मुंबईतून परतलेल्या एसटीच्या आणखी 46 जणांना कोरोना सांगली : मुंबईतील "बेस्ट' साठीची बसेस सेवा स्थगित केल्यानंतर जिल्ह्यात परतलेल्या एसटीच्या आणखी 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अद्यापही शंभर जणांचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात धास्तीचे वातावरण आहे. यापूर्वी 127 कर्मचारी बाधित झाले होते. त्यामध्ये आणखी 46 जणांची वाढ झाली आहे.  कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे "बेस्ट' परिवहन सेवेसाठी राज्यातून एसटीच्या एक हजार गाड्या पाठवल्या होत्या. सांगली विभागातून 425 जणांची पहिली तुकडी 10 ऑक्‍टोबरला गेली होती. 23 ऑक्‍टोबरला पहिली तुकडी परतली. त्यांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 127 जण कोरोना बाधित असल्याचे आढळले. मुंबईत जीव धोक्‍यात घालून सेवा बजावताना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचारी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. प्रशासनाच्या कारभारावर टीका होऊ लागली.  सांगलीतील 127 कर्मचारी बाधित झाल्याचे समजताच मुंबईत गेलेली दुसरी तुकडीने तातडीने परत पाठवण्याबाबत महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढले. सांगलीतील शंभर गाड्या आणि कर्मचारी यांची सेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्मचारी व गाड्या जिल्ह्यात परतल्या आहेत. जिल्ह्यात परतलेल्या 400 जणांपैकी तीनशे जणांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 46 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीतील 40 जणांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तसेच इस्लामपुरातील 48 जणांची तपासणीच झालेली नाही. त्यामुळे जवळपास शंभर जणांचा अहवाल प्रलंबित आहे.  एसटीच्या पहिल्या तुकडीतील 127 आणि दुसऱ्या तुकडीतील आजअखेरचे 46 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. आजअखेर 173 कर्मचारी मुंबईतून आल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी तिघा कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सांगली व मिरजेत उपचार सुरू आहेत.  आगारनिहाय बाधित-  शिराळा 5, विटा 9, तासगाव 9, जत 8, मिरज 6, पलूस 1 आणि कवठेमहांकाळ 8 याप्रमाणे 46 जण बाधित असल्याचे आढळले आहे. इस्लामपुर आगाराने 48 जणांची अद्याप तपासणीच करून घेतली नाही.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

मुंबईतून परतलेल्या एसटीच्या आणखी 46 जणांना कोरोना सांगली : मुंबईतील "बेस्ट' साठीची बसेस सेवा स्थगित केल्यानंतर जिल्ह्यात परतलेल्या एसटीच्या आणखी 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अद्यापही शंभर जणांचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात धास्तीचे वातावरण आहे. यापूर्वी 127 कर्मचारी बाधित झाले होते. त्यामध्ये आणखी 46 जणांची वाढ झाली आहे.  कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे "बेस्ट' परिवहन सेवेसाठी राज्यातून एसटीच्या एक हजार गाड्या पाठवल्या होत्या. सांगली विभागातून 425 जणांची पहिली तुकडी 10 ऑक्‍टोबरला गेली होती. 23 ऑक्‍टोबरला पहिली तुकडी परतली. त्यांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 127 जण कोरोना बाधित असल्याचे आढळले. मुंबईत जीव धोक्‍यात घालून सेवा बजावताना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचारी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. प्रशासनाच्या कारभारावर टीका होऊ लागली.  सांगलीतील 127 कर्मचारी बाधित झाल्याचे समजताच मुंबईत गेलेली दुसरी तुकडीने तातडीने परत पाठवण्याबाबत महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढले. सांगलीतील शंभर गाड्या आणि कर्मचारी यांची सेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्मचारी व गाड्या जिल्ह्यात परतल्या आहेत. जिल्ह्यात परतलेल्या 400 जणांपैकी तीनशे जणांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 46 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीतील 40 जणांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तसेच इस्लामपुरातील 48 जणांची तपासणीच झालेली नाही. त्यामुळे जवळपास शंभर जणांचा अहवाल प्रलंबित आहे.  एसटीच्या पहिल्या तुकडीतील 127 आणि दुसऱ्या तुकडीतील आजअखेरचे 46 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. आजअखेर 173 कर्मचारी मुंबईतून आल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी तिघा कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सांगली व मिरजेत उपचार सुरू आहेत.  आगारनिहाय बाधित-  शिराळा 5, विटा 9, तासगाव 9, जत 8, मिरज 6, पलूस 1 आणि कवठेमहांकाळ 8 याप्रमाणे 46 जण बाधित असल्याचे आढळले आहे. इस्लामपुर आगाराने 48 जणांची अद्याप तपासणीच करून घेतली नाही.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jRjSCy

No comments:

Post a Comment