दिवाळी फटाक्‍यांमध्ये विषारी द्रव्यच! आवाज फाऊंडेशनच्या चाचणीनुसार मानवी आरोग्यास धोका मुंबई : कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. असे असले तरीही उपलब्ध फटाक्‍यांमध्ये विषारी द्रव्य कायम असल्याचे निरीक्षण आवाज फाऊंडेशनकडून नोंदवण्यात आले आहे. मानवी आरोग्यास फटाके धोकादायक असून ते फोडू नयेत म्हणून प्रयत्न केले जावेत. राज्य सरकारनेही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालावी, असे आवाहन "आवाज'ने केले आहे.  अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच कोरोना आजारामुळे रुग्णांच्या फुप्फुसावर होणारा आघात आणि प्रदूषणातून उद्‌भवणाऱ्या घातकी श्‍वसनविकाराचा आढावा घेण्यासाठी आवाज फाऊंडेशनने 40 हून अधिक प्रकारचे फटाके बाजारातून खरेदी करून त्याची चाचणी केली. मात्र यंदा बाजारात "ग्रीन क्रॅकर्स' म्हणजे हिरवे फटाके उपलब्ध नसल्याचे निरीक्षण "आवाज'ने मांडले. "ग्रीन क्रॅकर्स'ची मागणी केली असता त्याऐवजी हिरव्या रंगात फुटणारे फटाके देण्यात आले. त्या फटाक्‍यांचे प्रयोगशाळेत विश्‍लेषण केल्यावर त्यात प्रतिबंधित रासायनिक बेरियमसह असंख्य घातक रसायने असल्याचे आढळले, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलली यांनी दिली.  फटाक्‍यांच्या पर्यावरण संरक्षण अधिनियम 1086 अन्वये "आवाज'ने घातक आणि विषारी रसायनांच्या यादीतील नोंदींसह रासायनिक रचनेचीही तुलना केली.  चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारचे प्राधान्य; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्‍वासन गेल्या दशकभरात आवाज फाऊंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संयुक्तपणे घेतलेल्या वार्षिक ध्वनिप्रदूषणाची चाचणी या वर्षी पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याने 2019 चा अहवाल जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. अहवालात चाचणी केलेले बहुतेक फटाके अत्यंत उच्च पातळीचे ध्वनिप्रदूषण निर्माण करत असून निवासी भागात वापरण्याजोगे अजिबात नसल्याचे निरीक्षण मांडण्यात आले आहे.  हानिकारक द्रव्यांचा समावेश  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेरियमच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही फटाक्‍यांमध्ये ते द्रव्य आढळले आहे. चाचणीमध्ये रासायनिक द्रव्याचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. फटाक्‍यामध्ये सल्फर ट्रायक्‍सॉईड, व्हॅनिडियम पेंटॉक्‍साईड, पोटॅशियम ऑक्‍साईड्‌स आणि कॉपर ऑक्‍साईड्‌स आहेत. ते सर्व आणि त्यांचे ऑक्‍साईड नियमांनुसार विषारी म्हणून नमूद करण्यात आले आहेत. अशी हानिकारक रसायने दिवाळीच्या फटाक्‍यांत वापरून हवेत सोडली जातात. त्यातून वायुप्रदूषण होते. इतर अनेक चाचणी केलेल्या फटाक्‍यांच्या नमुन्यांचे निकाल प्रलंबित असून लवकरच ते सादर करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.  हेही वाचा - नॉन कोव्हिड खाटांसाठी टास्क फोर्सची शिफारस; खासगी रुग्णालयांचा फॉर्म्युला 60:40 वर आणण्याचा सल्ला सरकारने तातडीने फटाक्‍यांवर बंदी घालावी  कोव्हिड काळात प्रदूषणाचा आरोग्याला धोका असून फटाके श्‍वसन आजाराच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतात. यंदा मुंबईतील गणपती, नवरात्र व ईदसारखे सण पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेऊन साजरे करण्यात आले. दिवाळीही तशीच साजरी करण्यात यावी. कोव्हिड काळात हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच विशेषत: श्‍वसनाचे विकार असलेल्यांसाठी फटाके वापरणे अधिक धोकादायक असल्याने पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करावी. राज्य सरकारलाही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालण्यात यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे, असे "आवाज'च्या सुमेरा अब्दुलली यानी सांगितले ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 7, 2020

