मुंबईतील कोव्हिड बेड कमी होण्याची शक्‍यता; रुग्णसंख्या घटल्याने खासगी रुग्णालयांचा विचार मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने खासगी रुग्णालये दिवाळीनंतर कोव्हिड खाटा कमी करण्याचा विचार करत आहेत. राज्य सरकारने अनेक निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनारुग्णांच्या तुलनेत इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णांअभावी रिक्त पडून असलेल्या बेड्‌सचा वापर करण्याची रुग्णालयांची योजना असल्याचे बॉम्बे रुग्णालयाचे सल्लागार चिकित्सक आणि खासगी रुग्णालयांतील कोव्हिड बेड्‌सचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.  दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलू लागल्या; कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने उत्साह पालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार, कोरोनारुग्णांसाठी विविध खासगी रुग्णालयात एकूण 4,192 बेड राखीव ठेवण्यात आले असून त्यातील 2,204 बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 1,007 आयसीयूपैकी तब्बल 422 बेडही रिक्त आहेत. कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आलेल्या एकूण सुविधेच्या जवळपास 42 टक्के सुविधा वापराविना पडून आहेत. त्यामुळे रुग्णालयांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने या रिक्त बेड्‌सचा वापर इतर रुग्णांसाठी करण्याचा विचार खासगी रुग्णालये आता करत आहेत.  मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही आली, तर कोरोना बेडची संख्या कमी करू आणि दिवाळीनंतर कोव्हिड नसलेल्या रुग्णांसाठी त्यांचा वापर करू, असे खासगी रुग्णालयातील काही डॉक्‍टरांनी सांगितले आहे.  मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री दरम्यान, कोरोनारुग्णांसाठी राखीव असलेले बेड कमी करण्याचा निर्णय दिवाळीनंतर लगेच घेऊ नये. कारण दिवाळीनंतर रुग्ण कमी होतील की वाढतील, याचा अंदाज अजूनही नाही, असा इशारा ज्येष्ठ डॉक्‍टरांनी दिला आहे.  ...तर सरकारने पैसे द्यावेत!  मुंबईत दुसरी लाट आल्यास नियम परत लागू करता येतील. सरकारला किमान बेड राखून ठेवावे, असे वाटत असेल, तर खासगी रुग्णालयांना मूळ खर्चाची रक्कम द्यावी. रिक्त बेड राखून ठेवण्याऐवजी ते पुन्हा वापरात आणणे चांगला निर्णय आहे. कारण बेड्‌स व उपकरणांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे, असे आयएमए, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.  -------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

मुंबईतील कोव्हिड बेड कमी होण्याची शक्‍यता; रुग्णसंख्या घटल्याने खासगी रुग्णालयांचा विचार मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने खासगी रुग्णालये दिवाळीनंतर कोव्हिड खाटा कमी करण्याचा विचार करत आहेत. राज्य सरकारने अनेक निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनारुग्णांच्या तुलनेत इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णांअभावी रिक्त पडून असलेल्या बेड्‌सचा वापर करण्याची रुग्णालयांची योजना असल्याचे बॉम्बे रुग्णालयाचे सल्लागार चिकित्सक आणि खासगी रुग्णालयांतील कोव्हिड बेड्‌सचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.  दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलू लागल्या; कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने उत्साह पालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार, कोरोनारुग्णांसाठी विविध खासगी रुग्णालयात एकूण 4,192 बेड राखीव ठेवण्यात आले असून त्यातील 2,204 बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 1,007 आयसीयूपैकी तब्बल 422 बेडही रिक्त आहेत. कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आलेल्या एकूण सुविधेच्या जवळपास 42 टक्के सुविधा वापराविना पडून आहेत. त्यामुळे रुग्णालयांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने या रिक्त बेड्‌सचा वापर इतर रुग्णांसाठी करण्याचा विचार खासगी रुग्णालये आता करत आहेत.  मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही आली, तर कोरोना बेडची संख्या कमी करू आणि दिवाळीनंतर कोव्हिड नसलेल्या रुग्णांसाठी त्यांचा वापर करू, असे खासगी रुग्णालयातील काही डॉक्‍टरांनी सांगितले आहे.  मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री दरम्यान, कोरोनारुग्णांसाठी राखीव असलेले बेड कमी करण्याचा निर्णय दिवाळीनंतर लगेच घेऊ नये. कारण दिवाळीनंतर रुग्ण कमी होतील की वाढतील, याचा अंदाज अजूनही नाही, असा इशारा ज्येष्ठ डॉक्‍टरांनी दिला आहे.  ...तर सरकारने पैसे द्यावेत!  मुंबईत दुसरी लाट आल्यास नियम परत लागू करता येतील. सरकारला किमान बेड राखून ठेवावे, असे वाटत असेल, तर खासगी रुग्णालयांना मूळ खर्चाची रक्कम द्यावी. रिक्त बेड राखून ठेवण्याऐवजी ते पुन्हा वापरात आणणे चांगला निर्णय आहे. कारण बेड्‌स व उपकरणांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे, असे आयएमए, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.  -------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2JLh7pV

No comments:

Post a Comment