’ असे सांगून त्यांनी सरकारकडे काही मागण्या करणार असल्याचे ते म्हणाले. नरके म्हणाले, ‘फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जिवंत राहील की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपण कसोशीने केला पाहिजे.’ Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत भुजबळ यांच्या मागण्या बार्टी, सारथीसारख्या महाजोती संस्थेला दीडशे कोटी रुपये द्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दीड हजार कोटी रुपये द्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारावीत ओबीसींची जनगणना करावी नोकऱ्यांतील ओबीसींचा अनुशेष तत्काळ भरावा ‘राज्य सरकारला धोका नाही’ पुणे - आमचे सरकार भक्कमपणे काम करीत आहे, असे स्पष्ट करीत सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सरकारमधील घटक पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे ते कोसळेल ही विरोधी पक्षाच्या नेत्यांची विधाने त्यांनी फेटाळून लावली. राज्यभरात नागरिकांना भरमसाट वीजबिले आली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यात काही ठिकाणी अवाजवी बिले आहेत. त्यांची तपासणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.’ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 28, 2020

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका - छगन भुजबळ पुणे - ‘मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर पाठिंबा आहे; पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्ही पाठिंबा देत असताना ‘ओबीसी आरक्षणा’तून काही जाती वगळून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असा प्रयत्न होऊन सवलतींना धक्का लागत असेल, तर या समाजात जागृती करण्यास आणि आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढावे लागतील,’’ असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना शनिवारी ‘महात्मा फुले समता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार जयदेव गायकवाड, हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, समता परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, एकनाथ खेडकर, कमल ढोले पाटील, प्रीतेश गवळी, गौतम बेंगाळे, मनीषा लडकत आदी या वेळी उपस्थित होते. पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना? भुजबळ म्हणाले, ‘आरक्षणाच्या क्रमवारीत इतर मागास वर्ग (ओबीसी) हा सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थात्मक पातळीवर आरक्षण मिळत नाही. त्यात आता या प्रवर्गात काही जातींचा बेकायदा समावेश झाल्याचा आरोप करून त्या जाती वगळून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मराठा समाजातील काही नेते करीत आहेत. तसे करता येणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे भाजपसह सर्व पक्षांची भूमिका आहे. कारण या समाजाचे अनेक प्रश्‍न, समस्या आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे,’’ असे सांगून त्यांनी सरकारकडे काही मागण्या करणार असल्याचे ते म्हणाले. नरके म्हणाले, ‘फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जिवंत राहील की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपण कसोशीने केला पाहिजे.’ Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत भुजबळ यांच्या मागण्या बार्टी, सारथीसारख्या महाजोती संस्थेला दीडशे कोटी रुपये द्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दीड हजार कोटी रुपये द्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारावीत ओबीसींची जनगणना करावी नोकऱ्यांतील ओबीसींचा अनुशेष तत्काळ भरावा ‘राज्य सरकारला धोका नाही’ पुणे - आमचे सरकार भक्कमपणे काम करीत आहे, असे स्पष्ट करीत सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सरकारमधील घटक पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे ते कोसळेल ही विरोधी पक्षाच्या नेत्यांची विधाने त्यांनी फेटाळून लावली. राज्यभरात नागरिकांना भरमसाट वीजबिले आली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यात काही ठिकाणी अवाजवी बिले आहेत. त्यांची तपासणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.’ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fLWPZt

No comments:

Post a Comment