कोट्यवधीचा निधी खर्चूनही कोकण घाटरस्ते निकृष्ट वैभववाडी (सिंधुदुर्ग) - दरवर्षी कोट्यवधीचा निधी घाटरस्त्यांवर खर्च केला जातो; तरीही या घाटरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. करूळ आणि भुईबावडा या दोन्हीही घाटरस्त्यांची वाहतूक कधी बंद होईल? याचा भरवसा नाही. निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यातील साटेलोट्यामुळेच हे घाटरस्ते अखेरची घटका मोजत आहेत.  पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या जिल्ह्यातील चार घाटरस्त्यांपैकी करूळ आणि भुईबावडा हे दोन घाटरस्ते वैभववाडी तालुक्‍यात आहेत. यातील करूळ घाटरस्त्याने सर्वाधिक म्हणजेच सरासरी 32 हजार मेट्रीक टन वाहतूक प्रतिदिन होते; परंतु तालुक्‍यातील हे दोनही घाटरस्ते सध्या बेभरवशाचे झाले आहे. परतीच्या पावसाने या घाटरस्त्यांचे कंबरडेच मोडले. करूळ घाटरस्ता मोठ्या प्रमाणात खचला. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन दिवस बंद ठेवण्याची नामुष्की बांधकाम विभागावर ओढवली. खचलेल्या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करून बांधकाम विभागाने सध्या घाटरस्त्याने एकेरी वाहतूक सुरू केली आहे; परंतु दरवर्षी कोट्यवधीची कामे होऊन देखील या रस्त्याची दुरवस्था का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.  घाटरस्त्यांत पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रस्ता खचणे असे दोन धोकादायक प्रकार घडत असतात; परंतु दरडी कोसळणे ही पूर्णतः नैसर्गीक घटना मानली जाते. बोल्डर नेटचा वापर करून काही अंशी दरडी रोखता येतात; परंतु त्यासाठी ज्याठिकाणी नेट लावली जाते. त्याठिकाणचे कातळ, दगडावर त्या जाळीचे कार्य अवलंबून असते. त्यामुळे ज्याठिकाणी चांगले कातळ आहे, त्याठिकाणी जाळ्या टिकून आहे. तेथे दरडी कोसळण्याचे प्रकार कमी घडलेले आहेत; परंतु सरसकट हा पर्याय यशस्वी होत नाही; मात्र रस्ता खचणे या प्रकाराला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियोजनशून्य कारभार आणि निकृष्ट काम करणारे ठेकेदारच जबाबदार आहेत. किरकोळ कामांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम घाटरस्ते खचण्यात होतो. पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला गती असते. या पाण्याला गटाराच्या माध्यमातून वाट करून दिली तर ते पाणी रस्त्यावर येणार नाही. घाटरस्त्यांत गटारे बांधून पुर्ण आहेत; परंतु पावसाळ्यापूर्वी त्यातील गाळ काढणे आवश्‍यक असतो. त्यासाठी खर्च देखील किरकोळ स्वरूपात येतो; परंतु बांधकाम विभाग याच कामाकडे दुर्लक्ष करते. परिणाम डोंगरावरून आलेले पाणी रस्त्यावरून वाहते. रस्त्यावरील एखाद्या खड्ड्यांतून ते पाणी वाट काढीत दरीत जाते. कालांतराने त्याचे भगदाड आणि भगदाडाचे रूपांतर रस्ता खचण्यात होतो. रस्ता खचण्याचे कारण अतिशय शुल्लक आहे. कधी-कधी लहान-लहान भगदाडांची दुरूस्तीची कामे लाख दोन लाखांत होतील; परंतु त्याच कामांना पुढे 40 ते 60 लाख रूपये खर्च येतो. त्यातच घाटरस्त्यांच्या कामांकडे बांधकाम विभागाचे अधिकारी डोळेझाक करतात. त्यामुळे ठेकेदारांनाही निकृष्ट काम करण्याची संधी मिळते. निकृष्ट कामांना वरकरणी जरी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तुटवड्याचे कारण दाखविले जात असले तरी ते तितकेसे संयुक्तिक नाही. करूळ घाटरस्त्यांप्रमाणेच भुईबावडा घाटरस्त्याचीही दुरवस्थाच झाली आहे. या घाटरस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती केली नाही तर हा घाटरस्ता सुध्दा खचण्याची शक्‍यता आहे.  