दिवाळी फटाक्‍यांमध्ये विषारी द्रव्यच! आवाज फाऊंडेशनच्या चाचणीनुसार मानवी आरोग्यास धोका मुंबई : कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. असे असले तरीही उपलब्ध फटाक्‍यांमध्ये विषारी द्रव्य कायम असल्याचे निरीक्षण आवाज फाऊंडेशनकडून नोंदवण्यात आले आहे. मानवी आरोग्यास फटाके धोकादायक असून ते फोडू नयेत म्हणून प्रयत्न केले जावेत. राज्य सरकारनेही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालावी, असे आवाहन "आवाज'ने केले आहे.  अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच कोरोना आजारामुळे रुग्णांच्या फुप्फुसावर होणारा आघात आणि प्रदूषणातून उद्‌भवणाऱ्या घातकी श्‍वसनविकाराचा आढावा घेण्यासाठी आवाज फाऊंडेशनने 40 हून अधिक प्रकारचे फटाके बाजारातून खरेदी करून त्याची चाचणी केली. मात्र यंदा बाजारात "ग्रीन क्रॅकर्स' म्हणजे हिरवे फटाके उपलब्ध नसल्याचे निरीक्षण "आवाज'ने मांडले. "ग्रीन क्रॅकर्स'ची मागणी केली असता त्याऐवजी हिरव्या रंगात फुटणारे फटाके देण्यात आले. त्या फटाक्‍यांचे प्रयोगशाळेत विश्‍लेषण केल्यावर त्यात प्रतिबंधित रासायनिक बेरियमसह असंख्य घातक रसायने असल्याचे आढळले, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलली यांनी दिली.  फटाक्‍यांच्या पर्यावरण संरक्षण अधिनियम 1086 अन्वये "आवाज'ने घातक आणि विषारी रसायनांच्या यादीतील नोंदींसह रासायनिक रचनेचीही तुलना केली.  चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारचे प्राधान्य; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्‍वासन गेल्या दशकभरात आवाज फाऊंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संयुक्तपणे घेतलेल्या वार्षिक ध्वनिप्रदूषणाची चाचणी या वर्षी पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याने 2019 चा अहवाल जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. अहवालात चाचणी केलेले बहुतेक फटाके अत्यंत उच्च पातळीचे ध्वनिप्रदूषण निर्माण करत असून निवासी भागात वापरण्याजोगे अजिबात नसल्याचे निरीक्षण मांडण्यात आले आहे.  हानिकारक द्रव्यांचा समावेश  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेरियमच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही फटाक्‍यांमध्ये ते द्रव्य आढळले आहे. चाचणीमध्ये रासायनिक द्रव्याचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. फटाक्‍यामध्ये सल्फर ट्रायक्‍सॉईड, व्हॅनिडियम पेंटॉक्‍साईड, पोटॅशियम ऑक्‍साईड्‌स आणि कॉपर ऑक्‍साईड्‌स आहेत. ते सर्व आणि त्यांचे ऑक्‍साईड नियमांनुसार विषारी म्हणून नमूद करण्यात आले आहेत. अशी हानिकारक रसायने दिवाळीच्या फटाक्‍यांत वापरून हवेत सोडली जातात. त्यातून वायुप्रदूषण होते. इतर अनेक चाचणी केलेल्या फटाक्‍यांच्या नमुन्यांचे निकाल प्रलंबित असून लवकरच ते सादर करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.  हेही वाचा - नॉन कोव्हिड खाटांसाठी टास्क फोर्सची शिफारस; खासगी रुग्णालयांचा फॉर्म्युला 60:40 वर आणण्याचा सल्ला सरकारने तातडीने फटाक्‍यांवर बंदी घालावी  कोव्हिड काळात प्रदूषणाचा आरोग्याला धोका असून फटाके श्‍वसन आजाराच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतात. यंदा मुंबईतील गणपती, नवरात्र व ईदसारखे सण पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेऊन साजरे करण्यात आले. दिवाळीही तशीच साजरी करण्यात यावी. कोव्हिड काळात हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच विशेषत: श्‍वसनाचे विकार असलेल्यांसाठी फटाके वापरणे अधिक धोकादायक असल्याने पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करावी. राज्य सरकारलाही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालण्यात यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे, असे "आवाज'च्या सुमेरा अब्दुलली यानी सांगितले ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I9xrzX

No comments:

Post a Comment