मुंबईत एन-95 मास्कचा तुटवडा? किमतीवरील नियंत्रणामुळे कंपन्यांचा निर्मितीस नकार मुंबई : सरकारने एन-95 मास्कच्या किमतींवर नियंत्रण आणल्यामुळे मुंबईत मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. पालिका प्रशासनाने मात्र याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे सरकारने किमतीवर आणलेल्या निर्बंधांमुळे आम्हाला मास्क बनवणे शक्‍य नाही. सध्याची मास्कची किंमत साध्या कापडी मास्कपेक्षाही कमी आहे, असे काही मास्क बनविणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे.  हेही वाचा - कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला दाखल सरकारने निर्बंध घातलेल्या मास्कमध्ये एन-95ही समावेश आहे. दर निश्‍चित केल्यामुळे मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. मास्क बनविणाऱ्यांनी पुरवठा करण्यास नकार दिला असून, याबाबत महापालिका आणि सरकारलाही त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. एवढ्या कमी किमतीत मास्कचा पुरवठा करणे शक्‍य नाही. मागील महिन्यात अधिसूचना काढून मास्कच्या किमती निश्‍चित केल्या होत्या. त्यामध्ये एन-95 ची किंमत 20 रुपये आणि एफएफपी-2 एन-95 मास्कसारखेच काम करणाऱ्या मास्कची किंमत आठ रुपये ठरवली गेली. ज्यात जीएसटीचाही समावेश आहे. अधिसूचनेत म्हटल्यानुसार, रिटेल दुकानांमध्ये एन-95 मास्कची किंमत 19 ते 45 रुपयांच्या आत असली पाहिजे आणि ही किंमत त्यांच्या प्रकारावरून निश्‍चित केली गेली पाहिजे. चार प्लाय मास्क हा चार रुपयांपर्यंत असला पाहिजे आणि दोन प्लाय मास्क तीन रुपयांपर्यंत असला पाहिजे. हे निर्बंध टाकण्याआधी रिटेल मार्केटमध्ये एन-95 मास्कची किंमत 150 ते 600 रुपये, दोन प्लाय मास्कची किंमत 20 ते 40 रुपयांच्या दरम्यान होती. हेही वाचा - ठाण्यात कमळ फुलवण्याची रणनीती; कार्यकारिणी बैठकीत आशीष शेलारांचे तयारीचे आवाहन गेल्या महिन्यात पालिकेने 18 लाख एफएफपी 2 मास्क विकत घेण्यासाठी निविदा काढली. एफएफपी 2 मास्कचे जे विक्रेते आहेत जे पालिकेला 8.82 रुपयांना मास्क पुरवणार होते त्यांनी असे सांगितले आहे की, या किमतीमध्ये मास्क विकू शकत नाहीत. त्यानंतर राज्य सरकारच्या हाफकीनने उत्तराखंडमधील कंपनीला 36 लाख एफएफपी 2 मास्कची ऑर्डर देत प्रत्येक मास्क 6.87 रुपयाला विकत घेतले.      मुंबईबाहेरील शहरांत मास्कच्या किमतींवर नियंत्रण आहे. त्यामुळे तिथे मास्कचा तुटवडा जाणवू शकतो. मुंबईत आधीपासूनच मास्क, पीपीई कीटचा योग्य पुरवठा आणि तरतूद केली आहे. खरेदी प्रक्रियाही सुरू असून, जेव्हा रुग्णालयात मास्कची गरज भासेल तेव्हा तो उपलब्ध करून दिला जाईल. मुंबईत महापालिकेच्या कोणत्याच रुग्णालयात सध्या तुटवडा नाही.  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका      मास्कच्या किमतीवरील नियंत्रण ही चांगली बाब आहे. त्यामुळे जनतेला कमी किमतीत मास्क उपलब्ध होत आहे. राज्यातील मास्क तयार करणाऱ्या काही कंपन्या खोट्या तक्रारी करून किमतीवरील नियंत्रण रद्द करायचा प्रयत्न करत आहेत.  - अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स असोसिएशन  Shortage of N 95 masks in Mumbai Companies refuse to production because of price controls ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