कामे विभागण्याची पद्धत  शासनाने निवीदा प्रकियेत पारदर्शकपणा आणण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा वापर केला आहे; परंतु ठेकेदार आणि अधिकारी शासनाच्या एक पाऊल पुढे आहेत. घाटरस्त्यांच्या मंजुर कामांची यादी प्राप्त होताच विविध पक्षात काम करणारे ठेकेदार मांडीला मांडी लावून एकत्र बसतात. कुणी कोणत्या कामांची निविदा भरायची, जिल्हा बाहेरील ठेकेदार निविदा भरीत असेल तर त्याला कसा पळवायचा, याची रणनिती आखली जाते. ठेकेदारांच्या व्युहरचनेत अधिकाऱ्यांची भुमिका खूप महत्वाची असते. अधिकारी देखील स्थानिक ठेकेदारांच्या भुमिकेला मुक समंती देत असतात. त्यामुळेच निकृष्ट कामांचे प्रमाण वाढत आहे.  करूळ घाटरस्ता ज्याठिकाणी खचला आहे. त्याची तात्पुरती दुरूस्ती केली आहे. त्याचबरोबर खचलेल्या रस्त्यांच्या पुर्नबांधणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानतंर या कामाचे अदांजपत्रक तयार करण्यात येईल.  - एस. पी. हिरवाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैभववाडी  दृष्टीक्षेपात घाटरस्ता  * करूळ घाटरस्त्यांची लांबी-10.800 मीटर  * दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे-5  * रस्ता खचलेले ठिकाण-1  * रस्ता खचण्याची शक्‍यता असलेली ठिकाणे-3  * गटारे गाळाने भरलेली  * भुईबावडा घाटरस्त्याची लांबी-9 किलोमीटर  * रस्त्याला भेगा गेलेली ठिकाणे-3  * दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे-6   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

कोट्यवधीचा निधी खर्चूनही कोकण घाटरस्ते निकृष्ट वैभववाडी (सिंधुदुर्ग) - दरवर्षी कोट्यवधीचा निधी घाटरस्त्यांवर खर्च केला जातो; तरीही या घाटरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. करूळ आणि भुईबावडा या दोन्हीही घाटरस्त्यांची वाहतूक कधी बंद होईल? याचा भरवसा नाही. निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यातील साटेलोट्यामुळेच हे घाटरस्ते अखेरची घटका मोजत आहेत.  पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या जिल्ह्यातील चार घाटरस्त्यांपैकी करूळ आणि भुईबावडा हे दोन घाटरस्ते वैभववाडी तालुक्‍यात आहेत. यातील करूळ घाटरस्त्याने सर्वाधिक म्हणजेच सरासरी 32 हजार मेट्रीक टन वाहतूक प्रतिदिन होते; परंतु तालुक्‍यातील हे दोनही घाटरस्ते सध्या बेभरवशाचे झाले आहे. परतीच्या पावसाने या घाटरस्त्यांचे कंबरडेच मोडले. करूळ घाटरस्ता मोठ्या प्रमाणात खचला. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन दिवस बंद ठेवण्याची नामुष्की बांधकाम विभागावर ओढवली. खचलेल्या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करून बांधकाम विभागाने सध्या घाटरस्त्याने एकेरी वाहतूक सुरू केली आहे; परंतु दरवर्षी कोट्यवधीची कामे होऊन देखील या रस्त्याची दुरवस्था का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.  घाटरस्त्यांत पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रस्ता खचणे असे दोन धोकादायक प्रकार घडत असतात; परंतु दरडी कोसळणे ही पूर्णतः नैसर्गीक घटना मानली जाते. बोल्डर नेटचा वापर करून काही अंशी दरडी रोखता येतात; परंतु त्यासाठी ज्याठिकाणी नेट लावली जाते. त्याठिकाणचे कातळ, दगडावर त्या जाळीचे कार्य अवलंबून असते. त्यामुळे ज्याठिकाणी चांगले कातळ आहे, त्याठिकाणी जाळ्या टिकून आहे. तेथे दरडी कोसळण्याचे प्रकार कमी घडलेले आहेत; परंतु सरसकट हा पर्याय यशस्वी होत नाही; मात्र रस्ता खचणे या प्रकाराला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियोजनशून्य कारभार आणि निकृष्ट काम करणारे ठेकेदारच जबाबदार आहेत. किरकोळ कामांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम घाटरस्ते खचण्यात होतो. पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला गती असते. या पाण्याला गटाराच्या माध्यमातून वाट करून दिली तर ते पाणी रस्त्यावर येणार नाही. घाटरस्त्यांत गटारे बांधून पुर्ण आहेत; परंतु पावसाळ्यापूर्वी त्यातील गाळ काढणे आवश्‍यक असतो. त्यासाठी खर्च देखील किरकोळ स्वरूपात येतो; परंतु बांधकाम विभाग याच कामाकडे दुर्लक्ष करते. परिणाम डोंगरावरून आलेले पाणी रस्त्यावरून वाहते. रस्त्यावरील एखाद्या खड्ड्यांतून ते पाणी वाट काढीत दरीत जाते. कालांतराने त्याचे भगदाड आणि भगदाडाचे रूपांतर रस्ता खचण्यात होतो. रस्ता खचण्याचे कारण अतिशय शुल्लक आहे. कधी-कधी लहान-लहान भगदाडांची दुरूस्तीची कामे लाख दोन लाखांत होतील; परंतु त्याच कामांना पुढे 40 ते 60 लाख रूपये खर्च येतो. त्यातच घाटरस्त्यांच्या कामांकडे बांधकाम विभागाचे अधिकारी डोळेझाक करतात. त्यामुळे ठेकेदारांनाही निकृष्ट काम करण्याची संधी मिळते. निकृष्ट कामांना वरकरणी जरी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तुटवड्याचे कारण दाखविले जात असले तरी ते तितकेसे संयुक्तिक नाही. करूळ घाटरस्त्यांप्रमाणेच भुईबावडा घाटरस्त्याचीही दुरवस्थाच झाली आहे. या घाटरस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती केली नाही तर हा घाटरस्ता सुध्दा खचण्याची शक्‍यता आहे.  कामे विभागण्याची पद्धत  शासनाने निवीदा प्रकियेत पारदर्शकपणा आणण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा वापर केला आहे; परंतु ठेकेदार आणि अधिकारी शासनाच्या एक पाऊल पुढे आहेत. घाटरस्त्यांच्या मंजुर कामांची यादी प्राप्त होताच विविध पक्षात काम करणारे ठेकेदार मांडीला मांडी लावून एकत्र बसतात. कुणी कोणत्या कामांची निविदा भरायची, जिल्हा बाहेरील ठेकेदार निविदा भरीत असेल तर त्याला कसा पळवायचा, याची रणनिती आखली जाते. ठेकेदारांच्या व्युहरचनेत अधिकाऱ्यांची भुमिका खूप महत्वाची असते. अधिकारी देखील स्थानिक ठेकेदारांच्या भुमिकेला मुक समंती देत असतात. त्यामुळेच निकृष्ट कामांचे प्रमाण वाढत आहे.  करूळ घाटरस्ता ज्याठिकाणी खचला आहे. त्याची तात्पुरती दुरूस्ती केली आहे. त्याचबरोबर खचलेल्या रस्त्यांच्या पुर्नबांधणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानतंर या कामाचे अदांजपत्रक तयार करण्यात येईल.  - एस. पी. हिरवाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैभववाडी  दृष्टीक्षेपात घाटरस्ता  * करूळ घाटरस्त्यांची लांबी-10.800 मीटर  * दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे-5  * रस्ता खचलेले ठिकाण-1  * रस्ता खचण्याची शक्‍यता असलेली ठिकाणे-3  * गटारे गाळाने भरलेली  * भुईबावडा घाटरस्त्याची लांबी-9 किलोमीटर  * रस्त्याला भेगा गेलेली ठिकाणे-3  * दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे-6   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3oWahxO

No comments:

Post a Comment