मुंबईत एन-95 मास्कचा तुटवडा? किमतीवरील नियंत्रणामुळे कंपन्यांचा निर्मितीस नकार मुंबई : सरकारने एन-95 मास्कच्या किमतींवर नियंत्रण आणल्यामुळे मुंबईत मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. पालिका प्रशासनाने मात्र याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे सरकारने किमतीवर आणलेल्या निर्बंधांमुळे आम्हाला मास्क बनवणे शक्‍य नाही. सध्याची मास्कची किंमत साध्या कापडी मास्कपेक्षाही कमी आहे, असे काही मास्क बनविणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे.  हेही वाचा - कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला दाखल सरकारने निर्बंध घातलेल्या मास्कमध्ये एन-95ही समावेश आहे. दर निश्‍चित केल्यामुळे मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. मास्क बनविणाऱ्यांनी पुरवठा करण्यास नकार दिला असून, याबाबत महापालिका आणि सरकारलाही त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. एवढ्या कमी किमतीत मास्कचा पुरवठा करणे शक्‍य नाही. मागील महिन्यात अधिसूचना काढून मास्कच्या किमती निश्‍चित केल्या होत्या. त्यामध्ये एन-95 ची किंमत 20 रुपये आणि एफएफपी-2 एन-95 मास्कसारखेच काम करणाऱ्या मास्कची किंमत आठ रुपये ठरवली गेली. ज्यात जीएसटीचाही समावेश आहे. अधिसूचनेत म्हटल्यानुसार, रिटेल दुकानांमध्ये एन-95 मास्कची किंमत 19 ते 45 रुपयांच्या आत असली पाहिजे आणि ही किंमत त्यांच्या प्रकारावरून निश्‍चित केली गेली पाहिजे. चार प्लाय मास्क हा चार रुपयांपर्यंत असला पाहिजे आणि दोन प्लाय मास्क तीन रुपयांपर्यंत असला पाहिजे. हे निर्बंध टाकण्याआधी रिटेल मार्केटमध्ये एन-95 मास्कची किंमत 150 ते 600 रुपये, दोन प्लाय मास्कची किंमत 20 ते 40 रुपयांच्या दरम्यान होती. हेही वाचा - ठाण्यात कमळ फुलवण्याची रणनीती; कार्यकारिणी बैठकीत आशीष शेलारांचे तयारीचे आवाहन गेल्या महिन्यात पालिकेने 18 लाख एफएफपी 2 मास्क विकत घेण्यासाठी निविदा काढली. एफएफपी 2 मास्कचे जे विक्रेते आहेत जे पालिकेला 8.82 रुपयांना मास्क पुरवणार होते त्यांनी असे सांगितले आहे की, या किमतीमध्ये मास्क विकू शकत नाहीत. त्यानंतर राज्य सरकारच्या हाफकीनने उत्तराखंडमधील कंपनीला 36 लाख एफएफपी 2 मास्कची ऑर्डर देत प्रत्येक मास्क 6.87 रुपयाला विकत घेतले.      मुंबईबाहेरील शहरांत मास्कच्या किमतींवर नियंत्रण आहे. त्यामुळे तिथे मास्कचा तुटवडा जाणवू शकतो. मुंबईत आधीपासूनच मास्क, पीपीई कीटचा योग्य पुरवठा आणि तरतूद केली आहे. खरेदी प्रक्रियाही सुरू असून, जेव्हा रुग्णालयात मास्कची गरज भासेल तेव्हा तो उपलब्ध करून दिला जाईल. मुंबईत महापालिकेच्या कोणत्याच रुग्णालयात सध्या तुटवडा नाही.  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका      मास्कच्या किमतीवरील नियंत्रण ही चांगली बाब आहे. त्यामुळे जनतेला कमी किमतीत मास्क उपलब्ध होत आहे. राज्यातील मास्क तयार करणाऱ्या काही कंपन्या खोट्या तक्रारी करून किमतीवरील नियंत्रण रद्द करायचा प्रयत्न करत आहेत.  - अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स असोसिएशन  Shortage of N 95 masks in Mumbai Companies refuse to production because of price controls ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3eZ5g2Z

No comments:

Post a Comment